टिंगलच्या निमित्ताने ......निरर्थक धागे विणण्याचा कंटाळा येत नाही का ?

Submitted by आईची_लेक on 9 January, 2017 - 05:27

टिंगलीच्या निमित्ताने हा माझा शेवटचा धागा .....पण सर्वात बिनकामाचा धागा

जे टिंगल करतात त्यांच्यासाठी शीर्षकच बोलके आहे , जे टिंगल करत नाहीत त्यांना मी समजावणार नाही ...

जेव्हा धागेश्वर (धाग्यावेताळ )यांना जाणवते की आपण अभ्यासपूर्ण धागे तर विणू मात्र चर्चेत समोरच्याशी बोलताना आणि योग्य प्रतिवाद करताना जे सामान्य ज्ञान लागते ते आपल्याकडे नाहीये आणि यासाठी एकाच उपाय म्हणजे निरर्थक धागे काढणे अर्थात हा उपाय देखील सोपा होता म्हणूनच त्याच्या डोक्यात आला कारण अर्थपूर्ण धागे काढणे त्याला जमणारे नव्हते . अगदी वेगळे डू आयडी काढून त्यानी स्वतः धागे विणले आणि वाचकांना पिडले

तर आता थोडा वेळ टिंगल विसरा आणि कुठलाही माहितीपूर्ण धागा घ्या ज्यात बुद्धी बरोबर सामान्य ज्ञानाचीही गरज लागते , अशा वेळी खरंच हे गरजेचे असते

उद्या जर मायबोलीवर निरर्थक धाग्याचे फॅड वाढले सगळेच जाणकार वा हुशार निरर्थक धागे विणू लागले तर आपल्या निरर्थक धाग्याला शतकी प्रतिसाद मिळण्याच्या आशा त्याच पटीत कमी होतील का ?

अभ्यासू धाग्यातून ह्या लेव्हलचे मनोरंजन होईल का ?

अनेक माहितीपूर्ण धाग्यांच्या तुलनेत माझे भारंभार धागे जास्त मनोरंजक असतात ना ?( कृपया कोणी लगेच मला अभ्यासपूर्ण धागा काढण्याचे आव्हान देऊ नये ,कारण त्या धाग्यातले मुद्देसूद प्रतिसाद ग्राह्य धरले जाणार नाहीत )

मोजके पण मुद्देसूद धागे काढणाऱ्यांना मात्र मी आव्हान देऊ इच्छितो निरर्थक धागे काढा आणि तरीही आपणच कसे शहाणे हे सिद्ध करा
माझा माझ्या अतिशहाणपणावर पूर्ण विश्वास आहे

आमचे प्रेरणा स्थान - तुम्हीच ओळखा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सत्य असे आहे की या मायबोलीवर, राजकारण, अध्यात्म, अर्थशास्त्र अश्या गंभीर विषयांवरील धाग्यांनाही "विनोदी" प्रतिसाद देऊन, विषय बदलून, अर्थहीन करून टाकतील असे बरेच लोक इथे आहेत. त्यामानाने अर्थहीन धागेच बरे, अपेक्षाच नसतात त्या धाग्यांकडून.

नन्द्या ४३ आपले म्हणणे पटले.

ऋन्मेषचे धागे टीपी असतात असे म्हणणे धाडसाचे आहे. ते चावून चोथा झालेल्या विषयावर नव्याने काढलेले असू शकतात किंवा इरीटेटिंग असू शकतात. बरेचदा वैतागाने प्रतिसाद येतात, काहींचे विनोदी येतात.

पण ऋन्मेष कधीही उलटून बोलत नाही हा त्याचा गुण मला सर्वात जास्त आवडतो. (काही काही नियमित फटकारणा-या सदस्यांना नियमित नव्याने उगवणारे आयडीज चेपत असतात म्हणा .. हो कि नाही ऋ ? )

पण उगीच धागा पेटवण्याचा प्रयत्न म्हणून काही तरी मिस इंटरप्रिटेशन करून विचारलेल्या प्रश्नाला जर त्याच्या विपूत उत्तर दिले तर मात्र तो त्याची दखलही घेत नाही हा त्याचा गुण मला अजिबात आवडत नाही. Wink

बरं

मी पण बोअर झाल्यावर धागे विणते. Proud
कदाचित गप्पांच्या पानावर नसल्याने फोरम मधे टाईमपास होत असावा. फोरम मधे एकही आवडीचा विषय नसेल तर मग आपल्या आवडीचा विषय शोधणे, तो शिळा असल्यास नव्याने धागा काढावासा वाटणे अशी काहीतरी प्रोसेस माझ्याही नकळत होत असावी. (कधी कधी जेयुइनली माहिती हवी असते किंवा एकटी असले की काही न काही शेअर करावंसं वाटत राहतं)

खरं तर सोशल मीडीयावर दिवसातून अधून मधून मी का येते (कधी कधी पहाटे उठल्यावर सुद्धा) हेच माझं मला कळत नाही किंवा कळून पण वळत नाही असं म्हणणं योग्य राहील. जे अगदी थोड्या वेळासाठी सोशल मीडीयावर येतात त्यांचा मला प्रचंड हेवा वाटतो. रात्री जाग आली तरी सोशल मीडीयावर चक्कर टाकली जाते...

उगीच ऋ च्या नावाने पावती फाडण्यात काय अर्थ आहे ?

उगीच ऋ च्या नावाने पावती फाडण्यात काय अर्थ आहे ?
अहो ऋंनी पैसे दिले असतील तर पावती फाडाच हो!!! उगाच सेल्स टॅक्स, इन्कम टॅक्स चुकवल्याचा आरोप येइल. Happy

इथल्या भारतीय दुकानदारांचे हेच धंदे - कॅश घ्या नि पावती देऊ नका! भारतीय परंपरा राखली हो त्यांनी परदेशात येऊनहि.

गेला तुमचा धागा कुठल्या कुठे? अशी अस्ते गंमत! Happy

सपना कोणती विपू. मी कमी चेक करतो विपू. शक्यतो मी लोकांशी विपू विपू खेळत नाही. उगाच आपुलकीचे संबंध जोडले जातात. मला ते आवडत नाहीत. थप्पड से डर नही लगता साबजी प्यारसे लगता है. कोणत्याही प्रेमाच्या नात्यापासून मी दूरच राहतो. लोकांना माझ्या आयुष्यात फार शिरकाव करू देत नाही. मी लोकांच्या आयुष्यात डोकावायला जात नाही. मग कोणाला वाटते मला एक सोडून चार चार गर्लफ्रेंड आहेत. कोणाला वाटते मला बायकोही आहे. कोणी सोबत दोन पोरीही जोडतो. कोणी मला चाळीशीचा गृहस्थ समजते. कोणी ईजिनीअर बोलते. एवढे व्यापताप प्रपंच सांभाळून मी ईत्र तित्र सर्वत्र कसा बागडतो असा कोणाला प्रश्न पडतो. तर कोणी हे ही काय कमी म्हणून आणखी चार आयडी माझ्या नावापुढे जोडतात. मग एवढ्या आयडींसह माझे ईथे बागडणे विश्वासार्ह वाटायला दंतकथा रचल्या जातात. कोण म्हणते मला रावणासारखी दहा डोकी आहेत आणि मी एकाच वेळी दहा डोक्यांनी विचार करत दहा प्रोफाईलमधून दहा धागे काढू शकतो. तर कोणी म्हणते मला दोन डोळे आणि बारा हात आहेत ज्याने मी एकाचवेळी सहा किबोर्ड वापरू शकतो. तर कोणी म्हणते.. थांबा जरा.. ब्रश झाला.. आलो चूळ मारून..

विपू केली म्हणजे हवेत उडायला नको. घरात बायको असताना गर्लफ्रेण्डच्या गप्पा हाणतोस ते पुरेसे आहे. जास्त लाडात यायची आवश्यकता नाही. तू विचारलेल्या इरीटेटिंग प्रश्नाचे उत्तर विपूत दिले म्हणजे तुझ्या आयुष्यात डोकावणे झाले का ? तेव्हढा वेळही नाही आणि इंटरेस्ट तर अजिबात नाही. ज्याला फालतू विषयावर धागे विणावेसे वाटतात त्याला मिलणा-या गर्लफ्रेण्ड्स त्याच लायकीच्या असतील ना ? ते ही ऋन्मेष हा पगारी आयडी चालवणारी व्यक्ती स्त्री नसेल तर... मग ही नाईकांच्या वाड्यातली भुतावळ आहे !

सपना,
याच कारणासाठी मी लोकांशी विपू विपू खेळत नाही. सोशलसाईटवर लोकांना आयडीमागची व्यक्ती कोण कशी आहे हे माहीत नसताना तिच्याबद्दल मत बनवायची आणि तिच्या प्रतिसादांचे आपल्या मनाने अर्थ काढायची घाई असते.
तुम्ही माझ्या प्रतिसादाचा चुकीचा अर्थ काढून आपले मन दुखावून घेऊ नये ही विनंती. गॉड ब्लेस यू टेक केअर कीप स्क्रॅपिंग Happy

तुम्ही माझ्या प्रतिसादाचा चुकीचा अर्थ काढून>>> विपू केल्याचा चुकीचा अर्थ काढून फाजीलपणा वाढू नये म्हणून लायकी दाखविणे गरजेचे होते. अफेअर करायचेच असते तर चॉइस नाही का आम्हाला? असला सडकछाप भिकारडा आयडी कशाला पाहिजे? नाही का?

अरे बाप्रे!

ऋन्मेषा ये क्य अहुवा..

रच्याकने आजकाल तुझे प्रतिसाद पुर्वी सारखे येत नाही हेच खरे..... नवा आवतार घ्यायची वेळ झालीये तुझी Proud

मी नाही मधे.. ऋला असं कसं काहीही म्हणु शकता तुम्ही? आम्ही फॅनक्लबवाले गप्प बसणार नाय Proud
पहिल्या अवताराचा वध यायलाच हवा असं काही नाही. पहिल्या अवताराने लॉगिन कमी करावं लागेल त्याला इतकंच

माझ्या सल्ल्याची गरज नाहे खरं तर याबाबत त्याला... तो ऑर्कुट कोळून प्यायलाय याबाबतीत

माझ्यासारखा मराठी मिडियम जेव्हा बोलतो तेव्हा आपल्याला येणारे दोनचार ईंग्रजीचे शब्द झाडणे हा हेतू असू शकतो Happy

कुठल्याही गोष्टीत तेच तेच झाले की कंटाळा येतोच. जसे कोणीही मनुष्य अमर नसतो तसेच जगात अवीट असे काही नसते. नट असो, खेळाडू असो वा लेखक असो, ज्याला थांबायचे कुठे हे कळते त्याचे नाव होते न जमल्यास हसे होते. लोक फक्त वर्तमान बघतात. तुमचा सुंदर भूतकाळ तुम्हाला सहानुभूती मिळवून देऊ शकतो, सन्मान नाही.

त.टी. - सुचले ते लिहिले, कोणाला वैयक्तिक उद्देशून नाही.

धग्येच नाव बडला... रुंणेशभौ आनि त्यांचं कौतूक..
बे द वेय... माला रुंमेश भौ चे लेख फर अवडतात.. निवेदक 10 मदे 2 त्यांचं आहेतं

हो ना, सरांसारख्या देवतुल्य (सॉरी सर नास्तिक आहेत, शहरुखतुल्य चालेल) माणसावर केवढी ती टीका
वाचवत नाही हो

उगाचच शोक अनावर झाल्यास मला आत्महत्या करावीशी वाटली... असा धागा येईल आणि पुन्हा दुसरा धागा आत्महत्या कशी करावी यावर चर्चा होईल. मग आत्महत्या करण्यापूर्वी काय करावे काय नाही करावे यावर विचार विनिमय.... मग आत्महत्या कशी टाळली यावर प्रवासवर्णन पर लेख. आणि मग डिप्रेशन वर कशी मात केली यावर काही संबोधन पर लेख .... अशी लेखांची मालिका येतच राहील...