नको तेव्हा असे लांछन कशाला

Submitted by जयदीप. on 11 December, 2016 - 23:08

एक गझल :

नको तेव्हा असे लांछन कशाला
मिळालेले तुला यौवन कशाला

नफ्यामध्ये तुला वाटा मिळाला
हवे आहे तरी वेतन कशाला

हवा खाऊनसुद्धा पोट फुगते
करत आहेस तू लंघन कशाला

निघाले, पाहिजे होते तुला जे
सुरू ठेवायचे मंथन कशाला

मला माहीत नाही अर्थ त्याचा
म्हणत आहेस तू लोचन कशाला

खगाचे पिंजर्यावर प्रेम आहे
झुगारुन द्यायचे बंधन कशाला

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निघाले, पाहिजे होते तुला जे
सुरू ठेवायचे मंथन कशाला

मला माहीत नाही अर्थ त्याचा
म्हणत आहेस तू लोचन कशाला<<<< सुरेख