फसवे चेहरे

Submitted by गवंडी ललिता on 20 January, 2017 - 02:04

फसवे चेहरे
आज भेटले पुन्हा
तेच चेहरे नव्याने
नाही कळले मला
फसवले मुखवट्याने......

हीच माझी माणसे
जवळ केले तयानां
नाही कळले मला
फसले मी सावल्यानां......

आपलेच आहे सारे
संस्कारीत केले मनाला
क्षणात केले परके
काय म्हणावे माणुसकीला......

काय चुकले नाही कळले
साथ दिली मनाला
फसते मी आजही
त्याच त्याच चेहऱ्यांना......

ललिता गवंडी

Group content visibility: 
Use group defaults

काय चुकले नाही कळले
साथ दिली मनाला
फसते मी आजही
त्याच त्याच चेहऱ्यांना......>>>>खूपच छान ! ! !
ताई तुम्हाला कस काय हो जमतात कविता?