तारूण्याचा लिलाव केला बेकारीने

Submitted by सुप्रिया जाधव. on 31 January, 2017 - 23:39

विजयी होउन राजा येण्याच्या खात्रीने
प्राणपणाने महाल जपलेला राणीने

पाठीवरती ओझे वाहत बाल्य खर्चले
तारूण्याचा लिलाव केला बेकारीने

दागदागिन्यांमध्ये त्याने जरी मढ़वले
गळा कापला तिचा तिच्या काळ्या पोतीने

वर्ख सुखाचा कालपरत्वे उडून गेला
दिला मुलामा आठवणींचा तिथे खुबीने

रात्ररात्रभर कळ्या जागल्या फुले उमलली
खुडले नाही कुणी दिला आश्रय मातीने

किनार्यावरी येउन फुटणे सोपे नसते
ऐकुन आले अकांत लाटांचा जातीने

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्ख सुखाचा कालपरत्वे उडून गेला
दिला मुलामा आठवणींचा तिथे खुबीने

किनार्यावरी येउन फुटणे सोपे नसते
ऐकुन आले अकांत लाटांचा जातीने >>>>>>>>>>>>

लाजवाब.........