जँक फ्लेचर अँन्ड द इनव्हीजीबल ट्रेजर ऑफ किगं बार्बोसा. भाग १

Submitted by Mayur Mahendra ... on 6 February, 2017 - 03:21

टि्ग टि्ग Sssss, टि्ग टि्ग Sssss, टि्ग Sssss, टि्ग टि्ग Sssss, टि्ग टि्ग Sssss
आपल्या आवडत्या आकाशी रंगाच्या शर्टची बटणं लावत फोन रिसीव्ह करण्यासाठी तो धावतच हॉलमध्ये आला.
"हँलो, यस प्लीझ जँक स्पीकीगं" ऊत्साहाच्या भरात फोन उचलून त्या वेड्यानं अगोदरच प्रतीउत्तर दीलं. आणी मग अचानकच समोरून येणारा रडवेला आवाज कानी पडताच त्याच्या चेहऱ्यावर हळूहळू गंभीरतेचे भाव पसरू लागले
रॉकीच्या आईने फोन केला होता त्याला, त्या रडतच रॉकी हरवल्याची दूखःद बातमी सांगत होत्या.
" बघ ना जँक तूझ्या ओळखीने जर काही होत असेल तर.. "
त्यांच्या आवाजातून कमालीची निराशा जाणवत होती मग थोड्या वेळाने स्वतःला सावरत एक मोठा आवंढा गीळून त्या पूढे बोलू लागल्या.
".मी परवाच पोलीस स्टेशनमध्ये पून्हा जाऊन आले रे पण त्यांच्याही हाती अजून महव्ताचं असं काहीच लागलं नाही........माझा रॉकी बिचारा कूठे गेला असेल कूणास ठाऊक " त्या मातेला लागलेली आपल्या मूलाची आतूर ओढ स्पष्ट झळकत होती. भावना अनावर होऊन त्या पून्हा ढसाढसा रडू लागल्या.
क्षणभर का होईना पन जँकलाही रॉकीचा निरागस चेहरा आठवला पण मनातच. अखेर परीस्तीतीची जाणीव होताच स्वतःला सावरत जँकने रॉकीला शोधून काढण्याचं आश्वासन देत त्याच्या आईचं सांत्वन केलं.
" आंटी तूम्ही आता फार काळजी करू नका, मी रॉनला देखील लवकरात लवकर कळवतो, आम्ही दोघं रॉकीला नक्कीच शोधून काढू. तो आपल्याला जरूर सापडेल........"
तशी परीस्थीतीही खूप गंभीरच होती म्हणा कारण मागील पंधरा वीस दिवसांपासून रॉकीचा कूठेच काही पत्ता नव्हता. त्याच्या आईने तेथील स्थानीक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करून आता जवळजवळ सात दीवस होत आले होते. अगदी पोलीसच काय तर त्याचे सर्व नातेवाइक, मीञमंडळी देखील त्याला शोधून थकली होती.
रॉकीच्या आईचं संपूर्ण बोलणं एकून झाल्यावर जँकने रिसीव्हर खाली ठेवला.
" रॉनला आता लगेचच कळवायला हंव नाहीतर खूपच ऊशीर होईल " स्वतःशीच पूटपूटत त्याने आपला लँपटॉप ऊघडला
त्यावर चार ईमेल झळकत होते

Announcement : script schedule for triller show

Massege details
From : jhonson push
।@vishion.com
To : me
Date : 21 may, 2015

Congratulations Jack Flecher You had got chance for the script writing of our new show 'one night killed'
So you will be Complited our show script before 22 August 2016
Further new shows, topic, and related information will be provided by us on time to time.
Thank you
जँकने पूढचा मेल ओपन केला त्यात शो संबधीत महत्वाची प्रोसीजर समजावण्यात आली होती.
जँक मेल वाचत असतानाच हातात दोन प्लास्टीकच्या काळ्या पीशव्या घेऊन त्याचा रुमपार्टनर आत आला. रुमपार्टनर कसला जँकचा जिवलग मीञच होता तो. अगदी जँकचे आईवडीळ गेल्यापासून त्यानेच जँकला धीर दीला होता.
खंरतर जँकची आई जरी भारतीय वंशाची असली तरी त्याचे वडीळ माञ एक आमेरीकन नागरीक होते. सूरवातीला तो आपल्या आईसोबत इंडीया मध्येच राहत होता पण त्याचे आईवडीळ वारल्यानंतर तो अर्जेनटीनामधील आपल्या वडीलाच्या घरी राहायला आला ऊशाई इथे रॉन व तो भाडयानं राहता होते.
" काय रे काय झालं ? एवढं काय आहे त्यात ईतका मन लावून वाचतोयेस ते ? " रॉनने सहजच विचारलं .
" अरे मला जॉनसन प्रोडक्शन कडून त्याच्यां नवीन शोच्या स्क्रीप रायटीगंसाठी ऑफर मिळाली आहे "
" कॉग्रँजूलेशन जँक दँट ईज अ ग्रेट न्यूझ यार "
" तू एवढे दिवस ज्यासाठी प्रयन्त करत होतास अखेर ते तूला भेटलंच........अं अं पण तूझ्या चेहऱ्याकडे पाहून तरी तूला आनंद झालेला दिसत नाही........काहीतरी गडबड आहे माञ नक्की "
रॉनने जँकचा चेहरा क्षणार्धात वाचला होता एवढी मोठी ऑफर मिळूनही तो खूश दिसत नव्हता.
" काय झालं, काय प्रॉब्लेम आहे जँक ? आणी फोन कोणाचा होता रे ? "अखेर तो आल्यापासून त्याला सतावणारी शंका त्याने जँकला विचारलीच "
" तूला कसं माहीत रे की मला फोन आला होता
ते "
" रिसीव्हर तर निट ठेवायला शीक वेड्या "
जँकने लँपटॉप ऊघडायच्या गडबडीत घाईघाईनेच फोनचा रिसीव्हर ऊलटा ठेवला होता हे रॉनच्या देखील नजरेतून सूटू शकलं नाही.
" तूला ऊगाचच डिटेक्टीव्हची नोकरी मिळाली नाही.......रॉन तू खरच एक बूद्धीमान व हूशार ईन्वेस्टीगेटर आहेस "
" हो हो ते मला माहीत आहे माझी ऊगगचच तारीफ करून तू आता विषय बदलण्याचा प्रयन्त करू नकोस, काय प्रॉब्लेम आहे ते सांग आधी "
" अगदी धन्य आहेस तू रॉन मघापासून मी तूझी एवढी प्रशंसा करतोयो त्याच तूला काही नाही असो............मी आता सरळ मूद्यावरच येतो "
काही वेळ शांत राहून तो पूढे म्हणाला
" थोड्या वेळा पूर्वी रॉकीच्या आईचा फोन आला होता मला. त्या एवढ्या रडत होत्या ना मलाच कसंस वाटलं आपणही त्याला शोधण्यासाठी प्रयन्त सूरू केले पाहीजे रे, नूसतं आपल्याला आता पोलीसांवर अवलंबून भागणार नाही "
" हो तू अगदी बरोबर बोलतोयेस मला पण तेच वाटतंय......
मग पूढे काय म्हणाल्या त्या ? रॉकीचा काही पत्ता लागला का ? मला तर आता वेगळीच शंका येतेय यार , बघ ना एवढे दीवस होऊनही तो अजून कोणालाच कसा काय सापडत नाही " रॉन
" म्हणजे ?"
" म्हणजे मला म्हणायचं आहे की, कदाचीत कोणी त्याला किडनँप वैगरे तर केलं नसेल ना कींवा...... " रॉनने जँकसमोर खूप विचारपूर्वकच आपलं मत मांडल होतं.
" हो याची शक्यता असू शकते, पण तू कशाच्या आधारावर हे ठामपणे सागूं शकतोस की रॉकीला कोणी किडनँपच केलं असावं " जँक
ठामपणे असं नाही रे पण तरीही बघ ना रॉकी स्वत:हून हरवण्याईतपत मूर्ख तर नाहीच नाही मी त्याला खूप आधीपासून ओळखतो भांडणामूळे तो काही घर सोडून जाणाऱ्या पैकी मला वाटत नाही " रॉन
" पण त्याला कोण का किडनँप करेल ? तो ना कधी कोणाच्या आध्यात ना मध्यात आणी तू म्हणतोस तसं जरी आपण गृहीत धरलं तरी एव्हाना किडनँपरचा फोन यायला हवा होता ना तो गायब झाल्यापासून आतापर्यत पंधरा विस दिवस होत आले पण तसं तर अजून काहीच घडलं नाही."
जँकच्या बोलण्यातही तथ्य होतं
" मला मूळात हेच कळत नाही की आपण रॉकीला शोधायचं कसं ?" रॉन
हा प्रश्न देखील त्याच्यांसाठी अजूनतरी अनूत्तरीतच होता त्यामूळे क्षणभर त्या दोघां पैकी कोणीही काहीच बोललं नाही ते दोघंही थोडावेळ विचारातच पडले.
" काळजी करू नकोस काही ना काहीतरी मार्ग तर नक्कीच निघेल शिवाय आता ही केस आपल्याच हातात आहे " जँक
" मला वाटंत जँक आपण याबद्धल रॉकीच्या आईशी चर्चा करायला हवी तरच आपल्याला नक्की काय घंडलय याचा अंदाज बांधली येईल " रॉन
" हो एक्झ्याक्टली अगदी बरोबर बोललास मला ही तेच सांगायचं होतं, आपण ऊद्या सकाळीच रॉकीच्या घरी जाऊन येऊ "
पेगं आल्यामूळे तोडांवर हात ठेवूनच जँक बोलत होता खरंतर रॉकीच्या विचारमथंनात पूढचे दोन तास कसे निघून गेले हे त्यानाही कळलं नाही.
मग फार कष्ट न घेता रॉनने आणलेल्या चायनीजवर ताव मारून ते दोघंही हळू हळू झोपण्याच्या तयारीला लागले.

क्रमश:
पुढील भाग लवकरच........

भाग २ साठी
http//www.maayboli.com/node/61642

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरुवात मस्त आहे...!!! जरा लवकर लवकर भाग टाका म्हणजे कथे मधला इन्टरेस्ट टीकुन राहील....!!!

दर्जा.......
पुढचा भाग लवकर येऊ दे