कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची नोंद सध्या तात्पुरती बंद राहील

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

मायबोलीवरच्या अनेक ग्रूप मधे "नवीन कार्यक्रम" या प्रकाराखाली आगामी कार्यक्रमांची माहिती देता येते. हा लेखन प्रकार अनेकदा मायबोलीकरांचे GTG करण्यासाठीही वापरला जातो.

याच प्रकारात गेले काही वर्षे आपण सभासदांना "कार्यक्रमाला आपण उपस्थित राहणार आहोत याची नोंद (signup) " करण्याची सुविधा देत होतो. तांत्रिक कारणामुळे सध्या ही सुविधा बंद केली आहे. ही सुविधा देणार्‍या सॉफ्टवेअर मधे काही मोठ्या अडचणी आहेत. त्यामुळे ते दुरुस्त न करता अशीच सुविधा देणार्‍या काही इतर पर्यायांवर शोध सुरु आहे.

काही तासांपूर्वी मायबोलीच्या सॉफ्टवेअरची थोडी डागडूजी करण्यात आली त्यात या सुविधेशी निगडीत अडचणी लक्षात आल्या.

कार्यक्रमाची माहीती देणार्‍या लेखनप्रकारात काहीच अडचण नाही त्यामुळे तो पूर्वीसारखाच वापरता येईल. फक्त "येण्याची नोंद (signup)" ही सोय बंद केली आहे.

प्रकार: 
शब्दखुणा: 

>म्हणजे गटगकरता नावनोंदणी करण्याची सोय आहे तेच
होय. म्हणजे गटगकरता नावनोंदणी करण्याची सोय होती तेच