चांदणे

Submitted by ऋषभ गि.कुलकर्णी on 26 December, 2016 - 07:03

आकाश चांदण्यांनी.. पुन्हा फुलून आले !
काळीज आठवांनी.. पुन्हा भरून आले !

बेभान ह्या ऋतूंचे रडणे नका विचारू
लाटेत गारव्याच्या.. रस्ता चुकून आले !

त्या लाजऱ्या वयाला द्या चांदणे उशाशी
स्वप्नात प्रेयसीच्या .. बघ वावरून आले !

ओठी तिच्या अताशा माझेच नाव आहे
चौघात नाव माझे.. ओठांवरून आले !

ओसाड वर्ग इथले आक्रोश बाकडांचा-
गुणवंत हरवलेले.. कोठे दिसून आले ?

वाटा कशा फुलांच्या देऊन ठेच गेल्या
पाऊल कोवळेसे .. काट्यांवरून आले !

....

ऋषभ कुलकर्णी
७८७५८३२१९
औरंगाबाद

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त..मस्त ...मस्तच ! ! !
खूप खूप छान...
स्पेशली,
त्या लाजऱ्या वयाला द्या चांदणे उशाशी
स्वप्नात प्रेयसीच्या .. बघ वावरून आले !

ओठी तिच्या अताशा माझेच नाव आहे
चौघात नाव माझे.. ओठांवरून आले !

एकच नंबर ! ! !

अत्यंत छान गझल. सुंदर आशय आहे. आवडली.

फक्त शेवटुन दुसऱ्या शेरात मीटर जरा चुकल्यासारखे वाटत आहे. तिथे तेवढे पाहा.

<<ओसाड वर्ग इथले आक्रोश बाकडांचा-
गुणवंत हरवलेले.. कोठे दिसून आले ?>>