तुम्हाला तुमच्या वाढलेल्या / वाढत्या वयाचा गिल्ट येतो का???

Submitted by सिंथेटिक जिनियस on 14 December, 2016 - 10:20

आपण लहान असतो तेव्हा आपल्याला आपण कधी एकदाचे मोठे होतो असे सतत वाटत असते.लहानपणाची मजा जरी वेगळी असली तरी प्रत्येकाला मोठेपणाच्या एलाईट क्लबात सामिल व्हायचे असते.मी लहान असताना स्वतःला दाढीमिश्या काढून आपण मोठे झालो आहोत अशी स्वतःची समजुत करुन घ्यायचो.वडील म्हणायचे तुलाही येतील दाढी मिश्या,जरा कळ काढ .यथावकाशात मला भरघोस दाढीमिश्या आल्या.मी नवतरुण होतो.दाढी कोरणे ,मिश्या वाढवने असले प्रकार कॉलेजमध्ये करायचो.त्यावेळेस आमच्याकडे यझदी गाडी होती ,ती गावातून सुसाट पळवणे हा माझा छंद होता.
काही दिवसांपुर्वी मी आरश्यात बघत असताना लक्षात आले की आपले केस पांढरे व्हायला लागले आहेत.पुर्वीची दाढीची काळीभोर खुंट आता बरीच पांढरी पडायला लागली आहेत.तरी मी दाढी वाढवली.यथावकाश आजुबाजुचे माझे तरुण मित्र मला " ओ काका " अशी हाक मारुन चिडवायला लागले.ज्या षोडशा मला दादा म्हणायच्या त्या काका म्हंणायला लागल्या तेव्हा माझी झिंग उतरली.विचार करु लागलो ,आता आपण नवतरुण राहीलेलो नाही.आपण ३० नुकतेच पार केले आहे.त्यादिवशी नेहमीप्रमाणे मैदानावर चालायला गेलो.एक रनिंग करणारा मित्र भेटला ,त्याच्या बरोबर थोडे रनिंग करुन बघुयात म्हणून पळायला सुरवात केली.अवघ्या काही सेकंदात धाप लागायला लागली.हातानेच त्याला पुढे जायला सांगितले व तिथेच थांबलो.घरी येताना बाईक चालवत येत होतो,आजुबाजुने नवतरुणांच्या बाइक्स सुसाट जात होत्या ,मी बराच संथ चाल्वत होतो,दहा वर्षापुर्वीचा यझदीवरचा वेग मला आता भीती दाखवत होता.मला आठवायला लागले ते कॉलेजमधले दिवस ,१८,१९ वर्षांचा असताना अंगात असलेली रग,बेदरकारपणा कुठल्याकुठे उडून गेला होता.राहीले होते फक्त ७० किलोचे संथावलेले शरीर.वयाने त्याचे परिणाम दाखवायला सुरवात केली आहे.
अजुन मिडलाईफ यायला खुप वेळ आहे.पण त्याची आतापासुनच भीती वाटायला लागली आहे.साठीतले रोग आजकाल चाळीशीत आले आहेत.न जाणो आपल्यालाही चाळीशीतच डायबेटिस ,हार्ट् ब्लॉकेज असे काही जडले तर?
मग या वाढत्या वयाविषयी इतरांना काय वाटते ते विचारुन बघितले.सगळ्यांनी माझाच विचार परत माझ्यापाशी बोलुन दाखवला.मित्र ही तेच बोलत होते.साला आजकाल पुर्वीसारखा जल्लोष वाटत नाही कशात.
या वाढत्या वयाचा शाररीक ,आर्थिक , लैंगिक ,भावनिक सर्व् पातळ्यांवर परिणाम होतो.हळवेपणा वाढतो,होपलेसनेसही वाढत जातो.एखाद्या फटाका मुलीने दिलेले किलर लुक तितकीशी शिरशीरी आणत नाहीत ,जेव्हढि कॉलेजमध्ये यायची.शेतीच्या कामात मी नियमीत लक्ष घालत असल्याने तिथे अजुन वयाचा परिणाम तितपत जाणवत नाही.असो ,मी माझेच पुराण सांगत बसत नाही.तुम्हाला ,स्त्री पुरुष दोघांना माझे काही प्रश्न.
१. तुम्हाला तुमच्या वाढलेल्या/वाढत असलेल्या वयाचा त्रास होतो का?
२.वाढत्या वयाचे काय शाररीक ,मानसिक,आर्थिक परिणाम होत आहेत.? पॉझिटिव्ह की निगेटिव्ह.
३. वयाबरोबर सौंदर्य लोप पावत असे म्हणतात ,अदर सेक्सला तुम्ही कमी अपील होत जात आहात का? यावर उपाय काय ?
४.आपल्याला सुयोग्य आहाराने वय लपवता येते,आपण तरुण दिसतो हे कितपत खरे आहे?
५.ग्रेसफुल एजिंग हा काय प्रकार आहे ते मला समजले नाही,कुणी सोप्या शब्दात सांगितले तर आभारी राहीन.
धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. वयाचा त्रास? वय म्हणजे एक संख्या - नि ती वाढतच जाते प्रत्येक माणसाच्या आयुष्यात - उगाच कशाला त्रास करून घ्यायचा?
२. शारीरिक परिणाम - काय विचारता राव, एक दिवस जात नाही की कुठे तरी काही तरी दुखते, बरे वाटत नाही वगैरे.
मानसिक परिणाम - विचार करकरून स्वभावातला धांदरटपणा, राग, काळजी करणे असल्या गोष्टी कमी केल्या आहेत, शांत असते मन बहुतेक वेळा.
आर्थिक - अहो निवृत्त झाल्यावर पैसा घरात येणे एव्हढे कमी झाले की भीतीच वाटावी - पण रेटतो आहे कसे बसे. (तुमचा नाव गाव पत्ता देऊन ठेवा, चार पैसे लागले तर द्याल अशी आशा आहे - भारतात काय प्रत्येकाकडे हजार कोटी रुपये असतात म्हणे. Happy )
३. सौंदर्य? ते फारसे नव्हतेच, कमी झाले ते कळणार कसे? पण कुणावर टीका केली नाही, रागावलो नाही, जमेल तितकी नि तेंव्हा मदत केली तर सर्वच लोक तुमच्याशी नीट वागतात असा अनुभव आहे. आता तरुणपणी जसे वाटायचे तसे, ना माझ्या वयाच्या बायकांना ना पुरुषांना! आपले उगीचच पहायचे झाले, पुढे काही नाही.
४. अगदी खरे. काही महात्मे करतात तसे नि ते दिसते. बाकी आहारात औषधांचे प्रमाण मोठे, पण प्रकृतीच्या व्याधी तश्याच.

५. असे म्हणतात की वयाप्रमाणे आपला मान राखून रहावे, तरुणांच्यात लुडबुड करायला जाऊ नये, म्हणजे ग्रेस कमी होत नाही. मी मात्र मायबोली सोडू शकत नाही, कितीही खड्ड्यात गेली ग्रेस तरीहि. आपण आपले सुखी रहावे, त्याला च ग्रेसफुल म्हणायचे.

' गिल्ट ' ला मराठीत प्रतिशब्द सापडला नाही कां ? ' वय वाढत असते, त्यात अपराधीपणाच्या भावनेला जागाच कोठे असू शकते? उलट वाढत्या वयाकडे बघून , जेष्ठ नागरिकाचे फायदे मिळत असतात ते वेगळेच, फक्त आपण तरूणांच्या कारभारात लूडबूड करायची नाही, म्हणजे झाले.शारीरिक जोश कमी होत जातो त्यामुळे फार धाडसाच्या कामांना , ट्रेकिंग, खुप मोठ्या चढावावर चालत जाण्याचा अट्टाहास करणे, शरिराला झेपले जाणार नाही अश्या कसरती करणे, धावणे इ इ टाळावयास हव्यात एव्हढेच. मानसिक बघता , वाढत्या वयाबरोबर , अनुभवाच्या शिदोरीवर , शहाणपण मात्र आले पाहिजे,अन्यथा फजितीला पारावार नाही. आर्थिक स्थैर्य आपले आपणच व्यवस्थित ठेवले तर , कोणापुढेही , अगदी पोटच्या मुलांपुढे सुद्धा , हात पसरवण्याची पाळी येऊ देता कामा नये. त्यासाठी आपल्या गरजा मात्र सिमित ठेवणे आवश्यक आहे. मी एक वाक्य वाचले होते, ' मी माझ्या घरात अगदी सुखी आहे, कारण माझ्या दुसर्‍यांकडून फारच कमी अपेक्षा आहेत. ' अपेक्षा जेव्हढ्या जास्त, तेव्हढे अपेक्षाभंगाचे दु:ख जास्त, अपेक्षा कमी तर अपेक्षाभंगाचे दु:खही कमीच, आणि अपेक्षाच जर नसतील, तर अपेक्षाभंगाचे दु:खही नाहीच. इतका साधा विचार मनात ठेवावा. अर्थात सर्वांना हे जमेलच असे नाही, पण प्रयत्न करण्यास काय हरकत आहे.सौंदर्याबद्दल फुकाचा अभिमान बाळगण्यात काय अर्थ आहे ? कितीही गोरा वा गोरी असली तरीही युरोप्/अमेरिकेत मात्र , " ब्लॅक मॅन " , तेंव्हा सौंदर्याबद्दल्चे खुळ जर भरले असेल तर ते वेळेवरच काढलेले बरे,नियमित आहार व योग्य योगासने करून, वय लपविण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा, शेवटपर्यंत , म्हणजे मरण येईपर्यंत, निरोगी रहाण्याचा उद्योग करावा हे अधिक श्रेयस्कर, असे माझे मत आहे.

Pages