कितीशी राहिली बाकी सहल ?

Submitted by सुप्रिया जाधव. on 20 January, 2017 - 08:04

मनामध्ये नको ठेवूस सल
कळीला सांगतो काटा उमल

तिच्यापासून गेला दूर तो
जगाला वाटते आहे नवल ?

तरंगावे कधी व्हावे गगन
मलाही व्हायचे आहे ' सिगल '

तुझ्यावाचून बेचव जिंदगी
चवीला आसवांचे दे ' पिकल '

तुझ्यापाशी पुन्हा परतायचे
कितीशी राहिली बाकी सहल ?

तुला भेटायचे होते मला
मनाने घेतली नाही उचल

किती झालाय गुंताडा ' प्रिया '
स्मृतींचा पेच हलक्याने उकल

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुझ्यापाशी पुन्हा परतायचे
कितीशी राहिली बाकी सहल ?
तुला भेटायचे होते मला
मनाने घेतली नाही उचल
किती झालाय गुंताडा ' प्रिया '
स्मृतींचा पेच हलक्याने उकल>>>अप्रतिम........