दिल्ली आग्रा अमृतसर सहल माहीती हवी आहे

Submitted by माणिकमोती on 10 December, 2016 - 02:35

साधारण १ मार्च २०१७ ला दिल्ली- आग्रा- अमृतसर ट्रिप करायचा विचार आहे. आधी त्या भागात कधी गेलो नाहीये. कृपया जाणकारानी योग्य सल्ले द्यावे. कच्चा आराखडा असा आहे:

1. राजधानी एक्सप्रेसने किंवा विमानाने मुंबई-दिल्ली.
नेटवर 2 राजधानी एक्सप्रेस दिसत आहेत. मुंबई-दिल्ली आणि मुंबई-निजामुद्दीन. कोणती बरी? आणि राजधानीचे जितके नाव आहे तितकी खरच worth आहे का? की विमानप्रवासच बरा?

2. साधारण 2-3 दिवस दिल्ली फिरणे. त्यात लाल किल्ला, लोटस टेम्पल, क़ुतुब मिनार, राज घाट, इंडिया गेट, राष्ट्रपती भवन, जामा मशिद, चाँदनी चौक, पराठा गल्ली/खाऊ गल्ली( ह्या गल्ल्या कुठे आहेत? चाँदनी चौकातच का?) ही ठिकाणी बघायची आहेत. 3 दिवस पुरतील का?

3. दिल्लीतील ठिकाणे सोमवारी बंद असतात असे ऐकले. अजुन काही विशेष सूचना? ही ठिकाणे फिरण्यासाठी कोणता ट्रांसपोर्ट मोड सुरक्षित आहे?

4. Kingdom of dreams काय आहे? जावे का?

5. एक संपूर्ण दिवस ताजमहाल आणि आग्रा फोर्ट साठी ठेवायचा विचार आहे. ताज महाल रात्री परत जाऊन बघायची इच्छा आहे. तिथे निवासाची सोय कशी आहे? ताज महाल बघायची वेळ किती ते किती आहे? दिल्ली-आग्रा-दिल्ली प्रवास कश्याने करावा?

6. दिल्लीला परत येऊन अमृतसरला जायचे आहे. की आगरयाहुनच जाता येईल?

7. अमृतसरला सुवर्ण मंदिर, जलियांवाला बाग़, वाघा बोर्डर येथील "lowering the flag ceremony", अकल तख्त, लक्ष्मी नारायण मंदीर, हॉल बाजार येथे shopping हे बघायचे आहे. सुवर्ण मंदिर रात्री परत एकदा जाऊन बघायचे आहे.

8. अमृतसरला एक दिवस एखादा छानसा farm stay/dairy farm stay करायचा आहे.

9. वरील सगळ्या ठिकाणी काय काय खरेदी करता येईल? अजुन कोणती ठिकाणे add किंवा वजा करता येतील? (फ़क्त शाकाहारी)खाण्यासाठी कुठे काय ख़ास मिळेल? Private ट्रान्सपोर्ट सुरक्षित नाही असे ऐकले आहे. मग काय सोय करता येईल?

10. दिवस: दिल्ली 3
आग्रा 1
अमृतसर 3
जाण्या येण्यासाठी 1
एकूण 8 दिवस पुरतील का?

9. मी पहिल्यांदाच अशी स्वतः ट्रिप आयोजित करुन जाणार आहे. अजुन कोणकोणत्या सूचना डोक्यात ठेऊ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वाह! सेम योजना माझ्याही डोक्यात घोळतेय. प्लीज जाणकारांनी सविस्तर माहिती द्या म्हंजे मला पण उपयोगी पडेल. Happy
अजुन एक, खवैयेगिरीची ठिकाणे पण सांगा.

बाकिचे डीटेल्स नाही सांगता येणार पण मुंबई दिल्ली हा प्रवास विमानानेच केलेला चांगला. राजधानीचा प्रवास सुखाचा असला तरी तिकिट मिळणे अवघड असते आणि इतका वेळ तिच्या प्रवासात घालवण्यापेक्षा, तेवढेच जास्त फिरता येईल. आता बूक केले विमानाचे, तर चांगले डील मिळेल. भरपूर फ्लाइट्स असतात.

दिल्लीत लोकल टूअर्स घेतल्या तर फटाफट सगळे बघून होते, मग त्यातले एखादे ठिकाण आवडले तर परत निवांत जाऊन बघता येते. वरची सर्व ठिकाणे त्यात दाखवतात.

दिल्लीत जागोजागी खाऊगाड्या लागतात, चवदार पदार्थ मिळतात. दिवसभरात भटकताना चरता येते. फिरताना जिथे जिथे मेट्रोने जाणे शक्य आहे तिथे मेट्रोने जा. लोकल बसेस काही तितक्याश्या चांगल्या नाहीत.
प्रत्येक राज्यांची दुकाने समोरासमोर आहेत तिथे छान कपडे व इतर वस्तू मिळतात. बाकी ठिकाणी घासाघीस करावी लागते आणि माल नीट पारखून घ्यावा लागतो.

एरवीही दिल्लीत शक्यतो पंजाबी अ‍ॅक्सेंट मधे बोलले तर प्रभाव पडतो. आपले मराठीपण शक्यतो उघड करु नये.

दिल्लीला शहर फिरायला कुठलीही लोकल टूर घेऊ नका. आम्ही hoho बस बुकिंग केलेली पण तिथे गेल्यावर लक्षात आले की बुक नसती केली तर बरे झाले असते. पूर्ण दिल्ली वेगवेगळ्या मेट्रो रुट्स नि व्यवस्थित जोडलेली आहे. सगळी ठिकाणे व्यवस्थित मेट्रो वापरुन पाहता येतात. आणि मेट्रोला प्रचंड गर्दी वगैरे नसते. व्यवस्थित प्रवास करता येतो. खूप कुप्रसिद्ध असले तरी टक्सिवाले सुद्धा एवढे काही लुबाडत नाहीत. कुठून कुठे कसे जायचे हे गुगल मॅप वर पहा. गुगल मेट्रो line पण दाखवतो.

स्वामी नारायण मंदिर पाहायला खूप वेळ लागतो कारण एकतर आत प्रवेश करायची व्यवस्था किचकट आहे, खूप सिक्युरिटी आहे, अर्धा पाऊण तास आत पोचायला लागतो आणि आत गेल्यावर पाहण्यासारखे खूप आहे. मला मंदिर फारसे आवडले नाही पण बागा सुरेख आहेत. आत पोहोचेपर्यंत खूप वेळ गेल्यामुळे संध्याकाळी बागा पाहता आल्या नाहीत. संध्याकाळी लेझर शो असतो तो चुकवू नका.

लोटस टेम्पल जरी संध्याकाळी 7 ला बंद होत असले तरी तुम्ही गेटवर 3 का 4 वाजेपर्यंत पोचला नाहीत तर त्यानंतर आत घेत नाहीत. आमचे पाहायचे राहिले. आम्ही बहुतेक 4 नंतर पोचलो.

ताज पाहण्याची सर्वोत्तम वेळ भल्या पहाटे 6.30 ला ताज उघडतो तेव्हा. शुक्रवारी बहुतेक बंद असतो. आदल्या रात्री आग्र्याला राहा आणि सकाळी 5.30 ला जाऊन रांगेत उभे राहा. सकाळी 8 नंतर गर्दी वाढते. आत जिथे कबरी आहेत ती जागा लहान आहे, गर्दी वाढली की तिथे खूप घुसमटायला होते. त्यामुळे सक्कळीच बघून घेतलेली बरी. तसेही खालची जमीन वगैरे सगळेच संगमरवरी पांढरेअसल्याने दुपारच्या वेळी उन्हात त्रास होण्याची शक्यता आहे. माझ्या एक कलीगने दुपारी अडिज वाजता ताज पाहीला, भयंकर वैतागलेला. आम्ही सकाळीच 5.30 ला रांगेत राहून 6.30ला एंट्री केली, मनसोक्त ताज पाहता आला. ताज जवळ फतेहपूर सिक्रीलाही अवश्य भेट द्या. बहुतेक तिकीट काढायला आणि आत जायला बायका व पुरुष रांगा वेगळ्या असतात. तिकीट काढताना बायकांची रांग लहान असल्याने फायदा होतो (तरी नक्की आठवत नाहीये मला). आत जायची रांग वेगळी हे मात्र नक्की. सकाळी दर्शन घेणाऱ्यात परदेशी जास्त असतात.

रात्रीचे ताज दर्शन बहुतेक पौर्णिमेलाच आणि आजूबाजूचे एकदोन दिवस मिळू शकते. बाकी दिवशी ताज संध्याकाळी साडेसहा सात ला बंद होतो.

खादाडी भरपूर आहे.

दिवसा दिल्ली पूर्ण सेफ आहे, आम्ही रात्री 10 वाजे पर्यंत हॉटेलवर परतत होतो, भीती वगैरे अजिबात वाटली नाही. आणि तसेही नवीन ठिकाणी आपण स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे, दागिने, पिशव्या वगैरे नीट सांभाळायला हवे. कधीकधी एखादी जागा पाहिली कि तिथे जाऊ नको हि सूचना मन देते, ती ऐकावी. भलते धाडस करू नये.

प्रवास विमानाने केलेला बरा कारण वेळ वाचतो. दिल्ली पुढचा प्रवास मात्र रस्त्याने करावा लागेल. आम्ही दिल्ली आग्रा गाडी बुक केलेली. रिटर्न भाडे 7500 साधारण होते. दिल्लीला राहायला हॉटेल येस प्लिज cottage, बुकिंग.कॉम चे रिव्ह्यू वाचून केलेले. पहाडगंज साइख्या मध्यवर्ती भागात असल्याने टॅक्सी, रिक्शा, मेट्रो सगळे जवळ होते. आम्ही मेट्रोस्टेशन वरून चालतच हॉटेल ला परतायचो. हॉटेल तसे निवांत, रूम्स पण प्रशस्त, आम्ही 4 जणांसाठी 1 आणि 3 जणांसाठी 1 अशा दोन रूम्स घेतलेल्या. खूप छान होत्या.

साधारण 2-3 दिवस दिल्ली फिरणे. त्यात लाल किल्ला, लोटस टेम्पल, क़ुतुब मिनार, राज घाट, इंडिया गेट, राष्ट्रपती भवन, जामा मशिद, चाँदनी चौक, पराठा गल्ली/खाऊ गल्ली( ह्या गल्ल्या कुठे आहेत? चाँदनी चौकातच का?) ही ठिकाणी बघायची आहेत. 3 दिवस पुरतील का?>>>>

राष्ट्रपती भवन फक्त शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी खुले असते. त्याचे आधी बुकिंग करावे लागते. तुमच्या दिल्ली वास्तव्यात ते उपलब्ध आहे का ते पाहून घ्या.
साधारण तीन दिवस पुरतील हे सगळे बघायला. टॅक्सी भाड्याने घेऊन अथवा मेट्रोने आरामात फिरु शकता. मेट्रोने फिरणार असाल तर साधारण भुगोल जाणून घ्या आणि त्यानुसार बेत ठरवा. जसे की राष्ट्रपती भवन, इंडिया गेट एकाच ट्रीपमध्ये बघता येईल.
जंतरमंतर आणि बांगला साहिब गुरुद्वारा एकाच भागात येतात साधारण.
तुम्ही कुठे राहणार आहात तिथून मेट्रो स्टेशन किती लांब आहे हे देखील बघून त्यानुसार ठरवा.तसे इकडे टॅक्सीवाले लुबाडत नाहीत. साधारण भाडे मी एकदा चेक करून सांगते.
अक्षरधाम निवांत पाहायचे असल्यास साधारण ४-५ तास लागतात. तसेच राष्ट्रपती भवन टूर साधारण २-३ तासांची आहे. राष्ट्र्पती भवन टूर आणि रा. ब. म्युझियम टूर या वेगवेगळ्या आहेत. दोन्ही टूर्स मस्त आहेत. बुकिंग करताना नीट लक्ष देऊन बुकिंग करा. या शिवाय कुतुब मिनार ही बघण्यासारखा आहे.
लाल किल्ला बघायला गेलात तर वाटेवरच शंकर यांचे बाहुल्यांचे संग्रहालय आहे. तेही बघण्यासारखे आहे. शिवाय एक मेट्रो म्युझिअम आणि एक रेल म्युझिअमही आहे पाहण्यासारखे.

Kingdom of dreams काय आहे? जावे का?>>> मी अद्याप गेलेले नाहीये पण मुद्दाम वेळ काढून जाण्यासारखे नाहीये असे ऐकले. तिथे एक लाइव्ह शो असतो तो सोडला तर बाकी काही बघण्यासरखे नाहीये असे ऐकले आहे.

पूर्णवेळ टॅक्सी करायची नसेल तर तुम्ही ओला कॅब किंवा उबेर कॅबही करू शकता. पुर्ण दिवसासाठी कॅब बुक करता येते.
सरोजिनी मार्केट, पालिका बझार आणि लाजपत नगर मार्केटलाही भेट देऊ शकता.

उत्तरेकडे सध्या थंडीची लाट आली आहे अशी बातमी नुकतीच वाचली म्हणून बघायला आलो की तुम्ही नक्की कधी जात आहात..

बाकी काही चुकले तरी चालेल वाघा बॉर्डर चुकवू नका. तसेच तिथे वेळेत जा. देशावरचे गाणे ऐकले तरी अंगावर सर्रकन काटा येणारी जमात आपली, तो तर भारी अनुभव असतो.

मार्च २०१७ पासुन २ वर्षे ताजमहाल रिनोव्हेशन साठी बंद असणार आहे, असे वाचले. कृपया ते कन्फर्म करुन जाणे. कारण सेम प्लान मी केवळ त्यासाठी नुकताच रद्द केला.

http://www.easyvoyage.co.uk/travel-headlines/taj-mahal-dome-renovations-...

वाघा बॉर्डर उगीचच ओव्हर हाईप केलीय हे हल्लीच जाऊन आलेल्या एका कलीगचे मत.>>> माझेही हेच मत आहे. प्र्चंड गर्दी असते. लहान मुले, वयस्क व्यक्तींना सांभाळून घेऊन जावे लागते. जालियनवाला बाग चा लाईट अ‍ॅन्ड साऊंड शो त्याच वेळेला असतो ... वाघा बॉर्डर अंगावर सर्र्कन काटा आणणारा आहे तर आपल्या नकळ्त डोळ्यात पाणी आणणारा शो आहे ... दोन दिवस असतील तर ह्या दोन्हींचा अनुभव घेता येईल.... मेट्रो खूपच छान, सोयीची, व स्वस्त ... अमृतसरला खादाडीला प्रचंड वाव आहे.... वॉव तीन दिवसात भरपूर करता येईल व वाघा व बाग दोन्ही होतील... शुभेच्छा! वृत्तांत लिहा सविस्तर ...

अरे वा.. खुप छान माहीती मिळाली.. सर्वाना धन्यवाद.. अजुन टिप्स येऊ दया.. आता आधी फ्लाइट तिकीट तरी बुक करून टाकेन म्हणते.. बाकी ट्रिप इथल्या माहितीनुसार हळूहळू आखता येईलच. पण हे ताजमहालाचं काय मधेच नविन?? तो तर बघायचाच आहे. कुठून कन्फर्म करता येईल? मी तर ४ मार्च तारीख सुद्धा पक्की केली आहे. ते कन्फर्म झाल्याशिवाय तिकीट काढण्यात अर्थ नाही..

ओह्ह.. धन्यवाद.. चौकशी करेन आणि इथे सुद्धा लिहेनच. मगच बुकिंग करेन. Make my trip वर काल बघितलेले रेट्स आणि आजचे रेट्स यात बराच फरक आहे. कदाचित आज रविवार असल्यामुळे असेल का? परत कमी होतील ना?

मी आत्ताच फोन करुन कन्फर्म केले, ताज महाल शुक्रवार सोडून प्रत्येक दिवशी खुला आहे. प्रिंसेस, तुम्ही देखील आता प्लान करू शकता..

कदाचित आज रविवार असल्यामुळे असेल का? परत कमी होतील ना?---+++ हो, पण सतत लक्ष ठेवावे लागेल. विमान तिकिटांचे दर ना! कदाचित कॅरियर बदलेल सुद्धा. Flight + hotel combination स्वस्त पडू शकते.

वाघा बॉर्डरला गर्दी??
बहुधा आम्ही ऑफ सीजन गेलो असावो.
कार्यक्रम आटोपल्यावर पोट भरेस्तोवर फोटो सेशन केले. त्या सहा सात फूट सैनिंकांबरोबर कित्येक फोटो काढले.
तसेच त्या दिवशी एक बस भारतातून पाकीस्तानात जात होती. नेहमीच जाते का कल्पना नाही. पण तिला निरोप देतानाही मजा आली.
पण येस्स गर्दी असेल तर मात्र किचकिचाटात ही कसलीच मजा अनुभवता येणार नाही हे देखील खरे.

मला हॉटेल्स देखील सुचवा ना.. अमृतसरला फार्म स्टे चा अनुभव नाही का कुणाला? आणि दिल्लीला कुठे राहणे सोयीचे पडेल? Airportजवळ की मार्केट जवळ?

पुण्यात गिजरे यांचे महाराष्ट्र ट्रॅवल्स (नवी दिल्ली ,पहाडगंजजवळ)बुकिंग होते. ही जाहिरात नाही .काम सोपे होईल म्हणून नाव दिलय. तिकडून एक दिवसानंतर चेंज करा.

>>>Flight + hotel combination स्वस्त पडू शकते.>>
-पण Flight cancelकेल्यास हॅाटेल cancel होते का खात्री करा.!!

अमृतसरला फार्म स्टे चा अनुभव नाही का कुणाला? आणि दिल्लीला कुठे राहणे सोयीचे पडेल? Airportजवळ की मार्केट जवळ? }}} कृपया काही सुचवा ना..

आम्ही नोव्हेंबरमध्ये गेलो होतो.

७ रात्री आणि ८ दिवस.. मुंबई ते दिल्ली विमानाने..MakeMyTrip वरून लोकल टूर ऑपरेटरकडून ५ रात्री/ ६ दिवसाचा टूर प्लन करुन घेतला होता.. दिल्ली, मथुरा, आग्रा (१ रात्र), फतेहपूर/ शिक्री,जयपूर (२ रात्र), दिल्ली (२ रात्र) ..नंतर सध्याकाळी दिल्ली-अमॄतसर शताब्दी पकडली..२ रात्री राहून पहाटे अमॄतसर दिल्ली शताब्दी पकडली आणि नंतर विमानाने दिल्ली ते मुंबई घरी..

दोन आणे -
१. ताजमहाल पहाटे पहा. गर्दी कमी असते. जर होशी असाल तर पोर्णिमाला रात्रीची तिकिटे काढा ५०, ५० फक्त २५० लोकांना सोड्तात.
२. यूपी आणि राजस्थान मध्ये अधिकृत गाईड असतात. यूपीत ७०० रु आणी राजस्थान मध्ये ६०० रु घेतात आणि वरुन टिप द्यावी लागते अधिकृत गाईडला तिकिट नसते त्यामूळे अधिकृत गाईड ओळखता येईल. जर मध्यस्थीकडून गाईड घेतला तर तो स्वतचे कमीशन काढ्तो.
३. Tripadvisor वरुन अभिप्राय पाहून हॉटेल आणि रेस्टारंटमध्ये गेलो होतो.
४. शताब्दी मध्ये नाश्ता दिला तर खा जेव्न घेऊ नका. आम्ही आजारी पडलो होतो जाताना

<<<< Make my trip वर काल बघितलेले रेट्स आणि आजचे रेट्स यात बराच फरक आहे. कदाचित आज रविवार असल्यामुळे असेल का? परत कमी होतील ना? >>>>

एकदा रेट बघितल्यावर पुढच्या वेळी रेट बघण्यापुर्वी ब्राऊझर मधील कुकीज वगैरे सर्व डिलीट करावेत.... बहुतेक वेळी रेट नाॅर्मल होतात.
कुकीज तशाच राहिल्या तर वाढीव रेट दिसणे हे त्यांचे गिमिक आहे..

दिल्लीवर,आग्रा ताजवर इतक्या डॅाक्युमंट्री टिव्हिचानेललवर झाल्यात की गाइड हा प्रकार भंपकपणा वाटतो. टुअर प्लानरकडून जात नसाल तर मार्केट,शहरात राहाणेच योग्य.

एकदा रेट बघितल्यावर पुढच्या वेळी रेट बघण्यापुर्वी ब्राऊझर मधील कुकीज वगैरे सर्व डिलीट करावेत.... बहुतेक वेळी रेट नाॅर्मल होतात.
कुकीज तशाच राहिल्या तर वाढीव रेट दिसणे हे त्यांचे गिमिक आहे..--- ओह्ह, हे माहित नव्हते. आता झालेत तिकीट बुक कयून, पण पुढील वेळी लक्षात ठेवेन.

दिल्लीहून आग्र्याला जाण्यासाठी कसे जावे? आम्हाला रात्री/संध्याकाळी पोहचायचे आहे. टॅक्सी, ट्रेन की बस?? काय सोयीचे आहे? शिवाय दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परत देखील यायचे आहे.

दिल्लीहून आग्र्याला जाण्यासाठी कसे जावे? आम्हाला रात्री/संध्याकाळी पोहचायचे आहे. टॅक्सी, ट्रेन की बस?? काय सोयीचे आहे? शिवाय दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परत देखील यायचे आहे>> मी वर लिहिले आहे ना... दिल्ली-अमॄतसर शताब्दी आणी अमॄतसर दिल्ली शताब्दी रेल्वेज सगळ्यात चांगल्या - ५ ते ६ तासात जाते पण एसी चेअर्स आहेत.

आग्र्याला संध्याकाळी शताब्दी नाही. इंटरसिटी एक्सप्रेस आहे पण साडेचार तास लागतात, बाकी लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत जबलपुर सुपर फास्ट अडीच तासात पोचते, तीचे टाइमिंग सोयीस्कर आहे.
परतायला शताब्दी आहे रात्री नउला, साडे अकराला दिल्ली.
आणि रोडपण मस्त आहे, एक्सप्रेस वे, टॅक्सीनेही जाऊ शकता.

वाघा बॉर्डरला DSLR कॅमेरा allowed आहे का? बॅग नेता येत नाही असे वाचले.

अजुन एक, तिथल्या सैनिकांसाठी काहीतरी प्रेमाची भेट, खाऊ न्यायची इच्छा आहे. परवानगी मिळेल का? काय आणि किती quantity न्यावी? मुंबईहून काहीतरी न्यायचे होते, पण तिथे आम्ही शेवटी शेवटी जाणार आहोत. दिल्ली किंवा आग्र्याहून काही घेणे जमण्यासारखे आहे.