बेफिक्रे

Submitted by श्री on 9 December, 2016 - 09:54

आता काय परिक्षण लिहू , आयुष्यातला पहिला फर्स्ट डे फर्स्ट शो पाहीलेला पिक्चर . काय नाही ह्या सिनेमात ..... किस आहे आणि किस आहे आणि प्यारीस आहे आणि किस आहे . स्टोरी तीच जुनी आहे , किस व्यतिरिक्त फारसं नावीन्य नाही , रणवीर आणि वाणी सुसह्य आहेत . रणवीर , वाणीचा डान्स आवडला .
किती किस आहे कोणी मोजुन सांगेल का ? Lol
ज्या कोणी मायबोलीकरणी रणवीरच्या प्रेमात पडल्या असतील त्यांच्यासाठी एक- दोन खास सीन आहेत Wink Lol
एकदा बघण्यासारखा आहे , पैसे अगदीच वाया जाणार नाहीत .

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रोमो बघितला आणि अजिबात आवडणार नाही असं लक्षात आलं . ती वाणी तर अगदीच पुरुषी आणि थोराड आहे. तिच्यात बाईचं सौंदर्य असं जवळपास नाहीच. भयाण आहे दिसायला. नुसते ते खत्रूड किस बघायला कोण जाणार Happy

धन्यवाद आजची तिकिटे काढली आहेत. Happy बघूयात कसा आहे? वाणी कपूर खरंच पुरूषी वाटते त्या नशेसी गाण्यात हॉट पँट घालून अगदीच काहीतरी दिसतेय आणि नाचतेय!

चान्गल रुपड कसल्याशा सर्जर्‍या करुन का बिघडवतात या हीरॉइनी? मला ट्रेलरच फारसा आवडला नाहिये त्यामुळे मुव्ही आवडण अजुन कठिण आहे.

मलापण एकुण मामलाच चिकटाचिकटीचाच वाटलाय ट्रेलरवरून त्यामुळे माहीत नाही बघू का नाही.

रणवीर फारसा आवडत नाही. वाणी कपूर `शु.दे.रो.'मधे फारशी आवडली नव्हती. त्यामुळे टीव्हीवर दाखवतील तेव्हा बघणार.
पण टीव्हीवर किसं कापली जातील काय? Proud

मी रणवीर च्या प्रेमात आही बाजीराव पासुन. पण हा मुव्ही बघण्याच्या कॅटेगरीतला नाही हे ट्रेलर वरुनच कळलं. त्यामुळे बघणार नाही. अगदी टीव्हीवर आला तरी.

किसचं कापले तर १० मिनटांचा पिक्चर उरेल Proud
लोकेशनस् मात्र भारी दाखवलेत .
वाणी फाटक्या प्यांटशिवाय इतर कपड्यात छान दिसते .
फ्रेंच उच्चार मात्र हॉरीबल आहेत .

पिक्चर टीपी आहे. रणवीरची एक्स्प्रेशन्स कमाल! आवडला तो या पिक्चरमधे. वाणी कपूर ऐवजी दुसरी कोणी सापडली नाही का असं विचारावंसं वाटतं Happy

श्री, तू मेन्शन केलेले १-२ सीन्स काय इतके ग्रेट नाही वाटले Proud पण आता बॉलिवूड मधे हे सगळं चालतं हे पाहून सुडोमि झालं Lol

फेसबुकवर एकाने वाणीच्या नव्या लुकला पाहून केस वाढवलेला प्रतीक बब्बर असं म्हटलं ते आठवलं Lol Proud
खरंच तिने अवतार नी पांडुरंग करून घेतलंय. शुदेरो मध्ये किती छान दिसत होती Sad

त्या कॉरेक्टरला वाणी कपुर योग्य वाटली , लिसा हायडेन पण चालली असती .
ते १-२ सीन्स बॉलीवुड साठी धाडसी वाटले .
ऋन्म्या तुला शिकण्यासाठी बरचं काही आहे त्यात Wink

मी ती पोस्ट उपरोधाने लिहिलेली.
मला रणबीर मुळातच आवडत नाही.
ट्रेलरमध्ये जो वाह्यातपणा पाहिला आणि त्याला "बेफिक्रे" म्हटले गेले ते पाहून हसावे की रडावे हे समजले नाही.

ऊडे दिल बेफिक्रे गाण्याचे बीटस मला एक गाणे म्हणून ऐकायला आवडले.

वाणी कपूर दुसरे कोयना मित्रा झालीय किंवा अनुष्का शर्मा.

इतके डकी लिप्स ... यक्कस!

बाकी सर्व फालतु मूवीत..... नका बघू हा फुकटचा सल्ला तुमचे पैसे वाचवायला.

रणावीर बर्‍याच वेळा मूवीत आणि मूवीबाहेर पांचटपणा करतो तोच आहे इथे.
तो अभिनय करू शकतो चांगला पण आचरटपणात वाया जातो.

सुनिधी Lol , सिनेमाची स्टोरीच किसभोवती गुंडाळली आहे . त्यामुळे लिहिण्यासारखं फारसं काही नव्हतचं , मीठमसाला लावता आला असता पण रणवीर च्या बेफिक्रेपणावर वेगळं अजुन काय लिहीणार ? Lol

श्री एक सांगायच राहिलं, इतके मोठे परिक्षण अख्ख्या आयुष्यात वाचले नाही. फिदीफिदी + १
श्री, शिकण्यासारखं आहे, रुन्म्याक्डून ! नुस्त ट्रेलर पाहून त्यावरच परीक्षण ...... आणि तुम्ही अख्खा शिणुमा पाहून...... तुमच्यासाठी गृहपाठ..... 'रईस' वाचा अन परत एकदा परीक्षण लिहा... Happy Happy

श्री, शिकण्यासारखं आहे, रुन्म्याक्डून ! नुस्त ट्रेलर पाहून त्यावरच परीक्षण ...... आणि तुम्ही अख्खा शिणुमा पाहून...... तुमच्यासाठी गृहपाठ.... >>> अहो मायबोलीकर एका ऋन्म्याला सहन करताहेत हे काय कमी आहे का Lol

{{{ रणावीर बर्‍याच वेळा मूवीत आणि मूवीबाहेर पांचटपणा करतो तोच आहे इथे.
तो अभिनय करू शकतो चांगला पण आचरटपणात वाया जातो. }}}

तो बॉलीवुडचा ॠ आहे का?

ऋन्म्या तुला शिकण्यासाठी बरचं काही आहे त्यात >>>>> ऋन्म्या: ग. फे. (तुझ्या स्वतःच्याच) ला घेऊन जा मुवी बघायला. बरंच काही शिकशिल .............. Happy

*स्पॉयलर्स*

सिनेमाची स्टोरीच किसभोवती गुंडाळली आहे >> श्री, हे मात्र बरोबर वाटले नाही. उलट सिनेमाचा सेकंड हाफ की ज्यात त्या दोघांची फक्त फ्रेंडशीप असते आणि इतर प्रियकर असतात तो भागच जास्ती चांगला झालेला आहे. आणि जुन्या काळसारखं आता होत नाही. त्या उलट तो दुसरी प्रेयसी शोधतो. पण मग जास्ती मेलोड्रामा न करता आपली झालेली चुक त्याच्या लक्षात येते आणि ती तो सुधारतो. हे अगदीच काळाशी सुसंगत वाटल्याने बेफिक्रे चा शेवट आणि एकूणच दुसरा हाफ नक्कीच चांगला वाटतो.

सुरवातीचा भाग मात्र तू म्हणतोस तसा थोडाफार किस भोवती आहे Lol

बरंच काही शिकशिल .............. स्मित >> होय, लैंगिक असमाधानाबद्दल ऋन्म्याची तक्रार आहेच, ती दूर करायचे मार्ग सापडतील. Wink

बरोबर आहे , म्हणूनच एकदा बघण्यासारखा आहे म्हटलं रे ,
बाकी सिनेमा kiss carefree , love carefree , live carefree आहे .

Pages