काही दिवसांपूर्वी सिंहगड पायथ्याशी एका कामानिमीत्त गेलो असता एका प्रचंड केशरी झाडाने माझे लक्ष वेधुन घेतले. एकही पान नसलेले हे झाड म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसुन आपले 'पळसाला पाने तिन' वाले पळसाचे झाड होते. झाडावर तिन सोडाच एकही पान नव्हते. संपूर्ण झाड फुलांनी डवरलेले होते. नेमका कॅमेरा जवळ नव्हता. तो नसण्याचा एक फायदा झाला की डोळे भरुन झाडाकडे बघता आले. अजयने म्हणल्याप्रमाणे लांबुन पळसाचे झाड व पांगारा सारखेच दिसते. हे बघा.
www.flickr.com/photos/dinesh_valke/454227254/
दुधाची तहान ताकावर या हिशोबाने मी एक फांदी तोडुन आणली व फोटो काढलेच.
या दिवसात काटेसावर पण फुलते पण त्याची फुले खूप मोठी, लांब लांब व गुलाबी असतात.
कॅमेरा नेता आला नाही म्हणुन हळहळ व्यक्त करत मी परत आलो पण पुढच्या आठवड्यात कॅमेरा घेऊन नक्की जायचेच असे ठरवून गेलो तर हाय रे दैवा. पूर्ण झाडावर एकही फुल नाही व थोडी पाने दिसली. हताश व्हायच्या आतच मला आणखी काही झाडे दिसली.
झाडाखाली असा खचाखच सडा पडला होता.
बाजुलाच एक सागाचे झाड असल्याने त्याच्या पानांवर ही फुले भलतीच खुलुन दिसत होती. पळसाची पाने पण बघता आली. साधारण सागाप्रमाणेच पळसाची पाने असतात. पूर्ण पळसाला तिनच पाने असतात की काय असा माझा गैरसमज होता. प्रत्यक्षात एका देठाला ३ पाने असतात.
पळसाचा रंग इतका गर्द असतो की याच्या फुलांपासुन रंग बनवला जातो. अनेक ठिकाणी होळीला याचा नैसर्गीक रंग बनवताना वापर होतो. तसेच याची फुले काही औषधांमधेही वापरली जातात त्यामुळे बाहेरच्या देशात खास औषधांकरता या वृक्षाची लागवड केली जाते.
काय भारी
काय भारी फोटो आहेत! सड्याचा फोटो मस्त..
आणि ती वाळून पडली मग रे? 

पळसाच्या झाडाला तीनच पाने..
पण पळस आणि गुलमोहराला आगीची उपमा का देतात ते तुझ्या फोटोतून दिसले..
----------------------
एवढंच ना!
बघितले,
बघितले, आवडले रे फोटो!

)
व्हेरी गुड!
पाशा मोड ऑन
(आता झाडपाला/निसर्गाचे फोटो काढू लागलाहेस हे बघुन खूप खूप बरे वाटले
पाशा मोड ऑफ
...;
आपला, लिम्बुटिम्बु
कांद्या,
कांद्या, सुरेख फोटोज.
पळसाच झाड मी पाहिलं नव्हतं. खूपच आवडले फोटो. आता एकदा पुण्याला येईन तेंव्हा जाऊया.
विनायक, फोट
विनायक,
फोटो उच्च आलेत..
मला दुसरा
मला दुसरा फोटो आवडला........बाकीचेही मस्तच,..... पांगा-याचेही फोटो टाक म्हणजे फरक कळेल..
मी जिथे राहते तिथे सगळीकडे काटेसावरीची झाडेच झाडे आहेत.. सद्या मस्त फुललीय.. तिला शाल्मली असेही म्हणतात..
----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.
तुमच्या
तुमच्या सिग्नेचर मधे 'हे बघा' असं २-३ वेगवेगळ्या बाफवर वाचण्यात आलं... म्हंटलं बघावं काय आहे... तर काय .. कसले सही फोटो बघायला मिळाले...
छानच आहेत सगळे फोटो... आवडले...
धन्यवाद
धन्यवाद लोक्स. थोडा बदल करुन आणखी २ फोटो टाकले आहेत.
छान आहेत
छान आहेत फोटोज. मस्त एकदमच आवडले.
ज्याला आपण 'प्लासी' (सिराजौद्दौला, प्लासीची लढाई आठवले का?) तिथे पूर्वी पळसाची जंगले होती.
त्या जागेला 'पलासी' असे म्हणत. त्याचेच पुढे 'प्लासी' असे झाले. त्याला एक नाव 'ढाक' असेही आहे.
सूर्य आणि पॄथ्वी यांच्यातल्या एका पुराणकथेतून पळसाचा ऊगम झाला अशीही आख्यायिका आहे. सुर्याने मारलेल्या बाणाचे अग्र म्हणजे पळसाची पाने असे काहीतरी..........
-----------------------
2b || !(2b)
शेवटचा
शेवटचा फोटो मस्त आलाय...
बो-विश, पौर
बो-विश,
पौराणिक संदर्भ छान आहे.
पळसाची पाने म्हणजे सुर्याने मारलेल्या बाणांचे अग्र ही कल्पना खुप म्हणजे खुपच आवडली मला.
- सुरुचि
बोविश, छान
बोविश, छान माहीती. बाकी लोक्स धन्यवाद.
छान फोटो. काही फोटो दिसत
छान फोटो.
काही फोटो दिसत नाहीयेत. परत टाकशील का?
मस्तच. शेवटचा खुप आवडला.
मस्तच. शेवटचा खुप आवडला.
सावली मायबोलीच्या जागेत सेव्ह
सावली मायबोलीच्या जागेत सेव्ह केले होते ते फोटो त्यामुळे दिसत नाहीयेत. आता काटेसावरीचे टाकीन त्यात ते टाकतो.
आहेत माझ्याकडे.
"Flame of the Forest ! " क्या
"Flame of the Forest ! " क्या बात है !!
सुंदर फोटो !!
केपी, झब्बु देते रे. आणि हा
केपी, झब्बु देते रे.
आणि हा पण
धन्यवाद भाऊ. शुभांगी
धन्यवाद भाऊ.
शुभांगी तुलासुध्दा. मस्त बहरलेले झाड आहे.
सर्व फोटो अप्रतिम! आणि माहिती
सर्व फोटो अप्रतिम! आणि माहिती पण छान. आत्ता काटेसावर,पळस,पांगारा,सोनसावर (गणेर),तबेबुया फुलले आहेत.कात्रजच्या घाटात तर रंगपंचमीच दिसते.
हा माझ्याकडुन एक
हा माझ्याकडुन एक
Pages