मुलीला ड्रॉइंग क्लास..

Submitted by _आनंदी_ on 1 December, 2016 - 05:13

माझी मुलगी आत्ता ४ वर्ष , ४ महिन्यांची आहे..तिला ड्रॉइंग पेंटिंगची खुप आवड आहे..
तिच्या शिक्षकांनी पण आम्हाला सांगितलं की ती छान ड्रॉ,, कलर करते.
तिला काहितरी क्लास लावयचा विचार आहे..
ठाणे ऐरोली मधे अशे काही ऑप्शन आहेत का.. प्लिज मदत करा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एवढ्या लहान मुलीला क्लासच्या रुटिनमधे अडकवू नका . ठराविक वेळेला क्लास असे झाले की लहान मुलं कंटाळतात. तिला भरपूर कागद, रंगित क्रेयॉन्स, पेन्सिल्स वगैरे साहित्य द्या. हवे तर खास लहान मुलांसाठी असलेली How to draw .. प्रकारातली पुस्तके आणा. तिला तिच्या मर्जीने चित्रं काढू दे.

खरंच खूप लहान आहे मुलगी.
मला तरी वाटतं तिला एखादी घरातली भिंत द्यावी. त्या भिंतीवर तिने काहीही रंगवावे, तिला काही बोलायचे नाही. एकदा गोडी लागली, रंग कळाले की मग क्लास लावावा..

हो हा विचार केला होताच गडबडीत लिहिलं हे ऑफिस मधुन
क्लास बिस नको म्हणुन अजुन काही सुरु केलं नव्हतं..
काय काय करता येइल हेच विचारायच होत.. तसा बदल करेन धाग्यात