अश्शी बायको हवी

Submitted by आनन्दिनी on 7 February, 2017 - 17:58

नोकरीवाली बायको हवी
पण नोकरी इतकीच असावी
की घरच्या पुरुषावर स्वयंपाकाची
पाळी कध्धी ना यावी

सुशिक्षित बायको हवी
पण इतकी शिकलेली नसावी
की सरळसरळ तिची मतं
ठामपणे सांगत असावी

शांत सुसंस्कृत असावी
पण इतकीही चांगली नसावी
की चारचौघांत माझ्यापेक्षा
तीच उठून दिसावी

पुरोगामी विचारांचा तो बायकोशी चांगला वागतो.
चांगला वागतो हे सुद्धा चार चार वेळा सुनवतो.
जगाला फसवतो, तिला फसवतो
की स्वतःलाच फसवतो .........

आनन्दिनी
https://drmadhurithakur.blogspot.co.uk/

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

पुरोगामी विचारांचा तो बायकोशी चांगला वागतो.
चांगला वागतो हे सुद्धा चार चार वेळा सुनवतो.
जगाला फसवतो, तिला फसवतो
की स्वतःलाच फसवतो .........
सोपे शब्द आणि सरळ मांडणी तुमच्या सगळ्याच कविता अप्रतिम असतात. ही कविता पण लय भारी .. आप्रतिम..!!

मस्त! परफेक्ट आहे.
मेरे ब्रदर की दुल्हन च टायटल साँग आठवलं , त्याचाही आशय हाच आहे.