एक यह दिन जब सारी सड़कें रूठी-रूठी लगती हैं
एक वोह दिन जब आओ खेलें सारी गलियाँ कहती थी
एक यह दिन जब जागी रातें दीवारों को तकती हैं
एक वोह दिन जब शामों की भी पलकें बोझल रहती थी
असं बालपण अनेकांचं असतं. 'बालपणीचा काळ सुखाचा' वगैरे वचनंही आपण अगदी सहजपणे आपल्या मनात जपली आहेत. भले ते बालपण जगत असताना मात्र, आपल्याला नेहमीच मोठं होण्याची आणि मोठ्या माणसांसाखं आपल्या मर्जीनुसार वागण्याची ओढ लागलेली असायची, पण प्रत्यक्षात मोठं झाल्यावर मात्र हे मोठेपण नकोसं होत असतं. वर उल्लेख केलेल्या जावेद अख्तर साहेबांच्या शेरांसोबतच अजून एक शेरही आहे, तो असा -
एक यह घर जिस घर में मेरा साज़-ओ-सामाँ रहता है
एक वोह घर जिस घर में मेरी बूढ़ी नानी रहती थी
मोठे झालो, स्वत:च्या मर्जीने वागतो आहोत, स्वत:चं घर आहे. पण तरी कुठे तरी आत एक अशी पोकळी राहतेच, जी कधीच भरून निघत नाही. सतत मन भूतकाळात जाऊन एखादी खपली उघडत राहतं किंवा हेच दाखवत राहतं की हे आत्ताचं सुखासीन आयुष्य म्हणजे सगळं झूठ आहे. खरं सुख तर काही तरी औरच होतं, जे आजीच्या गोष्टींत होतं किंवा अजून कुठे. लहानपण जर एखाद्या जराश्या डिस्टर्ब्ड कुटुंबातलं असेल, तर ह्या स्मृती तर पुसता पुसल्या जात नाहीत. मग तयार झालेली मानसिकता बंडखोर नसली, तरच नवल. ही बंडखोरी स्वत:खेरीज प्रत्येकाविरुद्ध असते आणि काही वेळेस तर अगदी स्वत:विरुद्धही ! कुठल्याही 'कम्फर्ट झोन' मध्ये टिकून राहावंसं वाटतच नाही. सतत पळत राहायचं. निरुद्देश. अखेरीस ह्या पळण्याचा थकवा येणार असतोच, येतोच. मग पडणारे प्रश्न मात्र आत्तापर्यंतच्या सगळ्या ओढाताणीहून जास्त तणावपूर्ण वाटतात. कारण आपलाच प्रश्न, आपणच उत्तर द्यायचंय आणि आपल्यालाच समजत नसतं की नेमका प्रश्न आहे तरी काय ?
संपले आयुष्य पण ना समजले माझे मला
धावलो होतो कुणाच्या जन्मभर मागावरी ?
वाटले आयुष्य होते रुंद रस्त्यासारखे
आज कळले चालणे आहे जणू धाग्यावरी
हे सगळं प्रचंड गुंतागुंतीचं आहे. हा गुंता शांतपणे, सावकाश, विचारपूर्वक उलगडायला हवा. गौरी शिंदेंचा 'डिअर जिंदगी' हेच करतो. ही धीमी गती ह्या विषयासाठी आवश्यकच आहे. पण जर हा गुंता ओळखीचा नसेल किंवा समजून घेता आला नाही, तर ही गती रटाळ वाटते. शाहरुख आहे म्हणून काही विशिष्ट अपेक्षांनी जर सिनेमा पाहायला जाल, तर त्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीतच. कारण मुळात हा सिनेमा त्याचा नाहीच. तो आहे आलिया भट्टचा.

एक अतिशय कुशल कॅमेरावूमन, जी तिच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करते आहे आणि एकंदरीत तिचं तसं बरं चाललं आहे. तरी 'सब कुछ हैं, पर कुछ भी नहीं' अशी अवस्था असलेल्या कायरा (आलिया) ची ही कहाणी आहे. गोव्यासारख्या नयनरम्य भागात लहानाची मोठी झालेली कायरा, फक्त तिच्या करियरसाठी गोव्यातून बाहेर पडून मुंबईला आलेली नसून, तिच्या मनात तिचं लहानपण, तिचं कुटुंब आणि ह्या दोन्हीमुळे गोवा, ह्या सगळ्याविषयी एक अढी आहे. ती ह्या सगळ्यांपासून दूर जाऊ पाहते आहे. मेहनत व कौशल्याच्या जोरावर मिळवलेल्या यशातही तिला समाधान वाटतच नाहीय. ह्या सगळ्या नैराश्यामुळे सतत नवनवी अफेअर्सही सुरु आहेत. कुठल्याच नात्यात मन रमत नाहीय. ती आत्ममग्न आणि नैराश्यग्रस्त आहे. 'डिअर जिंदगी' हा 'कायरा'चा 'प्रेमात न पडण्यापासून प्रेमात पडण्यापर्यंत', 'एकटेपणापासून कुटुंबापर्यंत', 'गोवा नावडण्यापासून गोवा आवडण्यापर्यंत' आणि 'एका जिंदगीपासून दुसऱ्या जिंदगीपर्यंत'चा प्रवास आहे. हा तिचा प्रवास डॉ. जहांगीर खान (शाहरुख खान) घडवतो. अनेक दिवसांनी शाहरुखमधला चार्म त्याने कुठल्याही प्रकारचा बाष्कळपणा न करता दिसला आहे. ह्यापूर्वी तो दिसला होता 'चक दे इंडिया' मध्ये. वेगळ्या धाटणीची, स्वत:ला अधिक साजेशी भूमिका निवडणारा हा शाहरुख अतिशय आवडतो. भूमिका दुय्यम, सहाय्यक असली तरी त्याने ती स्वीकारली आहे, ही गोष्ट वाखाणण्याजोगी आहे. आपल्या स्टारपणापुढे कहाणीवर जास्त अधिकार असलेली इतर पात्रं गुदमरणार नाहीत, ह्याची खबरदारी जी 'पिंक'मध्ये बच्चन साहेबांना घ्यावीशी वाटली नाही, ती शाहरुखने इथे घेतली आहे, हे विशेष. ह्यासाठी दिग्दर्शिकेचं जास्त अभिनंदन !
गौरी शिंदेंचे 'इंग्लिश विंग्लिश' आणि 'डिअर जिंदगी' हे दोन अत्यंत भिन्न प्रकारचे सिनेमे आहेत. पण दोन्हींत दिग्दर्शिका स्वत:चं एक बेअरिंग पकडून ठेवते आणि ते कुठेही सुटत नाही. मनोरंजनात्मक मूल्य पाहिल्यास 'डिअर जिंदगी' अनेकांना नकोसा होईल, झालाही. माझ्यासमोरच किती तरी लोक अर्ध्यातून उठून बाहेर निघून गेले. ते शाहरुखचे नेहमीचे चाळे पाहायला आले असावेत. लोक स्वाभाविकपणे शाहरुखला पाहायला येतीलच म्हणून स्वत:ला जे आणि जसं सांगायचं आहे त्यावर जराही परिणाम दिग्दर्शिकेने होऊ दिला नाहीय. हा मोह आपल्याकडे फार क्वचितच कुणाला टाळता आला आहे.
अमित त्रिवेदीचं संगीत सध्याच्या बहुतांश थिल्लर लोकांपेक्षा खूप वेगळं असतं. जी काही मोजकी नावं आश्वासक आहेत, त्यांपैकी एक अमित त्रिवेदी. कहाणीला साजेसं संगीत त्याने दिलं आहे. अगदी लक्षात राहील, असं हे संगीत नाही. रात्रीपुरतं भुंग्याला कैद करून सकाळी त्याला सोडून देणाऱ्या कमळाप्रमाणे हे संगीत आहे. भुंगा जसा आनंदाने कमळात कैद होतो, तसेच आपणही त्या त्या गाण्यात रमतो. आणि दल उघडल्यावर भुंगा जसा लगेच पुढे निघून जातो, तसेच आपणही पुढे निघतो.
गोवा सुंदर दिसणार नाही, असं दाखवायचं असेल तरच काही विशेष कसब लागेल. त्यामुळे नेत्रसुखद छायाचित्रण हे 'साहजिक' ह्या प्रकारात येतं. तरीही दाद !
'फोबिया'मध्ये सहाय्यक भूमिकेत दिसलेली 'यशस्विनी दायमा' इथेही कायराची जिवलग मैत्रीण म्हणून सहाय्यक भूमिकेत दिसते. अफाट चार्मिंग मुलगी आहे ही ! तिला एखाद्या मुख्य भूमिकेत पाहायची उत्कंठा आहे. सर्व सहाय्यक व्यक्तिरेखांत ती उठून दिसते. सळसळता उत्साह, चमकदार डोळे आणि अचूक टायमिंग. तिची 'जॅकी' लक्षात राहतेच.
आणि सरतेशेवटी, आलिया भट्ट.
केवळ मोजक्या ८-१० सिनेमांतच तिने जी परिपक्वता साधली आहे, ती अविश्वसनीय आहे. तिचा पहिला सिनेमा पाहताना असं अजिबातच वाटलं नव्हतं की ही इतकी छाप सोडेल. त्या सिनेमात तर ती 'आलिया भोगासी..' म्हणून सहन करावी लागली होती ! पण 'टू स्टेट्स', 'हायवे', 'कपूर अॅण्ड सन्स', 'उडता पंजाब' आणि आता 'डिअर जिंदगी' मुळे आलिया 'नॉट टू मिस' यादीत आली आहे. एका प्रसंगात नकाराचं दु:ख होत असतानाही, आयुष्य गवसल्याचा आनंदही तिला झालेलं असतो. एकाच वेळी रडू येत असतं आणि हसूही ! त्या वेळी आलियाने जे काम केलं आहे, त्यासाठी तिला त्रिवार सलाम ! एक असं एक्स्प्रेशन जे शब्दात सांगतानाही कठीण जाईल, ते ती प्रत्यक्षात दाखवते, हे केवळ अचाट आहे. त्या क्षणी, तिथेच सिनेमा संपायला हवा होता. तो संपला नाही, ही माझी 'डिअर जिंदगी'बाबत एकमेव तक्रार आहे. नजर लागू नये म्हणून लावलेलं गालबोट असावं बहुतेक.

'डिअर जिंदगी' हा तुमचं मनोरंजन करण्यासाठी नाही. तो तुमचा छळ मांडणारा 'कोर्ट'सारखा अनावश्यक कूर्मगतीही नाही. तो जिंदगीसारखाच आहे. 'जिंदगी' हा ज्यांचा आवडता पास-टाईम आहे, त्यांच्यासाठी हा सिनेमा आहे. 'पाहा किंवा नका पाहू, पण मी आहे हा असाच आहे', असं एक बाणेदार स्टेटमेंट हा सिनेमाच स्वत:विषयी देतो, कायरा आणि आलियासारखंच !
लव्ह यू, जिंदगी !
रेटिंग - * * * *
- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2016/11/movie-review-dear-zindagi.html
या काव्यात्मक प्रवासात ८
या काव्यात्मक प्रवासात ८ गाणी.. बापरे... डोक्याचा भुगा नुसता...>>>
मला गाणी फॉरवर्ड करता आली
हो. आलियाच्या एकटीच्या
हो. आलियाच्या एकटीच्या फॅन्सवर काही फार चालला नसता असे वाटते. मी तरी शाहरुखलाच पहायला गेले होते.
बॉय फ्रेंड्स टिकत नाहीत
बॉय फ्रेंड्स टिकत नाहीत (किंवा हीच टिकवत नाही!) हाच काय तो इश्यू! >>>>> चित्रपट बघितल्यावर फक्त हाच काय तो इश्यू आहे असं वाटत असेल तर गंमत आहे.
पराग +१
पराग
+१
सगळी गाणी फार सुंदर आहेत.
सगळी गाणी फार सुंदर आहेत. विशेषतः थेटरात पहायला.
>>>>बॉय फ्रेंड्स टिकत नाहीत
>>>>बॉय फ्रेंड्स टिकत नाहीत (किंवा हीच टिकवत नाही!) हाच काय तो इश्यू! >>>>>
मनाचा कोंडमारा, बालपणीच्या अनुभवांमुळे आलेली असुरक्षितता, आई वडिलांवरचा राग इ. इ. बरेच आहे की.
शेवटी पाहिला सिनेमा ..
शेवटी पाहिला सिनेमा .. आवडला.. सिनेमा एखाद्या कवितेसारखा उलगडत गेलाय. उगाच कुठे मेलोड्रमा , गडबड गोंधळ नाहीये. कायराचा कायापालट त्यामुळेच रियल वाटतो. अवाजवी सोल्यूशन न देता हळुवारपणे चित्रपट उलगडत जायची किमया गौरी शिंदेला जमलीये . खरा सिनेमा आलिया भट्टचा असला तरीही शाहरुख खान छाप सोडतो. या सिनेमात तो शाहरुख खान न वाटता डॉ जहांगीर खान वाटतो हे गौरी शिंदेचं मोठं यश आहे. छोटं मोठं डिटेलिंग अगदी सुरेख केलेय. वाइनच्या घुटक्यासारखा शांतपणे हा चित्रपट रिचवला की हळूच आपल्या तोंडूनही लव्ह यू जिंदगी बाहेर पडतं.
बघितला, आवडला. पण थोडा
बघितला, आवडला. पण थोडा ओढूनताणून बनवला आहे. इंग्लिश विंग्लिश इतका सुंदर फ्लो नाहीए. आलियाचं काम फार छान झालं आहे. गाणी छान आहेत. >>> जिज्ञासा + १०००. अगदी हेच वाटले.
भयंकर कंटाळवाणा सिनेमा वाटला.
भयंकर कंटाळवाणा सिनेमा वाटला. जी काही थोडीफार मजा वाटायची आशा होती, ती सगळ्या इशुजचं ट्रिव्हिअलायझेशन करून बोरींग डायलॉग्जमधून घालवून टाकली. << एक प्रेक्षक म्हणुन मला शेवटी हा आत्मशोधा झाला की ...
फक्त trailer चा छान आहे म्हणुन सिनेमा पहीला तर..पदरी सुमार कथानक, तद्दन आणि मसाला छाप गाणी व दुय्यम अभीनय पडलाय..!! >> ह्याला अगदी अगदी.
भयंकर कंटाळवाणा सिनेमा वाटला.
भयंकर कंटाळवाणा सिनेमा वाटला. जी काही थोडीफार मजा वाटायची आशा होती, ती सगळ्या इशुजचं ट्रिव्हिअलायझेशन करून बोरींग डायलॉग्जमधून घालवून टाकली. << एक प्रेक्षक म्हणुन मला शेवटी हा आत्मशोधा झाला की ...
फक्त trailer चा छान आहे म्हणुन सिनेमा पहीला तर..पदरी सुमार कथानक, तद्दन आणि मसाला छाप गाणी व दुय्यम अभीनय पडलाय..!! >> ह्याला अगदी अगदी. >>>>> +1111
लोकांकडून ऐकलंय त्या प्रमाणे
लोकांकडून ऐकलंय त्या प्रमाणे सिनेमा आवडणारे आणि सिनेमा अजिबातच म्हणजे अजिबातच न आवडणारे असे दोन्ही प्रेक्षक आहेत. मोरपंखीस यांनी म्हटल्याप्रमाणे रटाळ आणि इतका बोअर सिनेमा आयुष्यात कधी बघितला नाही अशी प्रतिक्रिया आणि स्पेशली गौरी शिंदे कडून हि अपेक्षा नव्हती इत्यादी इत्यादी . शेवटी आयुष्यात तुम्ही सगळ्यांनाच खुश ठेऊ शकत नाही हे सगळ्याच क्षेत्रात लागू होत हेच काय ते खर
आपल्या स्टारपणापुढे कहाणीवर
आपल्या स्टारपणापुढे कहाणीवर जास्त अधिकार असलेली इतर पात्रं गुदमरणार नाहीत, ह्याची खबरदारी जी 'पिंक'मध्ये बच्चन साहेबांना घ्यावीशी वाटली नाही, ती शाहरुखने इथे घेतली आहे, हे विशेष. ह्यासाठी दिग्दर्शिकेचं जास्त अभिनंदन ! >>> हे काही कळाले नाही. पिंक ची स्क्रिप्ट काही बच्चनने लिहीलेली नाही. स्क्रिप्टच अशी आहे की त्या मुलींच्या 'नकारा' चे महत्त्व तो वकील पटवून देतो. त्या मुली स्वतः फारशा काही नंतर करत नाहीत एकदा नेटाने केस उभी केल्यावर. दोष द्यायचा तर पटकथालेखकाला द्यावा लागेल, त्या मुलींकरवीच तो मेसेज का नाही पोहोचवला म्हणून, किंवा एखादी स्त्री वकील का नाही आणली म्हणून. पण भारतातील अनेक पुरूषी वर्चस्ववादी विचारांच्या लोकांपर्यंत बच्चन चा मेसेज जरातरी पोहोचायचे चान्सेस आहेत. त्या लोकांनी या मुलींसकट त्या स्त्री वकिलाला ही तुच्छ लेखले असते. थिएटर मधे तिच्या आर्ग्युमेण्ट्स्च्या वेळेस तिच्याबद्दलच लोकांनी कॉमेण्ट्स मारल्या असत्या. तेव्हा तो मेसेज पुरूष कलाकाराने पोहोचवणे महत्त्वाचे होते.
फा +१
फा +१
काल पाहिला. मला अतिशय आवडला.
काल पाहिला. मला अतिशय आवडला. शांतपणे, निवांतपणे अनुभवायचा सिनेमा आहे. कुठेही, एक मिनिटभरासाठीही कंटाळवाणा, रटाळ वाटला नाही. धीम्या गतीची पण सुंदर पटकथा आहे. शाहरूखची एंट्री कधी होतेय, कधी होतेय ही उत्सुकताही जागी झाली नाही. अगदी सहज खोलीचं दार उघडून आत यावं तसा तो पडद्यावर अवतरतो. तिथून पुढेही त्याचा वावर हा सिनेमा आलिया भटचा आहे हे सतत ध्यानात ठेवून झालेला आहे (किंवा गौरी शिंदेने त्याच्याकडून तसा करून घेतलेला आहे) हे फार आवडलं.
आलिया भटचा धाकटा भाऊ झालेला अॅक्टरही मला फार आवडला. खूप बोलका चेहरा आहे त्याचा. पण सर्वांनी त्याला किडो-किडो करणं जरा अतीच वाटलं. त्याचं खरं नाव कळतच नाही. पण तो दुय्यम मुद्दा आहे.
अली जफर मला आजवर विशेष आवडला नव्हता. पण यात तोही आवडला.
आलिया भटने स्टुडण्ट ऑफ द इयर सारखा स्टुपिड सिनेमा का केला असावा असा आता प्रश्न पडतो!!
सिनेमाची संथगती न झेपलेलं आमच्या शेजारचं आणि पुढच्या रांगेतलं पब्लिक वारंवार फोनवर व्हॉट्सअॅप, फेसबूक वगैरे बघत होतं... आम्ही त्यांना वारंवार फोन बंद ठेवा, डोळ्यांवर ग्लेअर येतो आहे असं सांगत होतो...
काल डिअर जिंदगी पाहिला, आवडला
काल डिअर जिंदगी पाहिला, आवडला. आलिया भट्ट खरेच अभिनेत्री म्हणून खूप सुधारतेय. शाहरुख प्रचंड आवडला. मला आवडलेला ता त्याचा तिसरा चित्रपट. देव करो व त्याला अशीच चांगली कामे मिळत राहोत. एक चांगला अभिनेता फुकट जाऊ नये.
सुरवातीला चित्रपट थोडा कंटाळवाणा वाटतो, नेहमीचे श्रीमंतांचे प्रॉब्लेम वाटायला लागते.
पण नैराश्य, आयुष्यात काय हवंय, काय करायचंय, कोणावर किती विश्वास टाकायचा ह्याचा गोंधळ होणे हे सगळे आता खूप सामान्य झालेय. हा चित्रपट एक महत्वाचा संदेश देतो की तुमच्या पोटात दुखले की जसे डॉक्टर गाठता तसे डोक्याचा भुगा होत असला कीही डॉक्टर गाठा. तुमचा शेजारी हॉस्पिटलात ऍडमिट असेल तर ज्या काळजीने त्याची चौकशी कराल, त्याला बरे वाटावे म्हणून फुले, फळे घेऊन जाल तीच आस्था एखाद्याच्या मनाचा गुंता तो डॉक्टरकडे जाऊन सोडवत असेल त्याला दाखवा. त्याला मनाचा रोग आहे म्हणून त्याला वेडा म्हणून मोडीत काढू नका. घरच्यांनीही 'आहे त्याला त्रास, करतोय तो प्रयत्न यातून बाहेर येण्याचा' हे स्वतःला समजवा.
आलियाचे डॉक्टरकडे गेल्यावर स्वतःच स्वतःच्या वागण्याकडे परत पाहून त्यातल्या चुका बघणे, त्यातला फोलपणा जाणवणे इत्यादी गोष्टी खूप छान दाखबल्यात, तिचे बदलत जाणे पूर्णांशाने पटते. प्रॉब्लेम्स येतच राहणार, ते सोडवायचे कसे ते आपले आपण शिकून सोडवत राहायचे. एकाच रिलेशनकडून जगभरच्या अपेक्षा ठेऊन त्याला गुदमरून मारू नका तर जिथून जी शक्यता पुरी होतेय तिथून ती पुरी करा हेही खूप आवडले. एखादी गोष्ट मिळत नसेल तर It's a genius to know when to stop....
cinema slow watla mala...
cinema slow watla mala... gaani chaan ahet..ani goa location mast..madhye ek vel ashi aali hoti ki maza dola lagla ani uthle tevahi sceen var vishesh kahi chalu navta..zopunhi kahi miss zaal nahi :D...
तद्दन बॉलिवूडपटांपेक्षा बराच
तद्दन बॉलिवूडपटांपेक्षा बराच बरा वाटला. Psychiatrist कडे जाण्यात काही चूक नाही किंवा पालकांना माफ करून टाकावं हे मुद्दे छान मांडले आहेत. पण बाकी चार आनेकी मुर्गी बारा आनेका मसाला झालं आहे. २० मि. च्या शॉर्ट फिल्म किंवा डॉक्यूमेंटरीचा पूर्ण मुव्ही पाणी घालघालून केला आहे. यात मग चांगले मुद्देही झाकोळले गेले.
शाहरुख हा शाहरुख खानच वाटतो, त्याचा काही इंटरव्ह्यू वगैरे चालला असावा असं वाटतं. तो चुकूनही doctor अमुक तमुक वाटत नाही. थकलेलाही खूप वाटतो. त्यामानाने अक्षय कुमार त्याच पिढीतला असून चेहऱ्यावर थकवा दिसत नाही (हे परवाच एअर लिफ़्ट पाहिला तेव्हा जाणवलं.) आलियाने चांगलं काम केलं आहे, तिच्याकडून १०० टक्के दिले आहेत.
गौरी शिंदेंने इंग्लिश विंग्लिश मध्ये पुण्यात राहणार्या श्रीदेवीच्या मराठी कटुंबात रोज सकाळी हिंदी न्यूज पेपर येताना दाखवला होता. असे आचरट (की मुद्दाम केलेले) ब्लूपर्स इथे नाहीत याचं आश्चर्यच वाटलं.
खूप स्लो आणि रटाळ मोवी आहे हा
खूप स्लो आणि रटाळ मोवी आहे हा...
सुंदर आणि अतिशय जमून आलेला
सुंदर आणि अतिशय जमून आलेला रिव्ह्यू रसप.. तसाच हा चित्रपटही!!!
आज पुन्हा (कितव्यांदा ते नक्की आठवत नाही) पाहिला चित्रपट... अतिशय सुखद आणि हळूहळू मनात उतरत जाणारा आहे हा अनुभव... हायवे नंतर अलियामध्ये जी झपाट्याने उत्तमोत्तम सुधारणा झाली, त्यात या चित्रपटामुळे अजून भर... अतिशय सुंदर आणि मन लावून काम केलंय तिने.!
मानसोपचार तज्ञाकडे जाऊनही आपल्या मनातील खर दुःख काय, नक्की काय सलतय हे शेवटपर्यंत व्यक्त न करता आल्यामुळे मनाची होणारी घालमेल पर्फेक्ट दाखवली आहे तिने!! डोळे फारच बोलके आहेत तिचे...
चक दे, स्वदेस नंतर या आणखी एका चित्रपटात शाहरुख बेहद्द आवडलाय... तो तिथे शाहरुख न वाटता हुबेहूब तेच कॅरॅक्टर वाटतो.. त्याचा (खराखुरा) सेन्स ऑफ ह्युमर आणि बोलकी नजर ह्याचा छान वापर केलाय, गौरी शिंदेने... आलिया आणि त्याचा निरोपाचा सीन, तो बाय करण्यासाठी हात पुढे करतो, नेमकी तेव्हाच ती मागे वळते, तेव्हाचं अवघडलेपण सगळं सगळं उत्तम टिपलंय!!! माझ्या आवडत्या चित्रपटांच्या यादीत फार वरच्या स्थानावर आहे हा आणि हा रिव्ह्यूही!!!
भूमिका दुय्यम, सहाय्यक असली
भूमिका दुय्यम, सहाय्यक असली तरी त्याने ती स्वीकारली आहे, ही गोष्ट वाखाणण्याजोगी आहे. >>> +९९९९९
लेख खूप छान , चित्रपट पण छान आहे , पण थोडी गती असती तर अजून खूप चांगला होऊ शकला असता , उदाहरणार्थ SRK ची पण कथा थोडी उलगडली असती तर ...
चित्रपट त्याच फ्रेम वर संपायला हवा होता (तीचे शेवटचे सेशन वरून बाहेर पडताना )>> १००% सहमत
SRK आणि आलीया >> कास्टिंग परफेक्ट आहे !
SRK डोळ्यात ड्रॉप्स टाकत असतो हे कसले प्रतीक आहे का ?
छान लिहिलंय
छान लिहिलंय
शाहरुख बेहद्द आवडलाय... तो
शाहरुख बेहद्द आवडलाय... तो तिथे शाहरुख न वाटता हुबेहूब तेच कॅरॅक्टर वाटतो.. त्याचा (खराखुरा) सेन्स ऑफ ह्युमर आणि बोलकी नजर ह्याचा छान वापर केलाय, गौरी शिंदेने.
>>>>
+७८६
जे तारे जमीन पर मध्ये आमीरने केले ते ईथे शाहरूखने केले. म्हटलं तर दुय्यम वा सहाय्यक भुमिका. पण यांच्याशिवाय चित्रपट अधुरा. या दोन्ही चित्रपटांना मिळालेले बॉक्स ऑफिस यश, लोकाश्रय आणि यावर घडणारया चर्चा यातही या दोघांच्या स्टारडमचा वाटा होता.
आपल्या स्टारपणापुढे कहाणीवर
आपल्या स्टारपणापुढे कहाणीवर जास्त अधिकार असलेली इतर पात्रं गुदमरणार नाहीत, ह्याची खबरदारी जी 'पिंक'मध्ये बच्चन साहेबांना घ्यावीशी वाटली नाही, ती शाहरुखने इथे घेतली आहे, हे विशेष
>>>
बच्चनसाहेबांबद्दल नो कॉमेंट. तो दिग्दर्शकाचा कॉल असू शकतो.
पण शाहरूख येस्स! टोटली ॲण्ड फुल्ली ॲग्री
शाहरूखने हे याआधीही केले आहे.
बिल्लू मध्ये त्याने पिक्चर ईरफानचाच ठेवला. स्वत:ला जास्त फूटेज दिले नाही. विशेष म्हणजे या चित्रपटाचे निर्माते होते खुद्द शाहरूख आणि गौरी खान. हे समजल्यावर त्याबद्दलचा आदर आणखी ऊंचावला.
रईस चित्रपटात तर तोच मेन हिरो होता. पण त्याने सध्याच्या अभिनयसम्राट नवाझुद्दीन सिद्दीकीच्या फूटेजमध्ये आपले स्टारडम येणार नाही याची काळजी घेतली. ईतकेच नव्हे तर दोघांच्या दृश्यात डायलॉगही नवाझलाच दमदार राहतील हे बघितले. हे खुद्द नवझुद्दीनने एका मुलाखतीत सांगितलेले.
जर मी चुकत नसेल तर पिक्चरच्या श्रेयनामावलीत हिरोईनचे नाव आधी येणार हे त्यानेच सुरू केले. चेन्नई एक्सप्रेसमध्ये हे आपल्याला बघायला मिळाले. सिनेमाच्या ईतक्या वर्षात हे कोणाला सुचू नये. एक व्यक्ती एक रोल मॉडेल म्हणून शाहरूख आहेच कमाल.
म्हणून मला अरबाज आवडतो .
म्हणून मला अरबाज आवडतो . दुय्यम भूमिकेत असतो पण समोरच्याला पूर्ण फुटेज देतो .
त्याच्या स्टारडम चा समोरच्याला त्रास होणार नाही याची तो संपूर्ण खबरदारी घेतो .
Pages