ते बघ यश आलं!

Submitted by mrsbarve on 6 January, 2017 - 22:44

ते बघ यश आलं!

बदामी रंगाच्या तुझ्या डोळ्यात
खोल खोल काय दडलेय रे?
पाहू दे मला ,काहीतरी कुठे तरी खुपलेय रे?

असा नको नाराज होऊ ,कळतेय मला सारं सारं
आटापिटा तुझा सारा ,सोडून देशील का वार्यावर?

लपवू नको ,झाकू नको , सोडू नको नशिबावर !
बघ पुन्हा सूर्य उगवेल फक्त तुझ्या क्षितिजावर …

येतील जातील संकटं ,त्यांची बांधू घरं उन्हात
तुझ्या मनगटात आहे शक्ती,हे ठेवशील न लक्षात ?

थोडे दिवस गोड ,थोडे दिवस कडू
तुझ्या लख्ख क्षितीजावर पाखरे लागुदेत उडू!

सुटू देऊ नको बांध तुझा ,काढा कडू गिळुन टाक घटकन ;
यश आहे थोडे पुढे ,पोचशील तिथे बघ पटकन!

थोडे असते ,थोडे नसते ,थोडे सलते,थोडे खुलते !
त्यात काय झालं?
सोडू नको नशिबावर ,
ते बघ यश आलं!

Group content visibility: 
Public - accessible to all site users