दिल दोस्ती दोबारा -शीर्षक योग्य की अयोग्य?

Submitted by चैतन्य दीक्षित on 8 February, 2017 - 07:36

झी मराठीवरील नवीन येऊ घातलेली मालिका 'दिल दोस्ती दोबारा' या मालिकेच्या शीर्षकाबद्दल हा प्रश्न.
"मराठी वाहिनीवर असलेल्या मालिकेचे शीर्षक संपूर्णपणे अमराठी असणे तुम्हाला खटकते का? "

Group content visibility: 
Use group defaults

एक (सध्या) ७५-८०% हिंदी मालिका मराठी वाहिनीवर दाखवली जाते. शीर्षकाचं काय एवढं मोठंसं? Wink

झीचं तसंच चालू आहे, मधे दिल मराठी धडकन मराठी करत होते तेव्हा फेसबुकवर खूप जणांनी टीका केली होती. पण काहीही उत्तर दिलं नाही त्यांनी.

काहे दिया परदेस हे किमान मालिकेच्या कथानकामुळे तसं आहे असं म्हणायला वाव आहे.
दिल दोस्ती दोबाराच्या बाबतीत तसे वाटत नाही, म्हणून प्रश्न.

मला स्वतःला ते पटले नाही, पण मी बऱ्याचदा भाषेच्याबाबतीत आग्रही असतो (मराठी तर मराठी, हिंदी तर हिंदी असे)... म्हणून इतरांचे मत जाणून घ्यायचा प्रयत्न आहे हा.

चैतन्य, आता एकंदरच मराठीत हिंदीची फार सरमिसळ होत आहे. खुप सार्‍या, पसंत करतो.. असे शब्दप्रयोग मराठी वाटले तरी ते हिंदीच आहेत.
हे सगळे मालिकांतूनच नव्हे तर निवेदन, बातम्या, वर्तमानपत्रे सगळ्यातूनच होतेय.

पण चैतन्य, दोबारा नसेल पण दुबार हा मराठी शब्द आहे. दुबार पिकं असा शब्दप्रयोग " आमची माती, आमची माणसं" मधे करत असत Happy

100 Days ????
>>>

हे ईंग्लिश आहे.
आपल्याला ईंग्लिश नावाचे वावडे नसते. हिंदीचे असते Happy
ईंग्रजी आपल्याला गुलाम बनवून आपल्यावर राज्य करणार्‍यांची भाषा आहे. तर हिंदी राष्ट्रभाषा.

दिनेशदा,
दुबार >> बरोबर अगदी. मराठीत दुबार वापरतोच की.
100 days किंवा काहे दिया परदेस या मालिका जुन्या झाल्या म्हणून त्यांचे उल्लेख टाळले होते.
इतकं साधं कारण आहे. लगेच कुठं इंग्रज? त्यांचं राज्य आणि राष्ट्रभाषा वगैरे??
ऋन्मेष दादा, किती घाई लगेच निष्कर्षाप्रत पोहोचायची?
आणि रच्याकने, हिंदी राष्ट्रभाषा नाही हो!
तत्काळ गैरसमज दूर करून घ्या. मराठी हीसुद्धा राष्ट्रभाषा आहे.(अशा 22 आहेत एकूण, हिंदी त्यातली एक)

चैतन्य, दादा मत कहो ना Happy

बाकी तो तुमच्यावर आरोप नव्हता की जाओ पहले उस आदमी की साईन लेके आओ.. तर ते जनरल स्टेटमेंट होते. आपल्याला मराठीत ईंग्लिश शब्द खटकतत नाही पण हिंदी आले तर खटकते. असे का?

आणि 100 डेज वा काहे दिया परदेस जुन्या कश्या झाल्या. आताच्याच तर आहेत. अजून चालू आहेत. आपण आवज उठवून त्या बंद पाडू शकतो.

दिल दोस्ती दोबारा उच्चारताना एक rhythm आहे म्हणून तसे घेतले असेल कदाचित .....की मराठीत मन,मैत्री,???असे काहिसे घ्यायला हवे होते? पण दोबारा ला मराठीत मन , मैत्री च्या तालात काही शब्द नाही बहुतेक................रच्याकने हा शब्दाचा नेमका अर्थ काय आहे ? मी मायबोलीवर खूप वेळा वाचलाय हा शब्द पण नेमका अर्थ काय त्याचा ?

दिल दोस्ती दोबारा -शीर्षक योग्य की अयोग्य?

अत्यंत अयोग्य आणि चुकीचा पायंडा (पडला आहेच तो) रूढ करू पाहणारे!
असे वाटते की आजकाल मराठीत मालिकांकरता लिहिणारे कमी आणि मालकांकरता लिहिणारे जास्त झालेत बहुतेक.

काही वर्षांपुर्वी टाईम्स समूहाने वृत्तपत्रिय भाषा तरूणाईची भाषा अशीच असते अशा सबबीखाली/ नावाखाली अशी भेसळ युक्त केली होती. त्यांच्या मालकीच्या मटात मराठी तसेच इंग्रजी टाईम्स मधे (इंग्रजी) भाषाही भेसळयुक्त असते!
टीव्ही वर हेच काम आता झी करत आहे बहुतेक

जरासे अवांतर -
माध्यमांमधले सध्याचे कार्यरत / यशस्वी धुरीण पाहता, असे म्हणावे लागेल की
एखादा काय (मुद्दा / कंटेंट) बोलतो / लिहितो किंवा कसा ( लालित्यपुर्ण /शैलीदार) बोलतो / लिहितो वगैरे पाहण्याचे दिवस आता मागे पडत चालले आहेत. तुमच्या वागण्या बोलण्यात आक्रमकता दिसून आली पाहिजे आपले चुकीचेही म्हणणे रेटून बोलता आले पाहिजे (तिलाच हल्ली आत्मविश्वास समजत असावेत) यालाच महत्व उरत चालले आहे.

भाषेचा नेमका वापर न करण्यामागे / करू न शकण्यामागे भाषा शिकवणारे चांगले शिक्षक न मिळणे हे कारण नक्कीच असावे. पण मला असंच येतं आणि तेच बरोबर आहे किंवा लोकांना हेच आवडतं अशी मनोवृत्ती घेऊन भाषा कशी सुधारणार! खरेतर माहिती-विस्फोटाच्या या युगात एखाद्याने आपला भाषेबाबतचा व्यासंग टिकवण्याकरता प्रयत्न करणे तुलनात्मक रित्या कितीतरी सोपे व्हायला हवे ना!

>>भाषेचा नेमका वापर न करण्यामागे / करू न शकण्यामागे भाषा शिकवणारे चांगले शिक्षक न मिळणे हे कारण नक्कीच असावे. पण मला असंच येतं आणि तेच बरोबर आहे किंवा लोकांना हेच आवडतं अशी मनोवृत्ती घेऊन भाषा कशी सुधारणार! >>

अगदी अगदी!
कोणी मान्य करो न करो.... यात आरक्षणाच्या नावाखाली झालेली अतिसामान्य शिक्षकभरती हे प्रमुख कारण आहे!
सन्माननीय अपवाद असतीलही.... नाही असे नाही!
पण हे संक्रमण फार जवळून पाहिलय म्हणून इतक्या ठामपणे म्हणू शकतो

Yogya
Dil dosti punha ekda as mhanaiche ahe tyana n ३D cha rydhm madhe dobara basate mhanun he shirshak thevle ...
Kay rao tumhala Kahe diyach shirshak n Hindi mishrit geet khatakle nahi, १०० days he engraji naav aslelya malikeche bhojpuri gaane khatakale nahi pan Mharashtratlya vegveglya lokanna ekatra aananarya malikeche shirshak khatakale ,, kamal aahe ...
Charcha karaila kontahi vishay chalto ...

कोणी मान्य करो न करो.... यात आरक्षणाच्या नावाखाली झालेली अतिसामान्य शिक्षकभरती हे प्रमुख कारण आहे!
<<
वाह! किती सुंदर उदात्त विचार आहेत!!

काहे दिया, १०० डेज या मालिका सुरू होऊन बरेच दिवस झालेत, म्हणून केवळ त्या मालिकांचा उल्लेख केला नाही.
त्या मालिका खटकतात आणि मी तरी त्या पाहात नाही. परंतू त्या मालिकांचा उल्लेख प्रतिसादांतून आला आहे, याचाच अर्थ त्या काही रसिकांना तरी ती हिंदीमिश्रित मराठी/ शीर्षके खटकतात हाच होतो.

हा प्रश्न (दिल दोस्ती दोबारा) विचारून काय फरक पडणार आहे? असेही कुणी विचारीलच, त्यासाठीचे उत्तर-

मी व माझे काही मित्र मराठीचा आग्रह धरणारे आणि त्यासाठी काम करणारे आहोत.
फेसबुक, ट्विटर या माध्यमांतून त्यासाठी जनजागृतीचेही काम आम्ही करतो.
मालिकांमधून वापरली जाणारी भाषा सहसा लगेच लोकप्रिय होते असा अनुभव आहे. त्यामुळे मालिकांतून हिंदमिश्रित मराठी का वापरली जाते? याबद्द्ल आम्ही शोध घेतो आहोत. व्यावसायिक गणिते हा भाग कितीही खरा असला तरीही मागणीच नसेल तर पुरवठा कसा होईल? या विचाराने, लोकांचे मत जाणून घ्यावे हा हेतू ठेवून वरील प्रश्न विचारला आहे. त्यामुळे सर्वांना पुनश्च विनंती आहे की 'दिल दोस्ती दोबारा' या मालिकेचे शीर्षक खटकते का? याबद्दलचे उत्तर (शक्य असल्यास कारणासह) द्यावे.

हर्पेन- लाखमोलाचा प्रति_/\_

प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे मन:पूर्वक आभार.

कोणी मान्य करो न करो.... यात आरक्षणाच्या नावाखाली झालेली अतिसामान्य शिक्षकभरती हे प्रमुख कारण आहे!>> >>>>>उच्च विचार. यापेक्षा ती भाषेची सरमिसळ परवडली.

चैतन्य,
मालिका आणि त्यांची नावे ही काही फारशी गांभीर्याने घ्यायची गोष्ट नाही त्यामुळे ही असली सरमिसळ फारशी खटकत नाही पण निवेदक, सुत्रसंचालक आणि इतर प्रतिष्ठित मंडळी जेंव्हा चुकीचे उच्चार आणि चुकीचे शब्दप्रयोग करतात तेंव्हा ते खटकतेच खटकते!

"ते लोक" च्या ऐवजी "ती लोकं" हे तर आजकाल इतके सर्रास वापरले जाते की अजुन काही दिवसांनी तेच बरोबर वाटायला लागेल लोकांना!

>>>> कोणी मान्य करो न करो.... यात आरक्षणाच्या नावाखाली झालेली अतिसामान्य शिक्षकभरती हे प्रमुख कारण आहे!
सन्माननीय अपवाद असतीलही.... नाही असे नाही! पण हे संक्रमण फार जवळून पाहिलय म्हणून इतक्या ठामपणे म्हणू शकतो <<<<<<
विदाऊट प्रिज्युडाईस, वरील मताशी मी सहमत आहे. इतकेच नव्हे, तर या संक्रमणामध्ये आपण न बघितलेला कालखंड जो की १९४८ पासुन सुरु होतो, अन १९६५ नंतर जोमाने अंमलात आणला जातो, ज्या कालखंडांमध्ये (माझ्या मते) या संक्रमणात, अशा सर्व सरकारी नोकरीच्या क्षेत्रातील /शिक्षकी पेशातील शक्य तितक्या ब्राह्मण व्यक्तिंना येनकेनप्रकारेण हद्दपार करणे, व नविन भरति कमितकमी होऊ देणे या बाबीदेखिल येतात. त्याचे परिणाम आज भोगतो आहोत.
तर काही जण, निर्लज्ज्यपणे "भा पो शी मतलब, भाषेशी काय देणेघेणे असा युक्तिवादही करताहेत / प्रमाण मराठी कोणती यावरुन रान पेटवताहेत"

>>>> लिंब्या तुझ्यापेक्षा जास्त "निर्लज्ज" नसतील. <<<< घ्याऽऽ, माझे सद्गुण वगैरे बाजुलाच ठेवताय अन माझ्या तुम्हाला भावलेल्या तथाकथित "निर्लज्यपणाबाबतही" कांपीटीशन / तुलनात्मक स्पर्धा करु पहाताय.... Lol किती ही अधोगति? Proud

मालिका आणि त्यांची नावे ही काही फारशी गांभीर्याने घ्यायची गोष्ट नाही त्यामुळे ही असली सरमिसळ फारशी खटकत नाही पण निवेदक, सुत्रसंचालक आणि इतर प्रतिष्ठित मंडळी जेंव्हा चुकीचे उच्चार आणि चुकीचे शब्दप्रयोग करतात तेंव्हा ते खटकतेच खटकते!>>>
स्वरूप, अगदीच खटकते, परंतु ही थोडी सरमिसळ खपते आहे हे लक्षात आले की मालिका तयार करणारे अजून जास्त सरमिसळ करतात हे धोकादायक आहे. हा मुद्दा सगळ्यांना पटवून द्यायचा प्रामाणिक प्रयत्न आहे आमचा.

>>> परंतु ही थोडी सरमिसळ खपते आहे हे लक्षात आले की मालिका तयार करणारे अजून जास्त सरमिसळ करतात हे धोकादायक आहे. <<<
इतकेच नव्हे, तर जाणुनबुजुन मराठी शब्द तोडमोड करुन वापरीत "रुळवणे" हा प्रकारही मुद्दामहून केला जातो, व नंतर तो बाकिच्यांकडुन (अगदी कोब्रा देखिल बघितलेत असले अशुद्ध बोलणारे - ही कोणतीही बोलिभाषा नाहीये फक्त विकृतरित्या केलेली तोडमोड आहे जी जशीच्यातशी रुळू लागलि आहे.) सहजगत्या होत जातो उदा.:
पिशवी = "पिवशी"
कराल का = करताल का
खाल का = खाताल का
चिकटवणे = चिटकवणे - याचा उच्चार चिट कवणे, चिटक वणे असा कसाही केला जातो
चिकटवले = चिटकवले
याव्यतिरिक्त, अत्यंत अनावश्यकरित्या हिंदी वा अन्य परभाषेतील शब्द विनाकारण वापरले जाणे हे नित्याचे झाले आहे, अंगवळणी पडू लागले आहे. (त्यास मी देखिल अपवाद होत नाही) याची असंख्य उदाहरणे रोजच्या वृत्तपत्रात /मिडियामधिल उच्चारित/लिखित मजकुरात दिसतात. सुग्रास अन्नाच्या घासामध्ये दाढांमध्ये गारगोटिचा खडा येवुन मस्तकात कळ जावी, तितके दु:ख दरवेळेस होते. पुढच्या पिढ्या एक तर फार वाचित नाहीत, अन जे वाचतात, ते असले, कशी शिल्लक रहावी "मराठी" भाषा?
संतांनी रचलेल्या आरत्या असोत की मातृभाषा मराठी, तिची इतकी विटंबना पाहुन खरेच प्रश्न पडतो , कसे काय बरे हजारो वर्षे एक काना मात्राही न बदलता संस्कृत वांङमय टिकवुन धरले असेल. किती शिस्त अंगी (खरे तर मुखी) बाणवावी लागली असेल. जर कल्पना केली की संस्कृत वांङ्मय सरसकट "पब्लिक"चे मुखी लागले असते, तर एकविसाव्या शतकात त्यातिल काय मुळचे शिल्लक राहिले असते? आजही, काश्मिर ते कन्याकुमारी उभा आडव्या पसरलेल्या भारतातील अनेक उपजातींचे ब्राह्मण जे मंत्र म्हणतात, ते तालसुर वेगवेगळे असले तरी "एकही अक्षर न बदलता" आसेतु हिमालय "समानच" असतात. कोणत्या "निष्ठेमुळे" शिस्तपालनामुळे हे घडले असेल? जेव्हा दर बारा कोसावर बोलीभाषा बदलते असे म्हणणारे आपण, आसेतु हिमालय, संस्कृत इतक्या हजारो वर्षात कशी काय बदलली गेली नाही, हा प्रश्न आम्हाला पडत नाही, मुळात ते जाणूनच घ्यायचे नाही, उलट हिंदू "देववाणी" अशा संकृतला ती "बामणी" म्हणत फेकुन द्यायच्या वल्गना अन ते वांङ्मय "जाळून" टाकण्याची आतताई हिंस्रक कृती करण्यातिल शौर्य मात्र लाल्यांच्या कृपेने जिथे तिथे हल्ली दिसू लागले आहे.

चैतन्य,
मराठी भाषा, जशी वेगवेगळ्या प्रांतात बोलली जाते, तशी ती माध्यमात यावी.. असे मला वाटते.
मित्रपरीवारातही जर धुळ्याचा कुणी म्हणाला, पाणी पिलो, नाशिकचा म्हणाला, काम भेटलं, कोकणातला म्हणाला, मी आलेलो आणि नागपूरचा म्हणाला, मरुन बसला... तर चालते. पण माध्यमात तशी यायला, तसा संदर्भ हवा. ते मात्र होताना दिसत नाही.

{संस्कृत इतक्या हजारो वर्षात कशी काय बदलली गेली नाही}
नक्की का?
त्या भाषेच्या अभ्यासकाचाच धागा आहे. तेव्हा ते प्रकाश टाकतीलच.

कोणी मान्य करो न करो.... यात आरक्षणाच्या नावाखाली झालेली अतिसामान्य शिक्षकभरती हे प्रमुख कारण आहे!
५० % च बरोबर

मराठी भाषा, जशी वेगवेगळ्या प्रांतात बोलली जाते, तशी ती माध्यमात यावी.. असे मला वाटते.
मित्रपरीवारातही जर धुळ्याचा कुणी म्हणाला, पाणी पिलो, नाशिकचा म्हणाला, काम भेटलं, कोकणातला म्हणाला, मी आलेलो आणि नागपूरचा म्हणाला, मरुन बसला... तर चालते. पण माध्यमात तशी यायला, तसा संदर्भ हवा. ते मात्र होताना दिसत नाही.>>
अगदीच. त्याचे कारण मला तरी असे वाटते की 'झटपट मिळणारी प्रसिद्धी, त्या अनुषंगाने माध्यमांत काम करणार्‍या लोकांकडे आलेली 'काम उरकायची' वृत्ती. यामुळे 'अभ्यासोनि प्रगटावे' हे होताना दिसतच नाही.

Ithe dilelya pratisada varun mala vatte ahe ki ya dhagyache shirshak badalnyachi garaj ahe,,
Udaharn devun Point of view manda , udaharnalach point karu naka

>>Udaharn devun Point of view manda , udaharnalach point karu naka
म्हणजे नक्की काय? याचे उदाहरण दिलेत तर उपकार होतील.

मी साधा प्रश्न विचारला आहे, त्याला सरळ उत्तर फार थोड्या सदस्यांकडून मिळाले आहे.
परंतु प्रतिसादांवरूनही अनेकांची नापसंती समजते आहेच. तेव्हा, प्रश्नकर्ता म्हणून माझा उद्देश साध्य होतोय.
धाग्याचे नांव बदलून काय साध्य होईल? हे कळले नाही.

"Marathi malikanna Hindi shirshak dene yogy ka ayogy "
Tumha dhagyala he kiva ashya type che shirshak nyay deyil as mhanaiche ahe

गावरान भाषेला एक वेगळेच सौंदर्य आहे तिचे म्हणून एक वेगळेच व्याकरण ही असते. पण त्या त्या प्रदेशातील गावरान भाषा देखिल भेसळ युक्त / धेडगुजरी होत चालली आहे हे दु:खद आहे.

प्रमाण भाषा वेळोवेळी बदलू शकते बदलायला हवी पण त्या त्या काळात जी प्रमाण भाषा आहे ( शासन मान्यता प्राप्त / नियमांनुसार) ती (चित्रपट / नाटक नव्हे तर वर्तमानपत्रे, दुरदर्शन, दूरचित्रवाणी ) अशा माध्यमात नियमानुसारच वापरली जायलाच हवी ना! मायबोलीवरच्या जाणकारांनी एकत्र येऊन प्रमाण भाषेचं, व्याकरणाचं, भाषेच्या सुयोग्य वापराचं महत्व काय आहे याबद्दल लिहायला हवे. भाषा विषयक अभ्यास नव्याने करू पाहणार्‍या इच्छुकांकरता संदर्भ म्हणून लेख / मार्गदर्शन पर साहित्य तयार करायला हवे असे वाटते.

पिशवी = "पिवशी"
कराल का = करताल का
खाल का = खाताल का
चिकटवणे = चिटकवणे - याचा उच्चार चिट कवणे, चिटक वणे असा कसाही केला जातो
चिकटवले = चिटकवले
याव्यतिरिक्त, अत्यंत अनावश्यकरित्या हिंदी वा अन्य परभाषेतील शब्द विनाकारण वापरले जाणे हे नित्याचे झाले आहे, अंगवळणी पडू लागले आहे. (त्यास मी देखिल अपवाद होत नाही) याची असंख्य उदाहरणे रोजच्या वृत्तपत्रात /मिडियामधिल उच्चारित/लिखित मजकुरात दिसतात. सुग्रास अन्नाच्या घासामध्ये दाढांमध्ये गारगोटिचा खडा येवुन मस्तकात कळ जावी, तितके दु:ख दरवेळेस होते. पुढच्या पिढ्या एक तर फार वाचित नाहीत, अन जे वाचतात, ते असले, कशी शिल्लक रहावी "मराठी" भाषा?
संतांनी रचलेल्या आरत्या असोत की मातृभाषा मराठी, तिची इतकी विटंबना पाहुन खरेच प्रश्न पडतो , कसे काय बरे हजारो वर्षे एक काना मात्राही न बदलता संस्कृत वांङमय टिकवुन धरले असेल. किती शिस्त अंगी (खरे तर मुखी) बाणवावी लागली असेल. जर कल्पना केली की संस्कृत वांङ्मय सरसकट "पब्लिक"चे मुखी लागले असते, तर एकविसाव्या शतकात त्यातिल काय मुळचे शिल्लक राहिले असते? आजही, काश्मिर ते कन्याकुमारी उभा आडव्या पसरलेल्या भारतातील अनेक उपजातींचे ब्राह्मण जे मंत्र म्हणतात, ते तालसुर वेगवेगळे असले तरी "एकही अक्षर न बदलता" आसेतु हिमालय "समानच" असतात. कोणत्या "निष्ठेमुळे" शिस्तपालनामुळे हे घडले असेल? जेव्हा दर बारा कोसावर बोलीभाषा बदलते असे म्हणणारे आपण, आसेतु हिमालय, संस्कृत इतक्या हजारो वर्षात कशी काय बदलली गेली नाही, हा प्रश्न आम्हाला पडत नाही, मुळात ते जाणूनच घ्यायचे नाही, उलट हिंदू "देववाणी" अशा संकृतला ती "बामणी" म्हणत फेकुन द्यायच्या वल्गना अन ते वांङ्मय "जाळून" टाकण्याची आतताई हिंस्रक कृती करण्यातिल शौर्य मात्र लाल्यांच्या कृपेने जिथे तिथे हल्ली दिसू लागले आहे.

>>>

आता तुम्ही इतकं म्हणताच आहात, म्हणून म्हणतो. वरच्याच प्रतिसादात तुम्ही 'वांङमय', 'वांङ्मय' अशा दोन प्रकारे एकदा जोडाक्षररहित आणि एकदा जोडाक्षर वापरून हा शब्द लिहिला आहे. त्यातला कोणता बरोबर, हे तुम्हालाही ठाऊक नाही. कारण ते दोन्ही चुकीचे आहेत. 'वाङ्मय' असा तो शब्द आहे. तुम्हीही तुमच्या व्याख्येनुसार मातृभाषेची विटंबनाच करता आहात. फक्त स्वतः ती करून दुसर्‍याने केली म्हणून बोंब मारायचा तुमचा स्वभाव आहे, एवढेच.

लिंबू.. रुळवणे हा प्रकार खरोखरीच होतोय..
दोन उदाहरणे.
१) जाऊयात का ? करुयात का ?
२) मिळवल्या गेले आहे.

शिर्षक खटकते. केवळ हिंदी आहे म्हणुन नव्हे तर ओढुन ताणुन आणल्यासारखे वाटते.

त्याच प्रमाणे मला ’हृदयात वाजे समथींग’ हे गाणे पण खटकते. परत केवळ त्यात इंग्रजी शब्द आहेत म्हणुन नव्हे तर इथेही ओढुन ताणुन बसवल्यासारखे वाटते.

Pages