चीज कडक (दगडच) झालय ते मऊ होण्यासाठी काय करता येईल??

Submitted by कैवल्यसिंह on 22 December, 2016 - 10:29

आमच्या घरी आम्ही आमूल कंपनीचे मोज्जारेला चीज आणलयं पन ते खुपच कडक झालयं...

कोनीतरी मला सांगीतले की मिक्सरवर बारीक करा... पन मला शंका आहे की मिक्सरवर जर टाकुन फिरवले तर मिक्सरची पाती रहातील का?..

आणि हो... ते चीज इतकं कडक झालय कि ते कापताही येत नाहीये व किसताही येत नाहीये.... दगडच होऊन बसलाय त्याचा... कोणावर फेकला तर दुखापत होईल ईतपत कडक झालय ते...

बहुतेक थंडीमुळे ते चीज कडक झाले आसावे का?

कडक झालेले चीज आजुन कोणत्या मार्गाने मऊ करता येईल जेणेकरुन ते आम्हाला पदार्थांमधे वापरता येईल?

कृपया यावर ऊपाय सांगावेत/मार्ग सुचवावा...

- कैवल्यसिंह

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फ्रीजात ठेवलेलं मोझरेल्ला चीज "मरतं". पण फ्रीजबाहेर हे १ दिवसापेक्षा जास्त टिकतही नाही. मोझरेला माझ्या मते चक्का अन पनीरच्या अधेमधे कुठेतरी आहे.

कोमट दुधात घालू ठेवा एक तासभर अन बघा जमतंय का?

इथे फूड लॅब्जमधे 'व्हे'मधे भिजवा म्हटलंय, पण उगंच मीठ घालून दूध फाडून मग त्यात भिजवलं तरी नुसत्या दुधात भिजवल्या सारखाच रिझल्ट येईल असंही म्हटलंय.

>>फ्रीजात ठेवलेलं मोझरेल्ला चीज "मरतं>> अहो झाडू, काहीही काय सांगताय? आमच्याकडे मोझरेल्ला घरात कायम असतं. घरात तूरडाळ आणि हिंग, हळद असणं जितकं महत्वाचं आहे तितकंच मानाचं स्थान आमच्याकडे मोझरेल्ला चीजला आहे. आणि फ्रिजमध्ये हवाबंद डब्यात ठेवलेलं असतं. पण एकदा पॅक उघडला की शक्य तितक्या लवकर संपवावाच लागतो.

पण एकदा पॅक उघडला की शक्य तितक्या लवकर संपवावाच लागतो.
<<

मॉइश्चर लॉस हा इश्यू आहे. (मैत्रीच्याही) नात्यातला ओलावा संपला की नाती मरतात, तशीच चीजंही मरतात. Wink

बाकी ते प्लस १ "झाडू काहीही सांगताहेत" साठी आहे याबद्दल माझ्या मनात तिळमात्र संशय नाही.

फेकून द्या!
चीजसारखे दुधापासून बनवलेले पदार्थ नीट स्टोअर केले नसतील, तर लवकर खराब होतात. त्याने पोट बिघडू शकते. तेव्हा जीव काढू नका. सरळ फेका!

बाकी धाग्याचा विषय :

कडक झालेले चीज आजुन कोणत्या मार्गाने मऊ करता येईल जेणेकरुन ते आम्हाला पदार्थांमधे वापरता येईल?

कृपया यावर ऊपाय सांगावेत/मार्ग सुचवावा...

हा आहे.

तुमच्या/माझ्या घरी तूरडाळ हळद हिंग चिकन मासे असतात की नसतात हा नव्हे Lol

>>मॉइश्चर लॉस हा इश्यू आहे.>> हो, तो आहे. माझ्याकडच्या चीजमध्ये पाणी असतं ते मॉईश्चर टिकावं म्हणून.
ज्या चीजमध्ये पाणी नसतं ती खाताना तितकी ताजी वाटत नाहीत हे खरं आहे.

>>कृपया यावर ऊपाय सांगावेत/मार्ग सुचवावा... सॉरी, माझ्याकडे ह्यावर उपाय नाही कारण अनुभव नाही. पण फेकून देणं बेस्ट.

काहीच करता येण्यासारखे नसेल तर शेफ नाईफने बारीक तुकडे करून पहा. म्हणजे सूप मधे ठेवता येतील. ते ही शक्य नसेल तर दगडचीज सूपच्या मोठ्या भांड्यात ( खूप मोठा दगड नसेल तर) टाका. फ्लेवर तरी येईल.

परदेशात मोझरेला चीज प्रिझर्व्हेटिव्हज असलेल्या पाण्यात सीलंबद असे मिळते. ते पाणी फेकून लगेच चीज वापरलं जातं. समजा सगळं चीज वापरायचं नसेल, तर ते पाणी स्टोअर करून त्यात जास्तीचं चीज घालून हवाबंद डब्यात ठेवतात. त्यांची डेडलाईन सुद्धा कमीच असते.

भारतात कसं मिळतं हे चीज? म्हणजे नक्की कसं पॅकिंग असतं?

शेफ नाईफने बारीक तुकडे करून पहा.

<<

अहो दादा,

स्वयंपाक शिकावा लागतो. ते जे धागाकर्ते आहेत ना, त्यांनी एक वाक्य लिहिलंय. "पन मला शंका आहे की मिक्सरवर जर टाकुन फिरवले तर मिक्सरची पाती रहातील का?.."

हे वाचल्यावर "शेफ नाईफने तुकडे" करायला खली किंवा आम्हा म्हातार्‍यांच्या जमान्यातला दारासिंग आणावा लागेल बा! अन ते करूनही शेफ नाईफचे तुकडे व्हायची शक्यता जास्त Wink

आता तुमचं इंजिनियरिंगचं, डिझेल, गॅसकिट वगैरेबद्द्लचं नॉलेज वापरून चीजची टेन्साईल (?) स्ट्रेंग्थ, शेफ नाईफच्या स्टीलची कटींग एज वगैरे पानभर प्रतिसाद लिहालच तुम्ही,

पण,
कसंय ना, माझ्यासारख्या सर्वज्ञांशी बोलायचं असेल, तर जरा अधिक खोलवर विचार करावा लागतो. बाकी तुमचा आटापिटा चालू द्या.

झाडाक्कांचा हवेत गोळीबार चालू झालेला दिसतो.
फक्त त्या दोन हॉस्पिटल्सची नावे , प्रोफाईलचा फोटो, व्यवसायचे ठिकाण, आणि कुठल्या पेट्रोल पंपावर भेसळीचा धंदा आहे ते सांगितले तरी पुरे.
हे गॅस कीटचं मधेच काय काढलं ? ते नाही लागत बहुतेक चीज साठी.

बाकी हे प्रोफाईल पण तुमचंच असेल तर मग किती हार्ड झालंय हा अंदाज तुमचाच बरोबर असेल Lol

मायबोलीवरच्या काही आयडीजना ते चीज द्या, फुकट कीस पाडून मिळेल. Proud

ऑन अ सिरीयस नोट, झाडूंनी दिलेल्या लिंकमधला उपाय मी ("कोमट दुधात तासभर भिजवणे") आधी करून पाहिलेला आहे. बर्‍यापैकी वर्क होतो.

चीजसाठी डिझेल , गॅसकीट Rofl

उगीच लोक तुम्हाला सर्वज्ञ म्हणत नाहीत हो झाडाक्का !
(तुम्हाला नीती आयोगावर पाठवायला हवे म्हटले तर किती चिडलात त्या दिवशी ) Lol

बाकी गरम करुन बघा असा सहज सल्ला कोणीही देअील.
पण झाडुंनी दिलेला कोमट दुधात ठेवण्याचा सल्ला प्रॅक्टिकल अन् अनुभवी वाटतोय.

फेकून द्या !
शंभर रुपयाचे चीज वाया जाऊ नये म्हणून इतके उपद्याप करून मग पोट बिघडल्यावर पाचशे रुपयाची औषधे कशाला?

त्या झाडाक्का आहेत कि नाही ...
त्या गेल्या महिनाभर मला माबोट्रंप (राज) समजत होत्या. मग असंबा म्हणाल्या, मग आणखी कोण कोण , असे दहा बारा आयडीज झाले आता मी नेमकी कोण आहे हे विचारायला त्यांच्याकडेच जाईन म्हणते तर नाव,नंबर, गाव, हीस्पिटलचं (दोन दोन) काही एक सांगायला तयार नाहीत. बरं कुठल्या पेट्रोलपंपावर बसत होत्या ते ही सांगायला तयार नाहीत. उगीच त्यावरून माझ्या अंगावर धावून आल्या होत्या.

असं चालतं का हो श्रीजी ?

चीजची टेन्साईल (?) स्ट्रेंग्थ, शेफ नाईफच्या स्टीलची कटींग एज
>>>>
कापाकापीला बहुतेक हार्डनेस, ब्रिटलनेस असले सायंटीफीक शब्द वापरायला हवेत ना.
मागे कुठेतरी वाचलेले की काचेला हिर्‍याने कापतात कारण हिर्‍याचा हार्डनेस जास्त असतो.
हिरा परवडत असेल ज्वेलर्सकडून भाड्याने आणायला तर ट्राय मारा.
पण चुकून हिराच कापला गेला तर मोठा फटका पडेल.

तरी घरगुती उपाय सांगायचा झाल्यास त्या चीजशी फ्लर्टींग करा. गॉगल लावून तू चीज बडी है मस्त मस्त गाणे गाउन बघा. बघा त्यात काही तरंग उठून तो विरघळातो का?

पण चुकून हिराच कापला गेला तर मोठा फटका पडेल.>>> कशाला हिर्‍याला कापणारं चीज म्हणुन हिर्‍यापेक्षा जास्त किंमतीला विका . Wink

आता ते चीज खायचेच आहे का तुम्हाला कसेही करुन?

त्याला मऊ करण्यासाठी त्यावर एव्हढे संस्कार करणार.....त्यापेक्षा नवीन आणून ताजेच खा.

श्री, पंण लाकडाची वखार, चंदनाची चिता, सिगारेटची पाकिटे जाळणारी माचिसची काडी कुठे त्यापेक्षा जास्त किंमतीला विकली जाते.
उपद्रवमूल्याची कदर नाही या जगात Sad

त्यापेक्षा नवीन आणून ताजेच खा. >>>> हा फार खर्चिक उपाय नाही का झाला? आणि अन्न टाकू नये या संस्कारांचे काय?

ते पचले नाही तर अजून खर्च होईल. तसेच शीळे अन्न टकले तर नाही पाप लागणार Happy

मंगला गोडबोलेंचे 'उरलंसुरलं' आठवले Lol

ते पचले नाही तर अजून खर्च होईल
> >>>
तो कसा? बस एक धागा आणखी काढावा लागेल. चीज पचायला काय करावे. मग तिथे मिळणारा फुकट सल्ला वापरावा. मी असेच करतो. मायबोलीवर जॉईन झाल्यापासून डॉक्टर, वकील, कुठल्याही प्रकारचे कन्सल्टण्ट, सल्लागार, मानसोपचार तज्ञ वगैरे ईत्यांदींची गरज गेल्या दोन वर्षांत मला तरी भासली नाही. प्रत्येक समस्येवर एक तरी सल्ला असा असतो ज्यासाठी एकही पैसा खर्च करावा लागत नाही. फक्त तो सल्ला कोणाकडून तरी मिळेपर्यण्त थांबायचे पेशन्स हवेत Happy

माझे काही प्रश्न
मोज्जारेला चीजचे स्तोम का माजवले जात आहे?????
मोज्जारेला चीजचा वाली कोण???
दगड झालेलं चीज चा वापर होणे, गरज की निर्लज्जपणा?
तुम्हाला तुमच्या दगड झालेल्या चीजचा गिल्ट येतो का???
चीज खायची लागलेली चटक कशी सोडवावी?????

शाखा व स्वजो चीज खातात का ????
सई ताम्हणकर कुठले चीज खाते बरे???

आणि अजून बरेच प्रश्न आहेत

मोदी काकांना ऍड करायची प्रचंड इच्छा आहे पण तूर्तास इथेच थांबू

Biggrin

आणि अजून बरेच प्रश्न आहेत>>>

आणि प्रत्येक प्रश्नाच्या गर्भी एक धागा प्रसवण्याची क्षमता! Wink

नोटाबंदीने लोकांचे कसे हाल होतायत त्याच्या हॄदयद्रावक कहाण्या सांगायला सुरुवात करा, ते कडक झालेले चीज मऊ होईल

घ्या मोदीकाकांना पण आणले इथे Wink

कापाकापीला बहुतेक हार्डनेस, ब्रिटलनेस असले सायंटीफीक शब्द वापरायला हवेत ना. >>> ऋन्मेष, क्या बात है !
मी आठवी, नववी दहावीला शिकलेय हे सर्व. हार्ड मटेरियल ब्रिटल असतं. टफ आणि ब्रिटल हे विरुद्धार्थी शब्द आहेत वगैरे. तुझ्या प्रतिसादामुळे पुन्हा शाळेत गेल्यासारखं वाटलं बघ.

गॅसकीट ने चीज कसं काय मऊ करतात याबद्दल वाचायला मिळेल म्हणून डोकावले होते खरं तर. एव्हढा प्लाण्ट उभारण्यापेक्षा सरळ दुसरं आणता आलं असतं असं आपलं मला अडाणी बाईला वाटतंय.

मी आठवी, नववी दहावीला शिकलेय हे सर्व.>>>> अरे व्वा! आमच्या कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षापर्यंत मुलांना हार्डनेस आणि टफनेस चा फरक माहिती नसायचा.....

ते चीज खुपच कडक झाल्यामुळे फेकुन देण्याची पाळी आली... आता पुन्हा चीज कडक होऊ नये यासाठी काय काय करावे किंवा कोणती खबरदारी घ्यावी? व सगळ्यात चांगले चीज कोनत्या कंपनीचे आहे? तसेच मला भरपूर आशक्तपना आलाय तर चीज खाण्यामुळे तो कायमचा दूर होईल का?