तुझ्या आठवणी पुन्हा नव्याने आठवताना

Submitted by राम पाटील on 30 November, 2016 - 19:12

तशी सायंकाळ ची वेळ असेल , मन खूप थकलेलं होत. रोज रोज तोच दिनक्रम करून  कंटाळा आला होता.म्हणून कुठेतरी  फिरायला जायचा विचार आला म्हणून निघालो , बाहेर पडल्यावर कायम सोबत असणारी जोडीदारींन होतीच (बाइक)..एखादं शांत वातावरण हवं होतं जिथं माझ्या मनाला शांतता लाभेल, विचारांचा काहूर थांबेल,लांब असा दूरवर आलो ..रस्त्याच्या वळणावरून एक कच्च रस्ता होता....दूरवर पहिलं तर एक छोटंसं मंदिर दिसलं ,गाडीला तशीच किक मारली नि त्या रस्त्यानं निघालो ,पाच दहा मिनिटातच माझी स्वारी पोचली तिथं.बसण्यासाठी छानशी एका झाडाखाली जागा पहिली.
             दूरवर डोगरातून भास्कर माझ्यासारखाच कंटाळून परतीच्या मार्गाला लागलेला दिसत होता ,त्याचे तेज हळू हळू कमी होत चालेल होत. समोरच मस्त फुलांची छोटी छोटी रोपटी , आजूबाजूला पहिले तर मोठं मोठ्ठी गर्द पानांनी फुललेली झाडे होती, आणि त्याच झाडांवर असणारे वेगवेगळे पक्षी. किती मस्त वाटत होते ....हिरव्यागार झाडांच्या पानावरुन माझी नजर एका फांदीवर गेली ...दोन पक्षी एकमेकांच्या चोचीत चोच घालून आवाज काढत होते  काहीतरी नक्की चालले होते .....कदाचित ते जोडपे असावे (माणसासारखे) एकमेकविषयचे प्रेम व्यक्त करण्याची त्यांची पद्धत असावी बहुतेक ...कारण प्रेम व्यक्त करण्याची कलाच वेगळी असते ,ती आत्मसात करता आली की जीवन कसे स्वर्गासारखे होते ....जगण्याची नवी उमेद मिळते ...प्रत्येक अशक्यप्राय गोष्टी आभासी प्रतिमेसारख्या शक्य वाटतात कारण ,प्रेमासाठी करण्याची ती तयारी असते ..असेच मनात विचार चालू झाले आणि मन पुन्हा जुन्या आठवणीत गेले .... आठवणींची चित्रफीत डोळ्यासमोर सरकू लागली...
कॉलेज जीवन त्यावेळी  तरी  माझ्या नशिबात नव्हते ...एक बहिस्त विद्यार्थी म्हणून 12 वी पर्यंत जीवन जगलो....इतर मुलाप्रमाणे करावे ,कॉलेज जीवन अनुभवावा असे कितीतरी वेळा वाटले ...पण आमच्या नशिबी मात्र हे नव्हतं...बी.ऐ साठी     प्रवेश रेगुलर म्हणून घेतला खरा पण माझी  उपस्थिती फक्त परीक्षा पूर्ती ,
  एखाद्या  मेंढरांच्या कळपतुन मेंढरु चुकावं आणि वाघाच्या तोंडी पडल्यावर भीतीने गाळण वाहावी अशी अवस्था होत होती , प्रत्येक नजर जीव पिळवटून टाकायची . एखादा अपराध केला की काय असे वाटायचं ...अशीच तीन वर्षे कशीतरी काढली .....
      जीवनाला कलाटणी देणारा आणि आयुष्याच्या सुखाचा आणि दुःखाचा प्रवास करायला लावणाऱ्या घटनेचा प्रवास एम ऐ ला मिळाला.जीवनामध्ये एक सूंदर मैत्रीण आली, तहानलेल्या वाटसरूला घोटभर पाणी मिळावे आणि ते पिऊन आत्म्याला समाधान वाहावे असे वाटले . पाण्याविना कोमेजुन जाणारी वेल पाणी मिळताच हिरवीगार होऊन जावी...असेच काही वाटायला लागले ..पण हा हिरवागार आंनद काही काळापुरता मर्यादित होता हे त्यावेळी माझ्या लक्षात नाही आले .
कॉलेजमध्ये आमच्या भेटीगाठी वाढत जाऊन प्रेमाची भाषा कधी बोलू लागलो कळालेच नाही , आज ही आठवतात ती तिच्या घरातील चिमुकली दोन मुले ..जय__राज अशीच काही त्यांची नावे असावीत त्यांची आठवण कायम समोर येते कारण तिचा दादा बोलतो असे सांगून मी मनोसोक्त त्यांच्याशी बोलायचो कारण बाईसाहेबांचे घरी नेमके पाणी आलेले असायचे, कसेबसे त्यावेळची कॅडबरी आणतो म्हणून त्यांच्याकडून सुटका करून घ्यायचो. त्या दोघांना मनोसोक्त पाण्यामध्ये भिजायला पाठवून ती माझ्याशी तासन तास गप्पा मारायची ...गप्पा इतक्या रंगायच्या कि तिच्या आईचे शेताकडून येणे तिलाही कळले नसायचे ....कुणाशी बोलतेस ग...असे आईने म्हंटल्यावर काही नाही ग कॉलेजची मैत्रीण आहे , उद्या किती वाजता जायचे ते विचारत होते . तिचे ते त्यावेळचे खोटे बोलणे मी सहजच मनावर नाही घेतलं.
        मला आठवते ती पहिली भेट ,महाराष्ट्र शासनाच्या  डेपोच्या बाजूला असणाऱ्या हॉटेलात...क्रांती टी...गाड्यांचा कर्णकर्कश आवाज ..रहदारीचा रस्ता.... फेरीवाले ...असे बरेच काही होते ..मैत्रिणीच्या गराड्यातून कशी बशी सुटका करून ती तिथं आली....मनात आनंदाच्या उकळ्या होत्याच पण कपाळाला दरदरून घाम हि फुटला होता .पँटच्या खिशातून गाडीची चावी सावरत कसाबसा रुमाल काढून कपाळाचा घाम पुसला ....गडबडीत ती पटकन माझ्या टेबलाच्या बाकावर बसली.हृदयात 72 ऐवजी डबल ठोके वाजायला लागले ..असे वाटायला लागले की हृदय स्पदनाने फुटते कि काय...क्षणभर कोणीच एकमेकांकडे पाहत न्हवते.... शेवटी मीच हळू हळू डोके काढायला सुरवात केली .....एकदम गोल चेहरा.. अगदी साधी केसांची  विचरणी.. गोल डोळे ....थोडासा सावळा रंग...गळ्यात दृष्ट् लागू नये म्हणून काळा गोप...कानात मध्यम आकाराच्या रिंग...आणि सगळ्यात प्रत्येक फोनच्या शेवटी फ्लाईंग कीस देणारे गुलाबी ओठ.......मला अजूनही आठवते वडापाव खाताना चुकून तिच्या पायाला झालेला रोमांच आणणारा स्पर्श ....सगळे कसे नकळतच घडले.
        तिच्या घरी जाणे ,फोनवर बोलणे ,त्या चिमुकल्याशी बोलणे या साऱ्या गोष्टी तेव्हा मला  तिच्याकडे आकर्षित करू लागल्या...एक दिवस जे लग्नाआधी  घडू नये ते घडले...असाच तिच्या घरी गेलो...जुन्या खाटेवर तिची आजी बसली होती ...हळूच आजीला विचारले कशी आहेस आजी...बरी आहे ...पण कोण र तू .. वळखल नाय बा लेकरा...थोडेसे मिस्कील हास्य करून मनातल्या मनात म्हंटले..कदाचित होणार जावई....आजीची विचारपूस करून पुन्हा आतल्या खोलीत शिरलो...पहिलाच प्रश्न...बाप कुठे आहे...थोड्याशा रागाने पण हसऱ्या चेहऱ्याने..ये बाप काय म्हणतोस...सरळ बोलता येत नाही का...मग काय सासारेबुवा कुठे आहेत म्हणू का?...ती गालातल्या गालात हसत निरुत्तर...मग सासूबाई त्या कुठे आहेत ...दोघेपण शेताला गेलेत,..आणि पालिकडलीची चिल्लर ...ये गप बाहेर असतील खेळत.... काय घेणार चहा कि पोहे करू...नको शिळी भाकरी असेल तर दे तु मला म्यासेज पाठवलेल्या  रेसिपीप्रमाणे..थोडेसे हसून नको बाई चहाच दे...शेगडीवर चहाचे भांडे ठेवले...थोडेसे पाणी टाकले...मी पुन्हा तिला म्हंटले चहा पेक्षा फक्त दूधच दिले तर बरे होईल,पुन्हा आहे त्या पाण्यात थोडं दूध ओतले,साखर टाकली आणि मंद जाळावर बटन ठेवलं..थोडस पाणी दे म्हणून वर उठलो...ये जागेवरच बस..घरात कोणी नाही..आणि जवळ तर येऊच नको....हा तिचा जवळ बोलण्याचा इशारा होतो कि आणखी काय ..कारण घरी कोणीच नाही हे मला पण माहित होत..पाणी पिऊन पुन्हा ग्लास  ठेवायला उठलो ,पुन्हा तेच वाक्य घरात कोणी नाही आहे ,,,जवळ यायचा प्रयत्न करू नकोस ...आता एका पुरुषाला इतके बोलल्यावर कोणी गप्प बसेल ...
        किचनच्या कठड्याला पाठ टेकून  मला हे सगळे बोलत होती,जागेवरून ताडकन उठलो ..सरळ किचनच्या दिशेने गेलो ....ये गप घरी कोणी नाही हा...आता मात्र तिचा सूर भीतीत बदलायला लागला ...इतके चिथावणी बोलावले तर गप कोणता पुरुष बसेल..तिच्या दोन्ही बाजूने किचनच्या कठड्यावर हात ठेवला...नि म्हंटले बोल आता घरी कोण नाही .. तिने थोडं मग सरकण्याचा अंग चोरण्याचा प्रयत्न केला पण तो असफल झाला....अगदी समोर समोर तोंड आले ..तिच्या नाकातून स्वचोश्वास वाढला आहे याची जाणीव होऊ लागली...मी पुन्हा जास्तच तिच्या तोंडाजवळ  गेलो अगदी  जवळ, तिला तोंडसुद्धा हलवता येणार नाही इतकं जवळ...तिच्या छातीची धडधड आता मला सहज जाणवत होती ....मनात ठरवले आता वेळ वाया नाही घालवायचा ..कठद्यावरचे हात तिच्या कमरेला गेले..पुन्हा जवळ खेचले..आणि तिच्या गुलाबी ओठांवर माझे ओठ टेकले..तिचे ओठ थरथरले... अंगातून वीज जावी तसे वाटले  आणि दीर्ग चुबंन घेतले .. स्वर्गाहून अधिक सुख त्यावेळी मिळाले,,,,तिने स्वतःहून मला कधी मिठी मारली कळालेच नाही ..माझ्या मिठीत इतकी गुंग झाली की करपलेल्या दुधाच्या वासाने तिला जग आली..त्या दिवशी तिने मला वेगळाच चहा दिला ...तो चहा मी कधीच विसरणार नाही ...
           बघता बघता वर्ष कशी सरली काही कळालेच नाही... या कालावधीत आम्ही बऱ्याच वेळा भेटलो ,तिच्या एका खास मित्राला हि माझी दुरून ओळख करून दिली...आहे का रे छान अशी मित्राला विचारणा केली  त्याचे नाव काहीसं अस्पष्ट आठवत ध ध धा..... धनाच असे काही तरी होत....आमच्या प्रेमाची कल्पना बर्याच अंशी तिच्याच घरातील काकी ला माहित होत,काही वेळा बोललो सुद्धा तिच्याशी असे मला वाटते .
                  मध्यंतरी मी तील बऱ्याचदा लग्नासाठी विचार ग...असे किती तरी वेळा म्हंटले ..पण तिचे एकच वाक्य आजून बराच वेळ आहे ,या वर्षी माझे लग्नच नाही करणार आहेत घरचे ? या तिच्या उत्तरावर मी पण बिनधास्त राहायचो पण शेवटी हा माझा बिधास्त पणा मलाच रडायला लावून गेला .
           तिचा साखरपुडा कधी झाला मलाच नाही कळाला,...मी तुझीच आहे असे म्हणणारी त्यावेळी दुसऱ्याची होण्याच्या मार्गावर होती ,एक फोन करून सांगूपन वाटले नाही का तिला ? का मी  कुठे चुकलो का ? धाय मोकलेपन रडणे याशिवाय पर्यायच न्हवता माझ्याकडे .पण मला माझ्या प्रश्ननाची उत्तरे हवी होती ।मला जाब विचारायचा होता तिला, का वागलीस तू असे .काय मिळवलेस तू.नक्की खुश आहे का तू?अशा नाना प्रश्नानी मला भेडसावून टाकले . तिच्या फोनची वाट बघणे या शिवाय पर्याय न्हवता मला .माझं मन सांगत होत  काहीतरी नक्की अडचण आली असणार ...तापट लोकांनी तिला मारून झोडून तयार केली असेल लग्नाला कदाचीत,कि फसवले  हिने मला ,कि नाटक केलं प्रेमाचे .।।।।।।
             लग्नाची आदली रात्र.... हातावर महेंदी आणि मला रडक्या सुरात फोन ,मी नाही होऊ शकले रे तुझी ,माझे प्रेम खरं होत....पण माझा नाइलाज आहे ...घरच्यांच्या सुखासाठी मला हे करावे लागेल...तिकडे होणाऱ्या नवऱ्याचा फोन वेटिंग वर...नक्की कोणता फोन घेऊ या संभ्रमात.... तरी पण माझ्याशी रडत रडत बोलते ...मी हरले या घरच्यांच्यापुढे,माझे काहीच नाही चालले..हृदयातून येणारा प्रेमाचा हुंदका थांबवत...डोळे पुसत ..माझं ऐक ऐकशील का रे...रडायला येणार हुंदका तसाच हाताने दाबून बोललो हं बोल....शरीराने जरी मी त्याची असले तरी मनाने मी तुझीच राहीन ...विसरशील का ग मला ...नाही रे वेड्या ....मग दे वचन ...हो दिल तुला मी वचन ...आमच्या बोलण्यात रात्रीचा एक कधी वाजला मला पण नाही कळलं.....शेवटचा एकच प्रश्न मी विचारला .....त्यावेळी तो मला योग्य वाटला.... पळून जायचे का ग ....येशील का पळून...सगळी तयारी करतो...तू फक्त हो म्हण.....भिंतीला टेकून रडून रडून झोप कधी लागली कळालेच नाही..जाग आली ती सकाळी तिच्या फोनने ...कदाचित मी बरे वाईट करून घेतले नसेल ना हे विचारायला केलेल्या फोनने.
            लग्नाच्या चार पाच महिन्याने पुन्हा एकदा फोन खणाणला, मी परीक्षेसाठी कॉलेजला येते ...तू  नक्की ये....आता कुठे नुकतीच जखम भरत होती तोवर तू पुन्हा जागी केलीस....पावसाळ्याचे दिवस होते ते ..हो आठवते मला  ...कॉलेजच्या ऑफिस रूमच्या बाजूला उभा राहून वाट पाहत होतो तिची ......जोरदार वाऱ्यातून छत्री सांभाळत येत होती ....अगदी बारीक काया झाली होती...त्यावेळी मात्र तिने एक ऐकले होत ....माझी बया साडीवर कशी दिसते ते पाहायचे आहे मला इतकेच बोललो होतो तिला..आणि शेवटची साडीतून येण्याची  इच्छा माझी पूर्ण केली तिने ......ऐन पावसाळ्यात तिचा चेहरा सुकला होता....मनाविरुद्ध लग्न झाल्याच्या छटा सहज दिसत होत्या...पण बोलून दाखवत न्हवत्या.... काय बोलायचे हेच सुधरेना तरी पण चहा पिण्याच्या निमित्ताने मामा भाचे टी स्टॊल आत्ताचे (न्यू मामा टी स्टॊल) इतकंच सांगून निघून गेलो.
           पाणावलेल्या डोळ्यांनी तिची मी वाट पाहात राहिलो...मैत्रिणीच्या गराड्यातून कशीबशी वाट काढून चहा साठी आली...डोळ्यातून  टपकणारे पाणी ऐन पावसाळ्यात सुद्धा दिसले .....चहाचे पैसे देताना ...पाकिटमधील तिचा फोटो पाहून तिलाही थोडं रडू आले...तिला एक शेवटचं वाक्य विचारले ...सुखी आहेस का ग....निरुत्तर चेहर्याने मान गर्रकन फिरवली....अन चालायला लागली....
         खरंच सुखी असेल का हि...प्रेम एकवार करायचे आणि संसार एकबरोबर करायचा...मनाला काही पटेना...निरुत्तर झालो होतो मी...मनाने काम करणेच सोडून दिले होत...स्वार्थी  घरच्यांच्यापुढे काही चालले नसेल का ? उचशिक्षित,आणि मातंबर जावई मिळाला म्हणून ...केलं असेल का? या सगळ्याची उत्तरे अनभिज्ञान होती.......
             तोडासा रस्त्यावर आलो पाठमोऱ्या चालनाऱ्या तिच्या आकृतीकडे पाहत होतो....आकृती अस्पष्ट होत चालली होती आणि मी डोळे वटारून पुन्हा पुन्हा पाहत होतो.......मागे परतून पाहण्याची........तसाच त्या आचार्य जावडेकर मार्गात घुसलो..डोळ्यातून येणार पाणी पुसले ...एक टक आकाशाकडे पहिले ..नियतीच्या विधात्याकडे हात जोडले, देवा हेच जर तुझ्या मनात होते तर नातं जोडायचे तरी कशाला...असा तुझा कोणता खेळ आहे..डोळ्यातील पाणी पुन्हा पुसले...गाडी चालू केली...ज्या वाटेने ती बस पकडण्यासाठी गेली त्या वाटने निघालो...गाडीवरूनच भिरभिरत्या नजरेने थांब्यावर पहिले ...ती  कधीच निघून गेली होती...अगदी कायमची....
        मस्तकात जोराची कळ आली ,आईग! आसा एकाच  आवाज आला ,,,आणि मी हात झटकून जागेवरून उठलो,हाताला एक दोन नव्हे तीन चार मुंग्यांनी चावा घेतला होता....भरकटलेल्या मनातून पुन्हा जागा झालो....बराच वेळ झाला होता ...थोडस अंधुक दिसायला लागलेलं...त्रास तर खूप होत होता....तसाच अस्वस्थ मनाने पुन्हा गाडीला किक मारली ....भुर र rr  असा आवाज काढत गाडी चालली ....गाडीच्या धुराबरोबर ....जुन्या आठवणी हवेत विरून चालल्या होत्या......अगदी कायमच्या................RS

टीप).....वरील मजकूर माझ्या मनाची एक कल्पना असून याचा कोणत्याही जीवित गोष्टीशी संबंध नाही याची नोंद घ्यावी.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथा मोठी आहे पण जेव्हा सेव्ह केली जाते तेव्हा फक्त70 शब्दच दिसतात ,काय करावे लागेल कोणी सांगेल का ?☺
आणि तुमच्या टिचकी साठी धन्यवाद

पाटील साहेब एकदम मुद्द्यालाच हात घातला तुमि .........................
किती जणांचे तरी प्रेम फक्त या करणावरच अपुरे राहते . मिळणार जावई कसा जरी असला तरी मुलीने प्रेमातून निवडलेल्या मुलापेक्षा त्याला सरस समजून घरचे किती तरी मुलींच्या जिवाशीच खेळतात .

@ राम पाटील, कथा आवडली, छान आहे.

वरील मजकूर माझ्या मनाची एक कल्पना असून याचा कोणत्याही जीवित गोष्टीशी संबंध नाही याची नोंद घ्यावी.>>> हे आपले म्हणणे खरे असावे हीच सदिच्छा.

ram patil agthr tumchya stry chi maskri kelyabaddal maf kra....
n story mhnal tr akdam bhutkal jasachya tsa samor ubha rahila.... aaplya manat khup khi aste pn paristhit khi kru det nhi.... hope he fkt stry adavi tumcha anubhav nhi....

सचिन सर धन्यवाद,....कथा ,कादंबरी,किंवा ललित,ललितेतर साहित्य असो जे लिखाण असते ते लेखकाचा स्वानुभव असतो , बाकी तुम्ही समजून जा

राम साहेब मोठ्या मनाने माफ करा..... तुमची मस्करी केल्याबद्द्ल.....!! तुमची कथा वाचल्यावर माझी चुक समजली...!! Happy

पु ले शु = पुढील लेखनास शुभेच्छा!

रच्याकने (= बायदवे) इतक्या बोल्ड फॉण्ट मधे का लिहीलंय?

सर,पु.ले.शु. म्हणजे पुढील लेखासाठी शुभेच्छा !!!!!मायबोलीवरूनच शिकलेत ......बाकी तुमचा लेख खरंच खूप छान आहे ,आशा करते कि,हे सर्व काल्पनिक आहे.पुढील स्टोरी मात्र लवकर टाका प्लीज..........