आजोबा आणि ती - हडळ

Submitted by वेडा कल्पेश on 3 December, 2016 - 00:40

आज मी तुम्हाला माझ्या आजोबांबरोबर घडलेल्या एका विचित्र घटनेबद्दल सांगू इच्छितो ..
गोष्ट ४० वर्षापूर्वी ची आहे. माझे आजोबा तेव्हा Under Construction Building contractor होते .त्यामुळे Builder ने त्यांच्या राहण्याची सोय तिथेच Ground Floor च्या एका रूम मध्ये केली होती. घरात आजोबा, आजी, माझी आई आणि ४ मामा असा ७ जणांच कुटुंब राहत होत . त्यांच्या रूमच्या बाजूला अजून एक कुटुंब राहत होत. ते सुद्धा तिथेच काम करणारे होते. नवरा बायको आणि ३ मुली अस त्याचं कुटुंब होत. दिवस थंडीचे होते. तर झाल अस कि शेजारच्या ३ मुली शेकोटी करत बसल्या होत्या. लहान असल्यामुळे जे काही हातात भेटेल ते आणून मुली त्या शेकोटीत टाकत होत्या. अचानक त्यातील सर्वात मोठ्या मुलीला लाईट चा बल्ब दिसला तो तिने काहीही विचार न करता त्या आगीत टाकला. बल्ब गरम झाल्याने तो फुटला आणि त्याच्या काचेचे तुकडे उडाले त्यातील एक तुकडा बाजूलाच बसलेल्या लहान बहिणीच्या डोळ्यात गेला आणि रक्त वाहू लागले हे पाहून बाजूलाच काम करत असलेले माझे आजोबा आणि त्या मुलीची आई धावत आली . रक्त फार वाहत होते. आजोबा लगेच त्या मुलीला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले . सोबत मुलीचे आई बाबा सुद्धा होते तिला हॉस्पिटल मध्ये भरती करून आजोबा परत घरी आले आणि कामाला लागले. आणि त्या मुलीचे आई वडील तिथेच राहिले .

संध्याकाळी जेव्हा आजोबा घरी आले तेव्हा त्यांनी पहिले कि शेजारी अजून हॉस्पिटल मधून आले नाही आहेत . ते आपल्या रूम मध्ये आले आणि आजी ला काय झाल ते सांगत होते . चर्चा झाल्या नंतर रात्रीचे जेवण आटोपून सगळे झोपून गेले होते. पण आजोबाना मात्र झोप येत नव्हती. अचानक बाहेर कोणाच्या तरी बांगड्याचा आवाज त्यांना येवू लागला. त्यांनी विचार केला कि बाजूचे आले असतील म्हणून त्यांनी आवाज दिला. ताई आलात का हॉस्पिटल मधून बूट बाहेरून काहीच उत्तर आले नाही . तेव्हा त्यांनी अजून एकदा आवाज दिला कि ताई मुलगी कशी आहे .तेव्हा त्यांना बाईच्या रडण्याचा आवाज आला तेव्हा त्यांना वाटले कि मुलीच काही बर वाईट तर झाल नाही म्हणून ते धावत दरवाजाकडे गेले आणि दार उघडल पण बाहेर कोणीच नव्हत. त्यांना वाटल त्यांना भास झाला असेल म्हणून त्यांनी दरवाजा लावला आणि परत येवून बिछान्यावर पडले . काही वेळ विचारात गेला असेल इतक्यात पुन्हा बाहेरून कोणी तरी पाणी ओतत असण्याचा आणि बांगड्यांचा आवाज झाला . यावेळी आजोबांनी आवाज दिला नाही ते हळूच उठले आणि दरवाजा जवळ गेले तर त्यांना कोणी तरी चालत पुढे जातंय याचा आवाज आला त्यांनी हळूच दरवाजाची कडी उघडली. आणि पाहून थक्क झाले बाजू वाली बाई हातात पाण्याने भरलेला एक डब्बा जो आपण शौचास वापरतो घेऊन समोरच असलेल्या खाडी जवळ च्या जंगलात जात होती . आजोबांनी विचार केला एवढ्या रात्री हि बाई एकटीच शौचास जंगलात का जातेय म्हणून ते तिला आवाज देणार तेव्हड्यात मागून आजी आली आणि त्यांना विचारले कि एवढ्या रात्री तुम्ही इथे एकटेच काय करताय . ते म्हणाले अग ती बघ बाजूवाली एकटी कुठे चालली आहे जंगलात आजीने समोर नजर टाकली पण तिला काहीच दिसले नाही आजी म्हणाली तिथे तर कोणीच नाही आहे. तेव्हा आजोबा म्हणाले तू वेडी आहेस का हि काय मला इथे समोरच जाताना दिसतेय ती थांब आवाज देतो. तेव्हा आजीने सांगितले कोणीच नाही आहे तिथे तुम्ही आधी घरात चला आणि ती आजोबाना खेचत घरी घेऊन आली .

ती रात्र ते दोघ पण झोपले नाहीत. दुसर्या दिवशी सकाळी त्या बाईचा नवरा घरी आला तेव्हा आजोबांनी विचारलं कशी आहे मुलगी आणि ताईना ऐकतच घरी का पाठवलास रात्री तेव्हा तो म्हणाला मुलगी बरी आहे आणि हि तर रात्रभर हॉस्पिटल ला होती . तू काय भूत बित पाहिलास कि काय आणि तो हसायला लागला पण आजोबा मात्र विचारात पडले कि मग रात्री नक्की मी पाहिलं ते काय होत .विचार करत करत आजोबा आपल्या कामावर निघून गेले . दुपारचे १२ वाजले असतील आजोबा घरी परत येत होते २ मिनटांच्या अंतरावर घर आले होते. अचानक त्यांना आजी भेटली त्यांनी तिला विह्कॅराल तू कुठे निघाली . तेव्हा ती हसली आणि म्हणाली तुम्हालाच आली आहे. चला दुसर्या माळ्यावर एक बाई पडली आहे रक्त येत आहे खूप तीच आजोबांनी विचार केला बिल्डिंग तर Under Construction आहे मग तिथे कोण कस गेल.आणि पडल .......

आणि असा काही झाल असेल तर मालक आपल्यालाच ओरडेल कि तुम्ही नीट लक्ष देत नाही म्हणून . आजोबा आणि आजी धावत निघाले त्या दिशेने. building जवळ आली तशी आजी आजोबाना बघून हसू लागली आणि त्यांच्या पेक्षा वेगाने धावू लागली आजोबा हे पाहून चाट झाले पण त्यांना पटापट वर जावून झालेला प्रकार बघायचा होता. ते आजीच्या मागे धावत गेले. 1st floor चढला. तशी आजी बोलली लवकर या आणि पहा आजी त्यांच्या पुढे होती ते 2nd floor वर आले. पाहिलं तर तिथे काहीच नव्हत त्यांनी आजूबाजूला पाहिलं सगळ सामसूम होत आणि त्यांच्या लक्षात आल कि आजी सुधा दिसत नाही आहे. तेव्हा ते तिला आवाज देणार इतक्यात खालच्या फ़्लॊर वरून आजी धापा टाकत वर आली आणि आणि बोलली तुम्ही धावत वर का आलात काही झाल आहे का इथे. तेव्हा आजोबाना कळून चुकल कि इथे काही तरी धोकादायक आहे . आणि लगेच त्यांनी आजीचा हाथ धरला आणि म्हणाले खाली चल इथून .त्याच दिवशी ते सगळे त्यांच्या मोठ्या भावाच्या घरी शिफ्ट झाले. पण ते काय होत याची विचारपूस जेव्हा त्यांनी आजूबाजूला केली तेव्हा एका काम गाराने सांगितलं कि तुमच्या आधी इथे एक कामगार आणि त्याच कुटुंब राहायचं आणि बिल्डिंग मध्ये काम करता करता इथली बाई दुसरया माळ्यावरून खाली पडली होती. ती थेट तुमच्या घराच्या दरवाजा समोर .

तेव्हा आजोबाना कळून चुकल कि ते सगळ काय चालू होत.

टिप - या अगोदर हि कथा मी माझ्या फेसबुक पेज वर अपलोड केलेली आहे - लिखाणात काही त्रुटी असल्यास समजून घेणे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कल्पेश सर,कथा किंवा तुमच्या आजोबांचा अनुभव तुम्ही छान पद्धतीने मांडला आहे....पण स्टोरी थोडी अर्धवट वाटतीये कारण तुमचे आजोबा शिफ्ट झाले ते ठीक आहे पण नंतर त्या बाईने (हडळ) दुसऱ्या कोणाला त्रास नाही दिला का?किंवा तीच काय झालं??? प्लीज सांगाल का?????

अचानक त्यांना आजी भेटली त्यांनी तिला विह्कॅराल तू कुठे निघाली . तेव्हा ती हसली आणि म्हणाली तुम्हालाच आली आहे. >>>>काही बदल हवा आहे का???