चला व्यसन मुक्त होऊ...

Submitted by RAM NAKHATE on 4 January, 2017 - 00:03

चला व्यसन मुक्त होऊ...
~~~~~~~~~~~~~~
नका करू खराब
आयुष्य हे मोलाचे...
होऊनी व्यनाधीन
भागीदार दुःखाचे...

कित्येकांचे उटले घर
लेकर-बाळं रास्त्यावर...
बाबा करीतो व्यसन
व्यसनाधीन झाला आधार ...

आहे तुमच्या हाती
बळ मोठे आमृताचे...
नका करू नासाडी
आपल्याच या देहाची....

नका पिऊ दारू,शिगारेट
मद्यपान हाती नका घेऊ...
सोडून ही वाईट सवय
चला व्यसन मुक्त होऊ...

ही खुपच आहे वाईट शान
सेवन करणे सोडून देऊ...
चरस,गांजा,शिजारेट,दारू
चला व्यसन मुक्त होऊ...

व्यसन नाही सुटत तुमचे
व्यसन मुक्ती केंद्रा जाऊ...
व्यसनाधीन आहात तुम्ही
चला व्यसन मुक्त होऊ...

व्यसनाचा सोडूनी आधार
शिक्षण तेथील आपण घेऊ...
होईल या जीवनाचा उदार
चला व्यसन मुक्त होऊ...

अनेकांचे जीवन आपण
शापीत सावलीत नेऊ...
प्रत्येकांचा ध्यास ठेवा
चला व्यसन मुक्त होऊ...
~~~~~~~~~~~~~~
                   - राम नखाते
             मो.नं. 9545013679
         मु.पो.मांडणी, ता. अहमदपुर
                      जि. लातुर
 

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users