ए आर रहमानचा ५०वा वाढदिवस

Submitted by सई केसकर on 6 January, 2017 - 04:21

रोजा मधलं 'दिल है छोटासा' जरी कालपरवाच ऐकल्यासारखं वाटत असलं, तरी तेव्हा अवघ्या २४ वर्षांच्या असलेल्या रहमानला आज ५० वर्षं पूर्ण होतायत. आणि माझ्यासारखे इथे इतर रहमानवेडे लोक असतील त्यांच्या साठी हा धागा. आज दिवसभर जमेल तेव्हा आवडती रहमानची गाणी ऐकायचा बेत केला आहे. तुम्ही पण तुमची आवडती गाणी आणि ती नक्की का आवडतात याबद्दल इथे लिहू शकता!

रहमान सारख्या, रिपीटवर राहणाऱ्या संगीतकाराला उदंड आयुष्य लाभो!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी आवडती गाणी

कुन फाया कुन (रॉकस्टार): एकूण फील साठी आणि मधल्या "सजरा सवेरा" या ओळीसाठी.
दिल्ली ६ (दिल्ली ६) फ्रेंच रॅप साठी
लुका छुपी (रंग दे बसंती) रहमान आणि लता कॉम्बिनेशन साठी
तू बोले मै बोलू (जाने तू या जाने ना) पियानो साठी
तुम साथ हो (तमाशा) अलका याद्निक साठी
सफरनामा (तमाशा) लकी अली साठी, आणि रेहमानच्या जुन्या लुप्त झालेल्या आवाजांना पुन्हा जागृत करण्यासाठी
शेहर मे (रॉकस्टार) मधल्या भारी संवादांसाठी
खून चला (रंग दे बसंती) मोहित चौहानसाठी
मन मोहना (जोधा अकबर) बेला शेंडे साठी
liquid dance (स्लमडॉग), उठून पाळायची इच्छा निर्माण करते म्हणून

https://www.youtube.com/watch?v=z0_xGW84lTQ

हे घ्या रेहमानच्या वाढदिवसानिमित्ताने . रेहमान संगीत क्षेत्रात किती प्रगती करतोय. त्याची एक झलक.

कुठल्याही वाद्याशिवाय तयार केलेले संगीत

लाँग लिव्ह रहमान!
माही वे.. रहमान स्क्वेअर + इर्शाद कामिल
फिर से उड चला - मोहितसाठी
राहू दे. त्याला यादीत माववणं आवाक्याबाहेरचं आहे.

दिपस्त __/\__ मनःपुर्वक धन्यवाद!

हॅपी बर्थडे टु रहमान.

माझी लिस्ट

वंदे मातरम थाय मन्ने वन्नक्कम
रंग दे
ऐ अजनबी तू भी कही
बरसो रे
उरवशी उरवशी
मुक्काला मुकाबला

हॅप्पी बर्थडे रहमान! Long live God of music..
माझी आवडती गाणी -
गुरू मधली सगळीच
वंदे मातरम
चंदा रे चंदा रे
तू ही रे
रंग दे बसंती टायटल साँग
गेंदा फूल

जाऊ दे, एक लिस्टीत कशाला माववायचं इतक्या छान गाण्यांना Happy

लॉन्ग लिव्ह रहमान! Happy
आवडत्या गाण्यांची लिस्ट करणं मुश्किलही नहीं, नामुम्किन है! Proud
कदाचित नावडत्या गाण्यांची लिस्ट करणं सोपं जाईल.

रहमानच्या आवडलेल्या गाण्यांची लिस्ट करणं अवघड आहे खरं!

पण ही माझी लिस्ट, बहुतेक गाणी फारशी प्रसिदध नाहीत, त्याच्या गाजलेल्या गाण्यांच्या तुलनेत पण अतिशय मधुर आहेत

खामोशीया गुनगुनाने लगी
किस्सा हम लिखेंगे दिले बेकरार का
नही सामने वो अलग बात है
ए नाजनी सुनो ना हमे तुमपे हक तो दो ना
रोशन हुई रात वो आसमा से उतरकर जमीन पर है आया
चंद्रलेखा

मला माहीत नव्हते आज रेहमानचा ५० वा वाढदिवस आहे हे!
खामोशीयाँ गुनगुनाने लगी माझं आवडतं गाणं आहे! तनहाईयाँ मुस्कुराने लगी मधला मुस्कुराने हा शब्द इतका अप्रतिम गायला आहे लतादिदींनी.. परफेक्ट!
बाकी लिस्ट खूप मोठी होईल कारण अलीकडचे काही सिनेमे वगळता रेहमानचं संगीत असेल तर सिनेमाची सगळीच गाणी आवडायची असा नियम होता! सध्या तसं होत नाही पण काही गाणी आवडतातच!

रेहमान म्हटले की मला आजही रोजा मधले दिल है छोटासा आठवते..
रेहमानच्या बरेच गाण्यात मला मेलोडी मिसिंग वाटते.. पण या गाण्यात पुरेपूर आहे..

पण जर अल्बमचा विचार केला तर,
रेहमान म्हणजे स्वदेस !

यूही चला चल राही ... काय जबरी म्युजिक पीस भरलेत एकेक गाण्यात. गाडी चालवतानाचे गाणे म्हणून तर आणखी बेस्ट वाटते..

ये तारा वो तारा हर तारा ... पुर्ण गाणे गायला अख्खे गोड आहे..

आणि अंतर्मुख करणारे .. ये जो देस है तेरा.....

तसेच त्या रामलीला मधील.. शाहरूखच्या तोंंडचे कडवे आहे ते देखील मला फार आवडते.. राम तेरे मन मै है राम मेरे मन मे है मन से रावण जो निकाले राम उसके मन मै है

हॅपी फिफ्टीएथ रहमान.

गेल्या काही वर्षांत (जेव्हापासून आपण फॅन्स "त्याच्या हल्लीच्या गाण्यांत पुर्वीची मजा राहिली नाही" असं म्हणतोय) तेव्हापासून त्याच्या स्टाईल मध्ये काहितरी स्थित्यंतर होत असावं. होल्डींग माय ब्रेथ फॉर समथिंग न्यु अ‍ॅण्ड एक्सायटींग Happy

हाईला...५० झाले पण? कैच्या कै!

देव त्याला उदंड आयुष्य देवो आणि अशीच एकाहून एक कर्णमधुर गाणी जन्माला घालण्यासाठी प्रेरणा देवो.

एवढी मोठी लिस्ट आहे. पूर्वी तर त्याची स ग ळी गाणी आवडायची.

रोजा, बाँबे, दिल से, ताल, १९४७ अर्थ, तक्षक, सपने, युवा, रंग दे बसंती, जोधा अकबर - ह्या सिनेमांमधली गाणी तर अनंत वेळा ऐकली आहेत आणि त्यांचा अजूनही अजिबात कंटाळा येत नाही. लगान, भगत सिंग, साथीया, गुरू, स्वदेस हे पण आहेतच लिस्ट मध्ये. त्याचं वंदे मातरम पण ऑल टाईम फेव्ह.

गेल्या काही वर्षांत (जेव्हापासून आपण फॅन्स "त्याच्या हल्लीच्या गाण्यांत पुर्वीची मजा राहिली नाही" असं म्हणतोय) तेव्हापासून त्याच्या स्टाईल मध्ये काहितरी स्थित्यंतर होत असावं. होल्डींग माय ब्रेथ फॉर समथिंग न्यु अ‍ॅण्ड एक्सायटींग स्मित >> ह्याला +११

A masterpiece every year by the legend…What a consistency and variety….Thanks a lot sir for making our lives so musical….
1992 (Roja)
1993 (Gentleman, Thiruda Thiruda – Chor Chor)
1994 (Kadhalan – Hum Se Hai Muquabala)
1995 (Bombay, Rangeela)
1996 (Indian, Kadhal Desam – Duniya Dilwalon Ki)
1997 (Daud, Minsara Kanavu - Sapney)
1998 (Jeans, Dil Se..)
1999 (Taal, Takshak)
2000 (Pukar, Zubeidaa)
2001 (Lagan)
2002 (Sathiya)
2003 (Warriors of Heaven and Earth)
2004 (Meenaxi, Yuva, Swades)
2005 (Water)
2006 (Rang De Basanti)
2007 (Guru)
2008 (Slumdog Millionaire, Ghajini)
2009 (Delhi 6)
2010 (Raavan)
2011 (Rockstar)
2012 (Vinnaithaandi Varuvaayaa - Ekk Deewana Tha)
2013 (Raanjhanaa)
2014 (Highway)

हे मी मागे एकदा फेबु वार टाकलेल, या धाग्याच्या निमित्ताने आठवण झाली

रहमान प्रचंड आवडतो. पण ते वरच्या व्हिडिओतले वाद्यांशिवायचे म्युझिक अज्जिबातच आवडले नाही. फ्लॉप.

लॉन्ग लिव्ह रहमान! Happy
आवडत्या गाण्यांची लिस्ट करणं मुश्किलही नहीं, नामुम्किन है! >>> +१००

गाणी ऐकणं आवडायला लागल्यापासून फक्त आणि फक्त रह्मान माझ्या टॉप लिस्ट मधे आहे. त्यामुळे थोडी तरी आठवणीतली गाणी लिहितेच.

१. चुपके से लग जा गले, साथिया आणि ए उडी उडी - साथिया
२. ऐ अजनबी, दिल से रे - दिल से
३. रूबरू, लुका छुपी - रंग दे बसंती
४. नादान परिंदे, कुन फाया कुन, हवा हवा - रॉकस्टार
५. बूंदोंसे बातें - तक्षक
६. तू ही रे, हम्मा हम्मा - बाँम्बे
७. यारों सुन लो जरा, तनहा तनहा - रंगीला
८. रूत आ गयी रे, धीमी धीमी - १९४७ अर्थ
९. नही सामने - ताल
१०. ओ री छोरी, घनन घनन - लगान
११. ये रिश्ता क्या कहलाता है, चिन्नम्मा चिलकम्मा - मीनाक्षी
१२. कैसे मुझे तुम मिल गयी - गजनी
१३. कही तो.., तू बोले मै बोलू - जाने तू या जाने ना
१४. तू मुन शुदी, तुम तक - रांझणा
१५. अगर तुम साथ हो - तमाशा
१६. सूहा साहा, तू कुजा, माही वे - हायवे
१७. गेंदा फूल, भोर भये - दिल्ली ६
१८. यूही चला चल, ये जो देस है तेरा - स्वदेस
१९. दिल है छोटासा, ये हसीं वादिया - रोजा
२०. के सेरा सेरा - पुकार