रुदाली!!!!! या, मनसोक्त भोकाड पसरा,त्यासाठीच हे गप्पांचे पान आहे.

Submitted by सिंथेटिक जिनियस on 25 November, 2016 - 03:51

हे नवीन रुदाली स्वरुपाचे गप्पांचे पान सुरु करत आहे.मायबोलीवर सध्या दोन गट पडले आहेत .एक आहेत अड्डेकरी आणि दुसरे आहेत कट्टेकरी.कट्टेकर्यांच्या मते अड्डेकर सतत रडत असतात.मोदी,भाजप ,उजवे यांच्या नावाने रुदालीची भुमिका वढवत असतात.
तर अड्डेकर्यांच्या मते पंप्र पासून त्यांच्या तळागाळातिल भक्तांचे सतत काँग्रेस ,गांधी परिवाराच्या नावे रडगाणे चालू असते .कधी रडायचे असेल तर दोघा गटांना हे पान सोयीचे पडेल.इथे येऊन भोकाड पसरायची सर्वांना अनुमती आहे.भोकाड पसरण्यात लाज बाळगू नका.
विशेष सूचना.
१ .सभ्य भाषेचा वापर करावा
२." आत्ता की गं जित्ता होता" या लाईनपासून सुरवात करु नये.
३. अश्रुंचा pH acidic ठेवावा.
४. खोटे रडू नये ,फसाल!
चला तर मग मनसोक्त रुदालीकरण करा या पानाचे.या भोकाड पसरा,प्रेमाने शिव्या द्या पण मापात व माबोच्या नियमात बसेल असे असु दे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"रडणे" आणि "संताप व चिडचिड होणे" या दोन्हीत खूप मोठा फरक आहे. या दोन गटांना एकमेकांविषयी संताप, नापसंती इत्यादी वाटते. ना कि एकमेकांविषयी दु:ख वाटते..

नोटाबंदी करुन मोदींनी सामान्य माणसांचे जगणे मुश्कील करुन ठेवले आहे,त्याविरोधात मी इथे जाहीर रडत आहे,कुणी आहे का माझ्यासोबत रडणारे??????

>>मायबोलीवर सध्या दोन गट पडले आहेत
सद्ध्या नाही, फार काळापासुन आहेत ते. तुम्ही कदाचित नवे असाल.
पुर्वी पण काही वेळा असे प्रयोग करून झाले आहेत,
पण "ज्याची त्याला प्यार कोठडी" असल्याने - - - - -
तस्मात, अजिबातच अनावश्यक धागा, आगे तुम्हारी मर्जी !

मोदी सरकार बद्द्ल बोलायचे तर आधिच्या सरकार पेकशा बरीच चागली कामे केली अस म्हणेन ...... पुर्वि झालेले घोटाळे ( किती तरी वर्शे केलेले) बाहेर आले तेव्हा जनतेनी रडारड नाहि केली...... मग नोटाबंदी बद्द्ल्च का???? ....... मोदी सरकारने आपल्या कडे फक्त ५० दिवस मागितले आहेत काय हर्कत आहे द्यायला???? ...... देश बदल्तोय थोडे आपणहि बदलुयात..... काय? .........

"http://www.maayboli.com/node/60912 या धाग्याचा तुमच्याशी काही संबंध आहे का हो सर ???"++१११
या धाग्यात दिलेल्या तुमच्या प्रतिसाद नुसार तुम्ही आता कोणत्या mode मध्ये आहेत हो सर ???

रुदाली म्हणजे 'मोले घातले रडाया' ना !
'नाही आसू नाही माया' असं मी म्हटलेलं नाही याची नोंद घेण्याचे करावे.
मग कोणाला किती पैसे मिळताहेत सध्या रडायचे.

अरेरे... हा धागा फक्त कट्टेकरी अनि अड्डेकरी साठी म्हणजे रडण्यासाथी आहे का ???
मग बाकीच्या ..करांनी कुठे जायच ???
गिरीदा च्या स्मायली + १००..मी तळ्यात बुडाले.