३१ डिसेंबरचा प्लान काय?

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 December, 2016 - 22:21

जर ठरला असेल तर आजच आताच सांगा..
ईतरांना आयड्या मिळतील ..
त्या ईतरांमध्ये एक मी आहे, कारण ३० ची सकाळ उजाडली तरी
मी अजून ठरवू शकलो नाही की फ्रेंडस, फॅमिली की गर्लफ्रेंड..? कोणासोबत किती वेळ घालवायचा आणि त्या वेळेत काय काय करायचे?

तुम्ही तुमचा सांगा, मी माझा ठरवतो. जर मलाही ठरवायला मदत केली तर येणारे अखंड वर्ष मायबोलीचा आभारी राहीन Happy

तळटीप - मी दारू पित नाही !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मै: नक्की ये, अगदी सकुसप...... Happy

रुन्म्या : अगदी मिठी नाला नाही, पण मुंबईमध्ये असा प्रयोग विहार लेक, किंवा मग ठाण्यात तलावपाळीला करायला हवा ...... Happy

मुंबईत एखादी वास्तू वा जागा तिच्या सुंदर रूपात जपणे कठीण आहे.
यावरून समुद्रकिनारा गाठायचा का म्हणून डोक्यात एक विचार चमकून गेला.
पण या रात्री गेटवे वगैरे परीसरात फार गैर प्रकार चालतात असेही ऐकून आहे.

पण या रात्री गेटवे वगैरे परीसरात फार गैर प्रकार चालतात असेही ऐकून आहे.>>हमम..पण उद्या पोलिस देखील जास्त असणार

उद्या येणारी इतर बॅन्कान्ची कॅश घ्यावी लागणार जुन्या १००० - ५०० ची.
भरपुर आहे असे कळले आहे. घरी केव्हाही पोचल्यावर दोन पेग मारुन बायको वाढेल ते जेवुन
नव्या वर्षात उशिरा उठेन.

यंदा लॉकडाऊनमध्ये वर्ष गेल्यानंतर बरेच जण वर्षाखेरीचे निमित्त साधून फिरायला बाहेर पडले आहेत. जे मुळात वर्षातून एकदाच फिरायला जातात ते सुद्धा वर्षभर फिरायलाच जाता आले नाही असे दर्शवत अतिउत्साह दाखवत आहेत.
आमच्या घरी सुद्धा डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच हे टुमणे चालू होते. पण मी म्हटले हा गर्दीचा काळ जाऊद्या. फेब्रुवारी ऊत्तम राहील.

तसेच बाहेरून काही न मागवता घरीच जेवण प्लान करूया असेही ठरवलेय. .. मुजिक लाऊन डॅन्स घरीच करता येतोच..

नवीन वर्षाचे १ तारखेला सुर्य उजाडायच्या आधी पोरंना मॉर्निंग वॉल्कला मात्र जरून नेणार आहे..

Pages