आपण सगळेच जाणतो की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या आईवडिलांची भूमिका फार फार महत्वाची असते. आयुष्य चालत राहतं,काळ वाहत राहतो आणि एक दिवस आपल्याला आई किंवा वडिलांचा कायमचा वियोग सहन करावा लागतो. शेवटी प्रत्येकाला एक दिवस जायचेच आहे हे माहीत असूनही हे दुःख सहन करण्याच्या पलीकडचे असते.त्यांच्या जाण्याने आपण आत आत कुठेतरी पोकळ होऊन जातो.आपल्याजवळ त्यांच्या लाखो आठवणी असतात.आपल्याला असं वाटतं की हे आठवणींचं भांडार आपल्यानंतरही कायम राहावं.आपली आई कशी होती किंवा वडील कसे होते हे पुढच्या पिढ्यांनाही कळावं.मी स्वतःही यातून गेले आहे,जात आहे.मलाही वाटतं की आपले प्रियजन फक्त फोटोत न राहता त्यांच्यातले गुण,आपल्यासाठी त्यांनी केलेले श्रम,लाखो लाखो आठवणी शब्दबद्ध व्हाव्यात.आपले मत अपेक्षित आहे.मला हे काम प्रामाणिकपणे आणि मनापासून करण्याची इच्छा आहे.अर्थात हे काम व्यावसायिक तत्वावर करणार आहे.कारण हे फुलटाईम काम आहे.आपले मत अपेक्षित आहे.मी जरी हे काम व्यवसाय म्हणून करणार असले तरी दर्जा,रिसर्च अशा कोणत्याही बाबतीत कधीही कमी पडणार नाही.
आईवडिलांबद्दल पुस्तके लिहिणे
Submitted by वृन्दा१ on 26 December, 2016 - 11:16
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
@ वृन्दा१, छान आणि नवीन
@ वृन्दा१, छान आणि नवीन कल्पना आहे. आपल्या कार्याच्या पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा!!!
धन्यवाद सचिनजी.प्रतिसाद
धन्यवाद सचिनजी.प्रतिसाद वाचूनच डोळ्यांत पाणी आले.असेच प्रोत्साहन देत राहा.
कल्पना खूप छान आहे . माझी
कल्पना खूप छान आहे . माझी युनीक सिचुएशन आहे. माझे बायो लोजिकल आईवडील व मावशी जिने मला दत्तक घेतले ते दत्तक आईवडील दोघांच्या आठवणी मला येतात. व त्या जपाव्या असे वाट्ते. आता फक्त नैसर्गिक आई जिवंत आहे तिच्याकडे सर्व आठवणी असतील पण तिच्या कडे जाऊन बसून त्या सर्व नोटून ठेवा व्यात इतका वेळ आता मिळत नाही. तसेच तिला ते आवडेल का नाही हे ही कळत नाही.
माझ्याबद्दल व नव र्या बद्दल विषयाच्या अनुषंगाने मुलीस मी काहीबाही सां गत राहते पण असे
डॉक्युमेंटेशन नाही. निदान एक ऑनलाइन फॅमिलि अल्बम असावा असे वाट्ते. तुम्ही पैसे घेउन काम करणार का? तसे असेल तर माबो अॅडमिनची परवानगी घ्या इथे तसे लिहायला कारण इथे जाहिरात विभाग पण आहे.
अमा,मायबोलीवर जाहिरात टाकली
अमा,मायबोलीवर जाहिरात टाकली आहे.वेळ मिळाला तर वाचा.रागावणार नसाल तर एक सांगू? वयस्कर लोकांना आपल्याकडून काही काही नको असतं. फक्त त्यांच्या आठवणी,बोलणं आपण ऐकून घ्यावं, त्यांना वेळ द्यावा,एवढंच त्यांना हवं असतं. आपल्या आई महाराष्ट्र राज्यात कुठे राहतात की परदेशात?
वृन्दा, कल्पना छान आहे.
वृन्दा, कल्पना छान आहे. मराठीत अशी काही पुस्तके आहेत ( उदा. सांगे वडीलांची किर्ती.. वपु )
पण खुपदा या आठवणी, आपल्यापुरत्याच महत्वाच्या असतात. त्या आपल्या घरातच वाचल्या जातील.
>>पण खुपदा या आठवणी,
>>पण खुपदा या आठवणी, आपल्यापुरत्याच महत्वाच्या असतात. त्या आपल्या घरातच वाचल्या जातील.
अगदी बरोबर, जसे परदु:ख शीतल असते तशा पर-आठवणी सुद्धा इतरांना फार महत्वाच्या वाटतील असे नाही.
जर व्यक्ती / कुटुंब खुप प्रसिद्ध असेल तर ठीक आहे.
अर्थात तुम्हाला नाऊमेद करत नाहीये, असच सांगितलं.
महेशजी,शब्दांत अफाट सामर्थ्य
महेशजी,शब्दांत अफाट सामर्थ्य असतं,हे तुम्हालाही माहीत आहे. आपला उद्देश जरी आपल्या प्रियजनांना शब्दबद्ध करणे हा असला तरी सामान्य माणसाचा जगण्याचा,मुलांना वाढविण्याचा संघर्ष प्रसिद्ध व्यक्तींपेक्षा कमी महत्वाचा नसतोच ना.आणि व्यक्ती प्रसिद्ध आपोआप तर होत नाहीत ना. अॅन फ्रेंक आजही वाचली जातेच ना.
दिनेशदा, आपले किमान दोनशेहून
दिनेशदा, आपले किमान दोनशेहून अधिक नातेवाईक,मित्र असतात. पण आपला मुख्य उद्देश आपल्यानंतरही आपल्या आईवडिलांची माहिती पुढच्या पिढ्यांना करून देणे असले तरी मला मोकळेपणाने असं वाटतं की आपली पुस्तकंही योग्य गुणवत्ता असली तर प्रसिद्ध होऊ शकतात. तशी मी पॉझिटिव्ह पर्सन नाही पण शब्दसामर्थ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे.
तुमच्या या उपक्रमाला
तुमच्या या उपक्रमाला प्रोत्साहन म्हणुन मी एक पुस्तक भेट देऊ शकेन.
मला तुमचा पत्ता किंवा पुण्यात कोणी कलेक्ट करू शकणार असेल तर त्यांची माहिती संपर्कातुन पाठवा.
माझ्या नात्यातल्या एका व्यक्तीने आत्मचरित्र लिहिले आहे,
कदाचित तुम्हाला त्याचा काही उपयोग होऊ शकेल.
आपल्या आई महाराष्ट्र राज्यात
आपल्या आई महाराष्ट्र राज्यात कुठे राहतात की परदेशात?
>> अहो कसले काय आपल्या आकुर्डीत. इदरिच बगलमें
मला काय वाट्ते सांगू का,
माझे पती वारले त्यानंतर मला त्यांच्या अनुपस्थितीत धंदा सांभाळावा लागला. अनेकदा मी ते असताना देखील मीटिंग मध्ये मागे बसून वहीत नोंदी कर त असे. पण एखाद्या सिच्युएशन मध्ये कसे वागायचे, काय सोलुशन शो धायचे हे ज्ञान एखाद्या लायनीत मोठी करीअर केलेल्या पुरुषाकडे/ स्त्रीकडे असते. प्रोफेशनल्स किंवा क्रिएटिव्ह फील्ड मध्ये देखील लोक जेव्हा पन्नाशीत साठीत येतात तेव्हा त्यांच्याकडे फार मोठा अनुभवांचा ज्ञानाचा साठा असतो. हे लोक अचानक वारले की तो साठा नष्ट होतो व आपण व्यर्थ शोधा शोध करत बसतो. हे कुठेतरी लिहून ठेवले पाहिजे. म्हणजे वारसदारांना कामी येते.
भावनिक मूल्य तर आहेच. पण व्यावसाइक ज्ञान देखील जपले गेले पाहिजे.
भावनिक मूल्य तर आहेच. पण
भावनिक मूल्य तर आहेच. पण व्यावसाइक ज्ञान देखील जपले गेले पाहिजे>>>+११११
उपक्रमाला शुभेच्छा. पण तुम्ही
उपक्रमाला शुभेच्छा.
पण तुम्ही लिहून घेणार आहात कि तुम्ही लिहीणार आहात ? गोंधळ झाला माझा.
सपनाजी,मी ज्यांच्यावर लिहायचे
सपनाजी,मी ज्यांच्यावर लिहायचे आहे त्यांच्या घरचे लोक,इतर संबंधित यांच्या डिटेल मुलाखती घेणार,काही रेकॉर्ड करणार,फोटो जमा करणार,एक आउटलाइन बनवणार,त्यांच्या घरच्यांचे मत घेणार आणि स्वतः लिहिणार,अर्थात प्रत्येक प्रकरण मंजुरीसाठी नातेवाईकांना पाठवणार.लिहिणार मीच.
अमा,सचिनजी मी आपल्याशी पूर्ण
अमा,सचिनजी मी आपल्याशी पूर्ण सहमत आहे.
अच्छा ! तुम्हाला धनंजय कीर
अच्छा ! तुम्हाला धनंजय कीर व्हायचेय. शुभेच्छा पुन्हा एकदा.
You will get different
You will get different perspectives from different relatives about the person. Then you will be selecting the one approved by the person who is going to pay you. Which will become the official version of events. Which will shut down the voice of people the family wants to ignore and throw out of the group. Or you could write two conflicting versions.
टोटली अमा. कॉन्ट्क्ट
टोटली अमा.
कॉन्ट्क्ट रायटिंगला सगळं गोड गोड लिहायला लावण्याची शक्यता प्रचंड. परत हाईंड साईट पर्स्पेक्टिव्ह विरुद्ध त्या परिस्थितीतला निर्णय. त्याचं विश्लेषण केलत तर वाचायला मजा. अन्यथा स्वामी समर्थ, गजानन महाराज किंवा इतर कुणा संतांची पोथी प्लस प्लस होणार हे.
अर्थात मला वाटतं याला हमखास वाचकवर्ग मिळण्याची खात्री असेल. शुभेच्छा.
अमा,अमितव,जीवन गोड गोड कुठं
अमा,अमितव,जीवन गोड गोड कुठं असतं?आणि आपलं कौशल्य त्याला आपण क्षणभर विकणं असं म्हणू या ते वेगळं आणि आपली सद्सद्विवेकबुद्धी वेगळी.केवळ पैशासाठी न पटणारे मी तरी करणार नाही.पोथ्या लिहिण्यात आणि गौरवग्रंथ लिहिण्यात मला इंटरेस्ट नाही.
सपनाजी मला वृंदाच
सपनाजी मला वृंदाच व्हायचंय.माझी स्पर्धा माझ्याशीच आहे.प्लीज गैरसमज नका करून घेऊ.
>>अच्छा ! तुम्हाला धनंजय कीर
>>अच्छा ! तुम्हाला धनंजय कीर व्हायचेय. शुभेच्छा पुन्हा एकदा.
कीर कीर करु नका
@ वृन्दा१, आपण करणार असणाऱ्या
@ वृन्दा१, आपण करणार असणाऱ्या कार्याबद्दलचे आपले विचार स्पष्ट आहेत. आपला आत्मविश्वास आवडला. आगे बढो! आपणांस शुभेच्छा!!!
महेशजी,पत्ता पाठवू कसा?
महेशजी,पत्ता पाठवू कसा?
मला संपर्क सुविधा वापरून मेल
मला संपर्क सुविधा वापरून मेल करा.
मी जर कोणाला मेल केले तर पोहोचत नाही, पण मला मिळू शकते कोणी पाठविले तर.