गुंतवणुक : सोने, पी पी एफ की शेअर बाजार

Submitted by साहिल शहा on 20 December, 2016 - 15:51

डिसेंबर ची सुट्टी लागली तर वेळ कसा घालवायचा यावर विचार करत होतो. त्यात भारतात कुठली गुंतवणुक मागच्या ६० वर्षात फायदेशीर ठरली असती याचा विचार आला. त्याच बरोबर गुंतवणुकीवर मिळणारा फायदा हा माहागाई पेक्षा अधिक आहे की नाही याचा पण अभ्यास करायचा होता. कधी तरी निव्रुत्ती घ्यावी लागेल आणि मग जवळ असणारा पैसा पुरेल की नाही हे पण बघायचे होते. त्यासाठी गुगल वर मागच्या ६० वर्षाचा डेटा सर्च केला. त्यात खालील गोष्टी मिळाल्या

१> CPI (Consumer Price Index) : CPI index दर वर्षी सरासरी किती माहागाई झाली ते दाखवतो. १९५८ साली ५.१५% माहागाई होती याचा अर्थ जर भारतिय लोक १९५७ साली १०० रुपये खर्च करत असले तर त्याच lifestysle साठी १९५८ मध्ये १०५.१५ रुपये लागतिल. (यात काही गोष्टीच्या किमती कमी झाल्या असतिल तर काही गोष्टीच्या किमती ५.१% पेक्षा जास्त दरानी वाढल्या असतिल.) गुगल वर १९५७ पासुन ते २०१६ पर्यन्तचा CPI index मिळाला. त्यानुसार जर १९५७ मध्ये १०० रुपये लागत असतिल तर त्याच lifestysle साठी २०१६ मध्ये ६९८० रुपये लागतिल. ह्या नंबर मध्ये आपल्या lifestysle नुसार थोडाफार फरक असु शकतो पण हाच डेटा उपलब्ध असल्याने दुसरा पर्याय नाही.

२> सोने: सोन्याचा १९५७ पासुन्च्या १० ग्रॅम च्या किमती मिळाल्या.

३> PF/PPF : १९६८ नंतरच्या PPF चे interest rate मिळाले. १९६८ च्या आधी पी पी एफ न्हवते म्हणुन पी एफ चे दर घेतले. बॅक फिक्स डिपॉसिट चे दर घ्यायचे होते पण ते उपलब्ध नसल्याने पीपीएफ चा डेटा घेतला.

४> BSE Sensex : मुम्बई शेअर बाजारानी ३० कंपन्याचा index १ एप्रिल १९७८ साली चालु केला. यात ३० प्रमुख कंपन्याचा बाजारभाव आणि एक्सेंज ने ठरवलेले वेटेज यानुसार १०० हा index ठरवला गेला. त्यानुसार रोज ह्या कंपन्याचा भाव बघुन रोजचा index काढला जातो. काळानुसार काही कंपन्या काढुन नवीन कंपन्या घातल्या जातात. जर आजचा index २६३०७.९८ आहे
याचा अर्थ जर १ एप्रिल १९७८ मध्ये ३० कंपन्यात १०० रुपये गुंतवले असतिल तसेच index च्या नविन नियमानुसार वेटेज आणि कंपन्या बदलल्या तर आज २६३०७.९८ रुपये मिळतिल. BSE Sensex चा दर वर्षीच्या डाटा BSE च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

हा सगळा डेटा घेउन एक तक्ता बनवला.

Untitled.jpg

वरिल तक्तामध्ये रुपयाचे मुल्य १९५७ =१०० प्रमाणे आहे. जर १९५७ मध्ये जर १०० घर खर्च यत असेल आणि तर त्याच lifestyle मध्ये २०१६ साली ६९७९.८७ रुपये खर्च येईल. जर १९५७ मध्ये पी एफ /पी पी एफ मध्ये गुंतवले अस्तिल तर आज ९९७९.३० मिळतिल. तसेच १०० रुपये सोन्यात गुंतवले असतिल लर २५००० रुपये मिळतिल. (९० रुपयेच गुंतवावे लागले असते पण १० रुपये तुट पकडली)

दर वर्षाचा व्याजदर आणि inflation index hike per year यावर आजुन एक तक्ता....
Untitled1.jpg

डेटा बघता सोन्यावर ६० वर्षात परतावा पी पी एफ पेक्षा जास्त आहे. म्हणुनच वयस्कर लोक सोन्यात गुंतवणुकीला पसंती देतात. पण त्याच वेळी मागच्या ५ वर्षात आणि १९८१-२००२ मध्ये सोन्याचा परतावा पीपी एफ पेक्षा कमी होता.
शेअर बाजारात परतावा खुप जास्त आहे पण त्यात जोखिम पण आहे. २००८ मध्ये इंडेक्स ६२% उतरला होता. मागच्या दोन वर्षात ईडेक्स जवळपास तेवढाच आहे. सामन्य माणसाला ३० कंपन्याचे शेअर घेणे शक्य नसते. ३-४ कंपन्या घेतल्या असता जोखिम आजुन वाढते.
१९९१ पर्यन्त inflation हे पी एफ / पी पी एफ पेक्षा जास्त होते. पण मागच्या २० वर्षात सरासरी व्याजाचा दर हा सरासरी inflation पेक्षा जास्त आहे.

काही राजकीय घडामोडी पण ह्या तक्यावरुन कळतात. १९७३ आणि १९७४ मध्ये माहागाई २०% च्या वर होती म्हणुन इदीरा गांधीना आणीबाणी आणावी लागली. १९६२ & १९६५ ची युध्द झाल्यावर २ वर्ष माहागाई भरपुर जास्त होती आणि व्याजदर कमी होते .

त्यामुळे जर आपली lifestyle जर तीच राहिली तर inflation आणि व्याज दर रद्द होतील. म्हणजे जर ३० वर्षाची same lifestyle मध्ये सोय करायची असेल आणि वर्षाचा खर्च १ लाख असेल तर ३० लाख रुपये असतिल तर निव्रुत्त होऊ शकतो. आणिबाणी किंवा युध्द ह्या सारख्या गोष्टी साठी १-२ वर्षाची अतिरिक्त सोय केल्यास आजुन चांगले.

ह्यावर तुमचे मत काय हे जाणुन घ्यायला आवडेल

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

(गावातल्या गरिबांनी काय करायचं! त्याना नेट कनेक्शन नाही तर शेअर कसे घेणार हा मुद्दा होऊ शकत नाही डोळा मारा )

घेतला दिवा.
त्यांच्याबद्दल सकाळीच दुसरीकडे लिहिलंय.
त्यांना मुलगा म्हणजे वंशाचा दिवा. त्यात इन्वेस्ट करतात ते लोक.
परतावा अजून तरी मिळतोय असा अनिभव आहे.

अमितव ,
ते ही माहित्येय.
पण मार्केट प्लस टाईप पॉलिस्या म्य्ज्च्युअल फंड इतका परतावा देतात का किंवा कसे याचा अभ्यास कुणी केलाय का?
असल्यास लिंक?

Nahi.

फंड management चार्जेस कंबरडे मोडतात. ते पहिल्या तीन वर्षीत वळते करून घेतात.

चांगला लेख आहे. मात्र पीपीएफ च्या बाबतीत खरेसाहेब म्हणतात तसे मुदल करमुक्त आहे. एवढेच नव्हे तर पीपीएफचे उत्पन्नही करमुक्त आहे. सोने किंवा शेअर्स विकाल तेंव्हा किमान कॅपिटल गेन्स टॅक्स तरी लागेल.

गुंतवणूक कमीअधिक जोखमीच्या आणि परताव्याच्या वेगवेगळ्या साधनात करतांना शून्य जोखीम, खात्रीशीर मर्यादित परतावा यासाठी माझ्या मते पीपीएफ सारखे साधन नाही. त्यामुळे दरवर्षी फक्त पाच लाख जरी गुंतवत असाल तरी करदात्यानी त्यातील पहिले दीड लाख रुपये हे पीपीएफ मध्ये टाकावे आणि मग इतर गुंतवणूक करणे फायद्याचे आहे असे मला वाटते.

फंड management चार्जेस कंबरडे मोडतात. ते पहिल्या तीन वर्षीत वळते करून घेतात.

Mutual funds (unit linked plans)

राजसी, तुमचे हे दोन्ही प्रतिसाद एकत्रच वाचायचेत ना?

म्य्च्युअल फंडांच्या युलिप्स कंबरडे मोडतात तर इन्शुरन्स कंपन्यांच्या युलिप्स ते मोडत नाहीत असं आहे का?

हा धागा वाहता झाला आहे त्यामुळे काही माहिती वाहुन गेली.

सध्या तरी पी पी एफ, आणि जर १ वर्षापेक्षा जास्त e-gold आणि शेअर ठेवले आणि NSE किंवा BSE मध्ये विकले तर करमुक्त आहेत. मी long term चा विचार करत असल्याने तिन्ही गोष्टी करमुक्त होतात. त्यामुळे वरचा लेखात कराचा विचार केला नाही.
पुढच्या २० वर्षाच्या बजेट मध्ये तिन्ही गोष्टी करमुक्त राहातिल की नाही ते माहित नाही.

e-gold शेअर बाजारात १ ग्राम च्या रुपात आहे आणि त्याची किंमत सोन्याचा किंमती नुसार कमी जास्त होत असते. सरकारी गोल्ड बॉड घेतले तर त्यावर २.७५% व्याज मिळते पण ते ७ वर्षासाठी आहेत. त्यामुळे जर कर वाचवायचा असेल ते मरायचा आधी विकुन नविन बॉड घ्यावे लागतिल. (व्याजावर कर भरावा लागेल, long term capital gain शेअर बाजारात विकुन वाचेल. जर ७ वर्ष पुर्ण झाली तर भारत सरकार चेक पाठवेल आणि ते शेअर बाजारात विकले गेले नसल्याने long term capital gain लागेल. ) गोल्डमन सॅच, अ‍ॅक्सिस किंवा स्टेट बॅकेचे गोल्ड open ended आहेत त्यावर काही व्याज मिळत नाही आणी ते ह्या बॅका मेल्याशिवाय किंवा बॅकानी बंद केल्याशिवाय मरणार नाहीत. ह्या सोन्यावर पण जर शेअर बाजारात विकल्यास long term capital gain लागणार नाही.

सध्या तरी सोन्याचा किंमती कमी होत आहेत. पण जेव्हा किंमती स्थिर झाल्यावर भारत सरकारचे e-gold जास्त attractive वाटत आहे. यात सोन्याचे appreciation मिळेल आणि त्यावर २.७५% व्याज पण मिळेल.

ELSS मधली गुंतवणू़क तुमची कर बचत करते आणि परतावाही करमुक्त आहे. तीन वर्षांचा लॉकिन असतो. पण तुम्ही दीर्घ मुदत = १० वर्षं धरून चालायला हवं.

इन्शुरन्स कंपन्या जे unit linked insurance विकतात त्यांचे fund management charges कंबरडे मोडतात Happy ह्याना insurance विकतोय सांगायची लाज वाटते कारण insurance म्हंटले कि कस्टमर पळवून लावतात, म्हणून ते अश्या पोलिसीज investment म्हणून विकतात. Insurance कंपन्यांना insurance शब्द वापरायला आवडत नाही.

स्पष्टीकरणाबद्दल आभार. पण आधीचा प्रतिसाद दिशाभूल करत होता. म्युच्युअल फंडांच्या युलिप्स मोजक्याच आहेत. माझ्या आठवणीनुसार त्यातील गुंतवणुकीची कमाल मर्यादाही बरीच कमी आहे.

तीन वर्षांचा लॉकिन असतो ---- हे मला आवडत नाही म्हणून माझ्या कडून अजून elss झालेले नाही. कितीही retirement ची सोय असेल तरी गरज पडली तर मला माझे पैसे अर्ध्या रात्री हाताशी पाहिजेत़.
पण तुम्ही दीर्घ मुदत = १० वर्षं धरून चालायला हवं --- हे argument पटते तरीही.

असाच लॉकिन ppf मध्ये पण आहे पण ते करूया असा विचार आहे. आता private bank नी ppf पण a mouse click away केलंय. That makes it more convenient.

Voluntary PF पण अजून एक मार्ग पैसे जमा करायचा. पैसा हातातच येत नाही तो एक प्लस पॉईंट आणि employers contribution सोडून बाकी सगळे PF benefits.

अर्ध्या रात्रीची गरज भागवणारी गुंतवणूक दुसर्‍या कशात तरी (उदा: डेब्ट फंड, लिक्विड फंड, बँकेत फ्लेक्सि डिपॉझिट) ज्यात आज पडलेल्या भावात विकायला लागतंय हा प्रश्न येणार नाही. एकाच पर्यायातून सगळे उद्देश साध्य करायची गरज नाही.

मला वाटतं पीपीएफ मध्ये दर महिना/वर्ष पैसे टाकावे लागतात, तरच अकाउंट ॲक्टिव राहतं. मी स्वत: इकडे येण्यापुर्वि माझे पीएफ वगैरेमधले पैसे विड्राॅ करुन पीपीएफ (स्टेट बॅंक) मध्ये टाकले होते आणि नंतर विसरलो. तर नविन नियमाप्रमाणे साधारण पहिले १५ वर्षांचंच व्याज अक्रु झालं आणि नंतर ते अकाउंट डाॅरमंट झालं. बरीच वर्ष डाॅर्मंट झाल्यानंतर स्टेट बॅंकेने लेटर पाठवलं कि अकाउंट डाॅर्मंट झालेलं आहे, गेले काहि वर्ष व्याज अक्रु होत नाहि तेंव्हा पैसे विड्राॅ करा... थोडक्यात एनाराय करता पीपीएफ हा पर्याय तितकासा सोयीचा नाहि आणि ८% व्याजानुसार फायदेशीरहि नाहि. त्याऐवजी बिर्ला, रेनीगेर, डिएचएफेल, युटिआय वगैरे चांगले फंड मिक्स आॅफर करतात, एनएसडिएल शी लिंक्ड आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आॅनलाइन ॲप्स/ॲक्सेस देतात प्रोग्रेस माॅनिटर करण्याकरता. शिवाय पीपीएफ सारखी अट नाहि, प्रत्येक महिना/वर्षाला पैसे टाकायची... Happy

मला वाटतं पीपीएफ मध्ये दर महिना/वर्ष पैसे टाकावे लागतात, तरच अकाउंट ॲक्टिव राहतं>>>>>>>>> प्रतिवर्षी ५००/- अकाउंट चालू ठेवण्यासाठी लागतात.

National Pension System बद्दल लोकांचं काय मत आहे?

चाळसाव्या वर्षी nps मधे पैसे टाकायला सुरुवात करावी का?

nps मध्ये गुंतवणुकीचा विचार मी करत होतो, पण विचार सोडुन दिला.

nps मध्ये दोन ऑपश्न्स आहेत टियर १ आणि टियर २ अकाउन्ट

टियर १ मध्ये विड्रॉ नाही करु शकत
टियर२ मध्ये विड्रॉ करु शकतो, पण त्यासाठी टियर १ ओपन करणे आवश्यक आहे

टियर १ ला टॅक्स बेनिफिट आहे (other than Rs.150000/-) ( मॅक्स रु.५००००/- वार्षिक भरु शकतो)
टियर २ ला टॅक्स बेनिफिट नाहीये

ऑन रिटायरमेंट टियर१ ला तुम्हस तुम्ही गुंतवलेले सर्वच पैसे मिळत नाही, काही पैसे रिइनवेस्ट होतात

खाली दिलेली लिंक तुम्हास काही मदत करु शकते का बघा
http://www.hdfcpension.com/nps-calculator.html

sbi मध्ये विचारलं तर तिला काहीच माहित नाही, ती सांगते तुम्हालाच माझ्या पेक्षा जास्त माहित आहे Uhoh ,nps च्या कॉल सेंटर वर पुअर रिस्पाँस आहे.

मला वाटतं मार्केट मध्ये एन्ट्री घ्यायची हीच वेळ आहे (not sure though, just wait and watch for some more days),

ideally what should be the ratio proportion, how much investment should be in market and how much in bank fd's

वरिल तक्तामध्ये रुपयाचे मुल्य १९५७ =१०० प्रमाणे आहे. जर १९५७ मध्ये जर १०० घर खर्च यत असेल आणि तर त्याच lifestyle मध्ये २०१६ साली ६९७९.८७ रुपये खर्च येईल. >>>>>>

@ सलिल, तुमची आकडेमोड कागदावर जरी बरोबर वाटत असली तरी हे वरचे वाक्य मुळातच चुकीचे वाटते आहे.

१९५७ साली महिना १०० रुपये हा स्टँडर्ड सरकारी वीशीतल्या माणसाचा पगार होता. तितक्या पैश्यात पुण्यासारख्या शहरात ३-४ माणसांच्या कुटुंबाला लोअर्/मिडल मिडलक्लास म्हणुन रहाता येत होते. आजुबाजुचे ९० टक्के लोक पण तितक्याच इन्कम ब्रॅकेट मधे असायचे.

पण २०१६ साली ७००० रुपयात पुण्यात ४ चार माणसांचे कुटुंबा लोअर मिडलक्लास म्हणुन तरी जगु शकते का?

माझ्या मते सोन्यानी जितका परतावा दिला आहे, त्याच्याच आसपास खरी महागाई आहे.

म्हणजे १९५७ सालचे १०० रुपये = २०१६ सालचे २५००० रुपये.

अरे.. हा वाहता धागा आहे. काल मी इथे बल्क इन्व्हेस्टमेंटबद्दल विचारले होते. कोणी उत्तर दिले असेल तर मी मिस केले Sad साधारणपणे २ लाखा पर्यंत इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर कशात करावी ? मोठ्या कंपन्यांचे शेअर घेऊन ठेवावेत का सोने का पीपीएफमध्ये टाकावेत? का सगळं थोडं थोडं? धागा वाहता आहे त्यामुळे प्लिज विपू करा.

पी पी एफ मध्ये खाते चालू रहाण्यासाठी दरवर्षी किमान ५०० रुपये भरावेच लागतात. ते एकाच महिन्यात भरा वा थोडे थोडे पण ५० रुपयांच्या पटीत भरा.पहिल्या पंधरा वर्षांची मुदत संपल्यानंतर, पुढे प्रत्येक पाच वर्षांसाठी खात्याची मुदत वाढविता येते. ती कितीही वेळा वाढविता येते. त्यातही दोन प्रकार आहेत. With Investment and without investment म्हणजे असे की वाढविलेलया पाच वर्षात दरवर्षी किमान ५०० रुपये वा त्याहून जास्त , मात्र कमाल मर्यादा म्हणजे दीड लाख रुपये प्रती वर्षी, असे भरावे लागणार किंवा आहे त्या शिल्लक रकमेचे व्याज फक्त खात्यात जमा होत जावून खाते जिवंत रहाते.
पण नवीन शासकिय धोरणानुसार, पी पी एफ खात्यावरील जमा रकमेवर यापुढे तिमाही घोषीत व्याज मिळणार आहे, त्यामुळे मोठी रक्कम गुंतवायची असल्यास , ती केंव्हा गुंतवावी हा मोठाच प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकदा, व्याज निश्चिती करण्यार्‍या समितीची बैठकच होत नाही, त्यामुळे मागील तीन महिन्यांसाठी असणारा दर कायम ठेवला जातो.

>>मात्र कमाल मर्यादा म्हणजे दीड लाख रुपये प्रती वर्षी,<<

हा नियम सुद्धा एनाराय साठि डिटरंट ठरु शकतो. माझ्या आत्तापर्यंतच्या माहितीनुसार म्युचुअल फंड्स विथ प्राॅपर ॲलाॅकेशन हॅव कंसीस्टंटली आउटपरफाॅर्म्ड सेंसेक्स/निफ्टि लेट अलोन पीपीएफ...

National Pension System बद्दल लोकांचं काय मत आहे? >>>
इथे मायबोलीवर्ची चर्चा आहे: http://www.maayboli.com/node/23040

साधारणपणे २ लाखा पर्यंत इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर कशात करावी ? >>>
साधारण ९/१० वर्षांपर्यंत ते पैसे लागणार नसतील तर शेअर्स चांगला पर्याय आहे. ब्लूचीप्स निवडले तर तुलनेने धोका कमी असतो. ५०% शेअर्स आणि ५०% गोल्ड ETF / PPF / Debt fund यात ठेवावे.

साधारण ९/१० वर्षांपर्यंत ते पैसे लागणार नसतील तर शेअर्स चांगला पर्याय आहे. ब्लूचीप्स निवडले तर तुलनेने धोका कमी असतो. ५०% शेअर्स आणि ५०% गोल्ड ETF / PPF / Debt fund यात ठेवावे.
>>>

धन्यवाद माधव..