अॅमेझॉनवर तिरंग्याचा अपमान

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 January, 2017 - 23:14

कॅनडा येथील अॅमेझॉनच्या वेबसाईटवर भारताच्या राष्ट्रध्वजासारखी पायपुसणी विक्रीला ठेवण्यात आली आहेत.

http://m.dailyhunt.in/news/india/marathi/lokmat-epaper-lokmat/tirangyach...

बातमी ऐकताच चीड यावी अशी आहे. सोबत तसेच खरमरीत शब्द वापरून ती तशी पसरवली जाते. पण सुरुवातीचा रागाचा जोर ओसरल्यावर प्रश्न पडतो की हे असे मुद्दाम करतात का? व्यावहारीकदृष्ट्या विचार करता कोण स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेणार. मागे आमीरचे एक देशासंबंधित विधान लोकांना आवडले नाही तर भारतीयांनी टाकलेल्या बहिष्काराची दखल घेत स्नॅपडीलने आमीरला हटवले होते. त्यामुळे एमेझॉन जाणूनबुझून असे करेन याची शक्यता त्या दृष्टीने कमी वाटते. तसेच आणखी एक म्हणजे ईतरही काही देशांचे राष्ट्रध्वज तिथे बिनधास्त विक्रीला ठेवले आहेत. आणि कदाचित त्या देशांचा यावर आक्षेपही नसावा. तर त्यामुळे आपल्यालाही गृहीत धरून ही चूक घडली असेल का? की नाही, ही मुद्दामच काढलेली खोड आहे?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सत्य जगासमोर आहे.. विकत घ्या आणि वाचा
सत्य साठी पैसे मोजावे लागतात
खोटे तर जाहीर सभेत रोज फुकट ऐकायला मिळते ना Wink

किंमत असते म्हणण्यापेक्षा लावली जाते, म्हणूनच सत्य सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेरच जाते.

अवांतर -
सच सुननेवाले अपने जेब मे पिस्तोल और सीनेमे नफरत नही लेके आते.
बहुत बडा कलेजा लगता है सर, सच को सुनने के लिये
- शाहरूख, परदेस

बाकी अ‍ॅमेझॉनवर विकत घेता येईल का ते पुस्तक?
कि त्यावर बहिष्कारच टाकायचा आहे? काय ठरतेय ईथे?

मागच्या पानावरची विकुंची पोस्ट वाचली आणि पटली. माझ्यापुरतं सांगायचं तर मी राष्ट्रध्वजाचं चिन्ह असलेल्या वस्त्तू घेतलेल्या नाहीत, घेणार नाही- कोणत्याही देशाच्या. त्यातल्या त्यात टीशर्ट घेणं सोपं आहे पण तो ही आजवर घेतलेला नाही कधी.

>>आपण हेच केले पाहिजे. चर्चा नको, ऊहापोह नको, सरकारतर्फे बंदी नको; आपणच स्वयंस्फूर्तीने हे काम केले पाहिजे!! राग>> शरद, तुमचा मुद्दा बरोबर आहे. पण काय आहे की अ‍ॅमेझॉनवर बंदी घालण्यापेक्षा इथे बीबी काढून तावातावाने देशभक्तीपर पोस्टी पाडणं जास्त सोप्पं आहे. तेवढंच आत्ताच्या सरकारला शिव्या घालायला आणखीन एक संधी आणि जागा मिळते. इथे लिहून मग जायचं अ‍ॅमेझॉनची कार्ट कुठवर आली हे बघायला. Wink

आताचे सरकार जे करते त्याचेच फळ त्याला मिळत आहे Biggrin
या आधीच्या सरकारला पण शिव्या देत होतात ते चालत होते वाटते.

मागे फेसबुकच्या कोण्या उच्चपदस्थाने भारतीयांना थेट शिव्या घातल्या होत्या. त्यावेळेला फेसबुक सोडायचा विचार कोणाच्य मनात आला नाही. हे देशभक्तीचे सिलेक्टीव उमाळे आणि पार्शल बॉयकॉट च्या गोष्टी सरकार इन्वॉल्व असेल तेही आपल्या आवडत्या पक्षाचं असेल तरच येतात काय?

तेच आवडत्या पक्षाच्या नेत्याने तीन रंगाच्या कापडाला योग सुरु असताना तोंड पुसलेले चालते. तेव्हा कुणाच्या देशभक्तीचे उमाळे फुटत नाही.

>>आताचे सरकार जे करते त्याचेच फळ त्याला मिळत आहे>> नीट वाचा हो. कोणतंही सरकार जे काय करेल त्याचं फळ त्यांना मिळेल ह्याबद्दल बोलत नाहीये. मायबोलीकर काय करतात त्याबद्दल बोलतेय.

हो,हो, अगदीच. आता तुम्ही वापरलीच आहेत तर मी ही वापरुन घेते. 'आपला तो बाब्या, दुसर्‍याचं ते कार्ट'. (दोन्ही पार्ट्यांना लागू). पण हा म्हणींचा बीबी नाहीये.

याआधीच्या काळात त्यांच्या लाडक्या सरकारांनी कधी कोणाला अशी समज दिली नाही, आणि आताच्या सरकारने दिली, त्यामुळे त्यांना खवखवत आहे आणि विषय भरकटवत आहेत.
धाग्याचा मुळ विषय काय, लिहितायत काय ? काहीही चालले आहे.
फार रिस्पॉन्स देऊ नका कोणी असल्या ट्रोलिन्गला.

दीपस्त, थोडक्यात सांगितले असतेत त्या पुस्तकाचा सारांश तर चालले असते. तुमचा मुद्दा समजावून घ्यायला लगेच पुस्तक विकत घ्यायला कोणी जाणार नाही. नाहीतर असले मुद्देच लिहू नका ज्यात हे वाचा, ते जाऊन वाचा तरच कळेल... वगैरे लिहावे लागते.

काल नकाशाचे रंग व चक्र असलेल्या बुटाचे पण चित्र फिरत आले व्हाटसपवर.

हो, गांधीजींचा फोटो स्लिपरवर असा फोटो मी देखील व्हॉटसपवर फिरताना पाहिला.
जर हे देखील खरे असेल तर नक्कीच यामागे काहीतरी खोडी आहे किंवा कोणीतरी गेम करतेय.
असे बार बार लगातार कसे घडेल?
जर अ‍ॅमेझॉनचीच खोडी असेल तर यात त्यांचा फायदा काय हे शोधणे रोचक,
जर कोणी गेम करत असेल तर यानंतर कोण चवताळून उठतेय आणि कोणाचा फायदा होतोय हे बघणे रोचक.

नवीन बातमी अमेझॉन च्या थर्ड पार्टी वेंडरने फ्लिप फ्लॉप वर गांधीजींचे फोटो छापले आहे.> अरे काय त्रास आहे Angry

अय्या नवीन माबोत रागाची स्माइली नाही? म्हणजे कुणी कुणावर रागावणार नाही का? Happy
का मीच चुक केलीये?

याआधीच्या काळात त्यांच्या लाडक्या सरकारांनी कधी कोणाला अशी समज दिली नाही, >
महेश आधीच्या सरकारचा धाकच इतका होता की कोणी असे करायची हिंमत करत नव्हते. कळलं

BTW सुषमा जींनी गांधींचा चेहरा असलेल्या स्लीप्पर ची दखल घेतली की नाही?
गांधीजी सुद्धा नॅशनल इन्ब्लेम आहेत ना?

दीपस्त, लिंक वाचली. खरी असो वा खोटी, ईंटरेस्टींग होती. मला नेमके देण्यामागचा हेतू तेवढा समजला नाही.

हा हा हा !!!
फार हसवतात काही लोक. त्यात त्यांची चूक नाही, तर त्यांना झालेली काविळ कधीच बरी होऊ शकत नाही, म्हणुन ते सतत हसा आणि हसवा करून दु:ख विसरायचा प्रयत्न करत असतात.

अमेझॉनवर थर्ड पार्टी रिटेलर सामान विकायला ठेवतात. सगळ चेक करण शक्य नसत. इतर देशात झेंड्याचा असा वापर केलेला चालतो.
सुषमा स्वराज ह्यान्चे tweet मी काही तासातच वाचले आणि लगेच अमॅझॉन चेक केले. मला फक्त US आणि UK चे झेंडे असलेले पायपुसणे दिसले. ह्याचा अर्थ अमॅझॉनने त्वरित दखल घेतली आणि ते प्रॉडक्ट काढून टाकले. म्हणजे त्यांनी मुद्दाम केले नवहते. सुषमा स्वराज ह्यांचं सांगण्यानुसार त्यांनी माफी पण मागितली. ते प्रॉडक्ट जितका वेळ अमॅझॉन वर होते त्यापेक्षा जास्त वेळ तर लोकांनी social मीडिया वर टाकले.
आमच्या विदर्भात ह्याला म्हणतात 'चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला'
My पॉईंट is - आपण इतरांना समजून घ्यावं. जस अमॅझॉनने केले

आमच्या विदर्भात ह्याला म्हणतात 'चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला'
>>>
हे आमच्या कोकणातही म्हणतात. म्हणजे आमच्या घरच्यांच्या तोंडी तरी ऐकलेय हे.
अवांतर आहे, पण अगदीच राहावले नाही म्हणून .. Happy

piyushgoyal-1484640160.jpgऊर्जामंत्री पियुष गोयल यांच्या गतस्प्ताहातील अबुधाबी दौर्‍यातील देशाचा गौरव वाढवणारा एक क्षण.

Pages