अरेंज्ड मॅरेज ! हे स्त्रीचे वस्तुकरण नाहि काय!!!!

Submitted by सिंथेटिक जिनियस on 9 December, 2016 - 06:31

अरेंज मॅरेज हा आपल्याकडील एक व्यवस्थीत स्थापीत झालेला प्रकार आहे.इतका की लग्नाचा जोडीदार शोधायचा हाच सर्वोत्तम प्रकार आहे हे आपल्या मानसिकतेत घट्ट रुजले आहे.मी नुकताच जेव्हा वयात येत होतो तेव्हा मला हे अरेंज मॅरेज प्रकरण फार रोमॅण्टीक वाटायचे.मुलगा मुलगी एकमेकांना बघतात,एकमेकांशी बोलतात ,एकमेकांना समजुन घेतात हे भारी वाटायचे .
पण हा भ्रमाचा भोपळा फुटला ,जेव्हा मी माझ्या मावसभावाच्यावेळी " बैठकीला " गेलो होतो.बैठक होती संगमेश्वरला.आम्ही मुलीच्या घरी गेलो होतो.इकडतिकडच्या गप्पाटप्पा झाल्यावर उपवर मुलगी पोहे आणि चहा घेऊन आली.ती आल्यावर् आमच्या बाजूचे सगळे बायाबाप्ये तिच्याकडे बघायला लागले.तिची नजर खाली झुकली.मावसभावाचे वडील तिला बस म्हणाले,तेही तिला ऐकायला गेले नाही इतकी ती कावरीबावरी झाली होती.आमच्या बरोबर जे पुरुष मंडळी होती ते तिला अगदी नखशिकांत स्कॅन केल्यासारखी बघत होती.मावसभाऊ तर हे ' मटेरीयल' आपल्याला सुट होईल का या नजरेतून बघत होता.तिने नंतर चेहरा वर करुन नुसतेच हसल्यासारखे केले.काय न्हवतं तिच्या नजरेत? आपण बाजारात ठेवलेली वस्तु आहोत इथपासुन ते आपले झालेले / होत असलेले "वस्तुकरण या सर्व भावना तिच्या डोळ्यात दिसत होत्या.मलाच ते बघुन कसे तरी वाटायला लागले.काहीतरी निमित्त करुन मी बाहेर गेलो.
पण विचारात पडलो . ही कसली पद्धत लग्न ठरवायची? अरेंज मॅरेज या प्रकारात लगेच लग्न ठरत नाही.असे अनेक " दाखवायचे "कार्यक्रम उपवर मुलिंना पार पाडायला लागतात.काय वाटत असेल त्यांच्या मनाला? कुणीतरी तरी अनोळखी लोक बघायला येणार आहेत,त्यांच्यासाठि नैसर्गीक लाज,विनय,सत्व बाजुला ठेऊन त्यांच्यासमोर परफेक्ट वाईफ मटेरीयल आहोत हे दाखवण्यासाठी आटापीटा करायचा.की स्त्री जन्मा तुझी ही कहाणी ' म्हणत गप्प वडीलधार्यांच्या ईशार्यावर स्वतःचे वस्तुकरण करुन घ्यायचे?
हे कुठे तरी थांबायला पाहीजे असे वाटते.यात प्रमुख अडसर जातीव्यवस्थेचा आहे हे मान्य.तरुण तरुणींनी ही असली रानटी पद्धत फाट्यावर मारुन सर्रास लव मॅरेज करावे.ज्यांच्यात गट्स नाहीत व जातीतच लग्न करायचे आहे अश्यांनी फक्त एक्सक्लुजीव तरुण तरुणीचे मेळावे भरवावेत ,तिथे कटाक्षाने म्हातारी खोंड असु नयेत.अश्या मेळाव्यांद्वारे मैत्री व्हावी ,पुढे आपआपल्या पसंतीच्या मुला मुलीशी आपणच जमवावे व मग लग्न करावे.हे मला जास्त संयुक्तीक वाटते.
आपल्याला काय वाटते??

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आला का नवीन धागा. छान.

बाकी त्या मुलीला नजर झुकवायची, मान खाली घालायची काय गरज होती? तिनेही समोर असलेलं मटेरीयल आपल्या अपेक्षांशी जुळतंय का ते बघुन घ्यायचं ना. आणि त्या मटेरीयल सोबत बाय डीफॉल्ट असणारे प्रॉडक्ट ही सुटेबल होणारे दिसताहेत का ते स्कॅन करायचं. हाकानाका.

बायका पुरुषाना पहात नसतात का ?

पगार , नोकरी , रहाते घर , भावंडे , आइबाप , त्याण्चे पगार पेन्शन .... सगळे बघून मगच कांदेफोये खायला घालतात.

तुम्ही बघायला जाता , हा भ्रम काढुन टाका ..... त्याच तुम्हाला बघतात.

इतकं वैट असतं तर स्त्रीयानी स्त्रीसत्ताक पद्धत नसती का आणली ? बिनपगारी साधे पुरुष आपल्या घरी नेवून स्वतः नोकर्‍या करुन नसते का संसार चालवले ?

बिनधास्त बघा.

सिंथेटिक सर,अगदी योग्य मुद्दा मांडलात..
आणि अजून एक दुसरा मुद्दा म्हणजे स्त्रीला तिची अशी काही चॉईसच नसते,म्हणजे जेव्हा तिला पाहायला येतात तेव्हा जर मुलाला मुलगी पसंत असेल तर मुलीला तीच मत विचारत पण नाही ,आणि ती जेव्हा तीच मत सांगते कि मला मुलगा पसंत नाही तेव्हा लोक अगदी कहरच करतात त्यात तिचे आई वडील यापासून सगळेच नातेवाईक तिच्या विरोधात ,मुलामध्ये काय कमी आहे,चांगली नोकरीये ,स्वतःच घर आहे अजून काय पाहिजे नाहीतर मग सरळ तिच्या character वर संशय घेतला जातो तू नको म्हणतीयेस म्हणजे नक्की तुझं बाहेर काहीतरी चालू आहे.पण याउलट जर तोच मुलगा मुलीला नापसंत करतो तेव्हा मात्र सगळे त्याच्याबाजूने असतात.
हे सगळं खरंच बदललं पाहिजे...तिच्याही काही इच्छा असतात,स्वप्न असतात ह्या सर्वांचा विचार का नाही करत??

कावेरि योग्य प्रतिसाद दिलात.
सिंथेटिक सर>>>> सर नको,सिंजी म्हणालात तरी चालेल.

ओके सिंजी सर,
आणि अजून एक सिंजी म्हणजे हवं तर माझं मत समजा पण तुम्ही जर पाहिलं तर हे लव्ह मॅरेज पेक्षा अरेंज्ड मॅरेज जास्त सक्सेस झालेले दिसून येतील ,माझा ना लव्ह मॅरेज ला विरोध आहे ना अरेंज्ड मॅरेज ला लग्न कसंही होओ पण ते दोघांच्या संमतीने झालं पाहिजे.तस मलाही लव्ह मॅरेज च आवडत ,जिथे ना जातीला प्रायोरिटी असते ना धर्माला तिथे फक्त प्रेम असते .आणि हो तुमच्या
ह्या पॉइंटला <<,फक्त एक्सक्लुजीव तरुण तरुणीचे मेळावे भरवावेत ,तिथे कटाक्षाने म्हातारी खोंड असु नयेत. >>>>>>>>>>>>+१११११...................

पगारेंचा अ‍ॅब्सेन्स जाणवत होता तो थोडा कमी झाला. मूळ विषयाशी सहमत आहे. आता दिवस खूपच बदललेले आहेत. पण ग्रामीण वगैरे भागात अजूनही रीतीरिवाज पाळले जातात. मुलींना आणि त्यांच्या आयांनाही हेही समजत नसते की त्यांच्याकडे (मुलीकडे) वस्तूप्रमाणे पाहिले जात आहे. एक लग्न हा विषयच इतका मोठा आहे की मुलाच्या आईचे पाय धुणे वगैरे आणि इतर अनेक रुढी विचित्र आहेत, शहरी भागात ह्या सगळ्यांचे प्रमाण कमी होत आहे.

'उखाणा घेणे' हा भीषण प्रकार अजूनही काही प्रमाणात चालतो. एरवी नवर्‍याचा उल्लेख अरेतुरेने करणार्‍या मुली अचानकच लाजून वगैरे 'राव' वगैरे लावून नांव घेतात. पण ह्याच्याही मुळाशी 'त्या मुलीने लाजलेच पाहिजे' असे काहीतरी आहे ते विचित्रच आहे.

अगदी खरं आहे. हा मुलगी बघण्याचा कार्यक्रम वस्तुकरणच आहे. एक नाही आवडली तर दुसरी आणि दुसरी नही तर तिसरी. माझी एक चुलत आतेबहीणी, तिला मुलगा नाही आवडला म्हणजे त्याच वय जास्त आहे असं म्हणत होती, तर तिची आजी म्हणाली मुलांना नावं ठेवत नसतात वगैरे. शेवटी तिच्या इच्छेविरुद्ध त्या मुलाशी लग्न झालं.

आता माझाच अनुभव सांगते. माझ्यासाठी स्थळ शोधतात आई बाबा, सुरुवातीला फार चिडचिड व्हायची माझी मी काही भाजीपाला नाही वगैरे. पण माझे बाबा म्हणाले तू त्रास करून घेऊ नकोस आम्ही तुझं मत विचारूनच निर्णय घेऊ. पण सगळ्याच मुलींना हा हक्क दिला जात नाही. थोडक्यात आजही मुलींना विचारस्वातंत्र्य नाही, तेही आयुष्याचा एवढा मोठा निर्णय घेताना.

माझे असे स्पष्ट मत आहे की निदान १ वर्ष डेटींग करून, नि अगदी सेक्स बद्दलच्या सुद्धा आपल्या कल्पना स्पष्ट बोलून मगच लग्न करावे.लग्नाच्या वेळी दोघेहि किमान २३ वर्षाचे असायला पाहिजेत. डेटिंग करताना नुसता रोमान्स न करता अधून मधून पैसे, इतर आवडी निवडी, अपेक्षा यांच्या संबंधीहि बोलणी व्हावीत. २५ वर्षाच्या आत लग्न उरकून घ्यावे, नंतर घाई घाईत भलतेच काही होऊन बसते.

तुमचे मात्र एक बरे आहे बुवा!
पुरूषांचा विनयभंग करणाऱ्या मुली आणि वस्तुकरण होणाऱ्या मुली सगळं काही तुम्हाला बघायला मिळाले.

च्यायला बायकोला विचारतो आता आपल्या अरेंज्ड मॅरेज मध्ये तुझे ( बायकोचे) वस्तुकरण झाले कि काय?
उत्तर नाही आलं तर ठीक पण होय आलं तर काय करावे बा ???? Light 1

तुमचे मात्र एक बरे आहे बुवा! पुरूषांचा विनयभंग करणाऱ्या मुली आणि वस्तुकरण होणाऱ्या मुली सगळं काही तुम्हाला बघायला मिळाले.

बघायला सगळ्यांनाच बरेच काही काही मिळते, त्यावर धागा काढायची कला(?!), धाडस, इच्छा फक्त काही जणांकडेच असते. बाकीचे नुसतेच भलेबुरे प्रतिसाद द्यायला येतात.

पूर्वीचा कांदे पोह्याचा प्रकार अजूनही गावात चालूच आहे का ?
दोघेही भेटायला बाहेरच का नाही जात ? अजूनही हि जुनी पद्धत ?
कठीण आहे Happy

| 12 December, 2016 - 08:31 नवीन
पूर्वीचा कांदे पोह्याचा प्रकार अजूनही गावात चालूच आहे
का ?>>>> गावात कशाला ,शहरातही चालू आहे कार्यक्रम.