थोडे दिवस

Submitted by सुमुक्ता on 25 November, 2016 - 05:44

इवलेसे हात तुझे सामावू दे माझ्या हातातच
थोडे दिवस रहा अजून तू लहानच

निरर्थक बडबडणे तुझे ऐकू येऊ दे सततच
थोडे दिवस रहा अजून तू लहानच

घरभर माझ्यामागे फिर तू अजून रांगतच
थोडे दिवस रहा अजून तू लहानच

हट्ट तुझा मला पुरवत राहू देत कायमच
थोडे दिवस रहा अजून तू लहानच

हास्य निरागस तुझे घरात राहू दे फुलतच
थोडे दिवस रहा अजून तू लहानच

अनुभवू दे मला लहानपण तुझे अजूनच
थोडे दिवस रहा अजून तू लहानच

Group content visibility: 
Public - accessible to all site users