आजचा बॅन्केचा नियम !

Submitted by ऋन्मेऽऽष on 21 November, 2016 - 12:23

आजचा सुविचार काय ठरलाय हे जसे शाळेच्या बोर्डावर लिहिले असते,
आजचा मेनू काय बनलाय हे जसे हॉटेलाच्या पाटीवर दाखवले असते,
आजचा सोन्याचा भाव किती वाढलाय हे जसे वर्तमानपत्रात छापले असते,
आजच्या तापमानाचा पारा किती चढलाय हे जसे बातम्यांत सांगितले जाते,
तसेच आजच्यासाठी सरकारने आणि बॅंकेने आपल्या पैश्याची उलाढाल करायला काय नवीन नियम काढलाय हे रोजच्या रोज ईथे अपडेटूया.

धागा काढण्यास कारण की, आज आता संध्याकाळी गर्लफ्रेंडच्या जोडीने एका एटीएमच्या बाहेर लाईनमध्ये उभा होतो. तब्बल पाऊण तास!
ते एक सोडा. गप्पांमध्ये छान टाईम कटला. पण जसा नंबर जवळ आला तसे आम्हा दोघांच्याही एकाच वेळी ध्यानात आले की नेमके किती पैसे काढू शकतो याची आम्हा दोघांनाही कल्पना नव्हती.
पुढच्याला विचारले, मागच्याला विचारले, जो पैसे काढून आला त्याला विचारले, अगदी ए टी यमाचा द्वारपाल, चित्तरगुप्तालाही विचारले, जो तिथे सर्वांच्या काळ्यापांढर्‍याचा हिशोब करायला उभा होता..

पण चौघांनी मिळून वेगवेगळी अशी तीन उत्तरे दिली !

त्यातल्या दोघाजणांनी दोन हजार हे सामाईक उत्तर दिल्याने आम्ही दोघांनी जोडीने दोन हजार रुपये काढायचे ठरवले. उगाच जास्तीचा आकडा दाबायचो आणि तुम्ही आजचा टर्न गमावला आहे असा संदेश स्क्रीनवर झळकायचा.. कोण रिस्क घेणार !!

असो, तर एकेकाळी एटीएममधून पैसे काढताना त्या मशीन मधून पैसे मोजायचा खडखड खडखड असा आवाज यायचा. पैसे पडतानाही असे वाटायचे की कसिनोमधून छनछन छनछन पैसे पडत आहेत. अगदी आपलेच पैसे असले तरीही काहीतरी जिंकल्याचा, काहीतरी कमावल्याचा आनंद व्हायचा.

पण गेले ते दिवस...

एकच काय तो खट् आवाज आला, (ट चा सुद्धा पाय मोडलाय बघा म्हणजे केवढा छोटा आवाज आला असावा), आणि सुळकन दोन हजार रुपयाची एकच नोट काय ती बाहेर आली.

आत जाताना आम्ही ठरवले होते की त्या दोन हजारातले हजार-हजार रुपये प्रत्येकी वाटून घ्यायचे. पण आता या दोन हजाराच्या नोटेचे सुट्टे ईसवीसन दोन हजार एकोणवीसपर्यंत मिळणे शक्य नसल्याने धर्म संकटात सापडलो.

एकवार मी त्या गुलाबी नोटेकडे पाहिले. एकवार मी माझ्या गर्लफ्रेंडकडे पाहिले. ती त्या नोटेपेक्षाही गुलाबी भासली. आणि नोट कोणाकडे जाणार याचा फैसला झाला.

एटीएममधून बाहेर पडताना एक जण आजचा आकडा पुटपुटला.. एक दोन अडीच!

काय तर म्हणे तब्बल अडीच हजार रुपये आज एटीएममधून काढू शकत होतो. खरे खोटे देव जाणे. पण आता आम्ही एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागलो. वरचे पाचशे रुपये मला मिळाले असते म्हणून मला जरा जास्त वाईट वाटू लागले. त्या पाचशेमध्ये शंभराच्या पाच नोटा आल्या असत्या, याचेच खरे तर जास्त वाईट वाटत होते. कारण आता आमच्याकडे दोन हजाराचा पांढरा पैसा होता, मात्र त्याचे सुट्टे जोपर्यंत मिळणार नाही तो पर्यंत त्याची किंमत दोन रुपयाच्या गुलाबी लिफाफ्यापेक्षाही कमी होती. कधी नव्हे ते फोटोतले गांधीजी हसताना दिसले. बहुतेक आमच्या फजितीवर ...

पुन्हा अशी फजिती माझी तुमची कोणाचीच होऊ नये म्हणून एकमेका सहकार्य करू आणि आजचे पैसे काढायचे, भरायचे. काळ्याचे पांढरे करायचे नियम नक्की काय आहेत हे ईथे रोजच्या रोज जाणून घेऊ.
काय करणार, माय बाप सरकार तर आपल्याला झुलवायला बसले आहे, अश्यावेळी आपली माय बोलीच कामाला येणार Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नुकत्याच येऊन गेलेल्या इन्कम डिक्लरेशन स्कीम किंवा फेअर अँड लव्हली योजनेतल्या कर आणि दंडाचा पहिला २५%चा हप्ता ३० नोव्हेंबरपर्यंत भरायचा येणार आहे. ही रक्कम जुन्या ५०० च्या नोटांत भरता येईल असं इंडियन बँक्स असोसिएशनने सांगितलं आहे. शेवटचा हप्ता ३०.०९.२०१७ पर्यंत भरता येईल म्हणजे या योजनेत बुडी मारून पवित्र झालेल्यांना त्यांच्याकडच्या जुन्या नोटा ३०.०९.२०१७ पर्यंत कर-दंड भरण्यासाठी खपवता येतील. त्यांना या नोटांच्या स्रोताबाबत कोणतेही प्रश्न विचारले जाणार नाहीत. म्हणजे त्यांच्याकरवी इतरांनाही आपल्याकडच्या जुन्या नोटांचे समर्पण करता येईल.

भरत. -
१- जितक्या नवीन नोटा डिपॉझीट केल्यात तीतक्याच काढता येतील, जुन्या जमा केलेल्या पैस्यांना लिमीट आहेच

२- ईन्कम डीक्लेरेशन स्कीमम्ध्ये पेनल्टी पकडुन साधारण ८०-९०% पैसे भरावे लागतील आणी ऊर्वरीत रक्कम मिळेल

असे मी ABP माझावर एकले आणी म टा वर पण आहे

वेगवेगळ्या ATM मधून ३ पेक्शा जास्त वेळा withdrawal केल्यास extra charges लागणार हा नियम नोटाबंदी मधेही चालु आहे का?

वेगवेगळ्या ATM मधून ३ पेक्शा जास्त वेळा withdrawal केल्यास extra charges लागणार हा नियम नोटाबंदी मधेही चालु आहे का?>>>> नाही.

माझ्या एका व्हॉटसपग्रूपवर आरडाओरडा चालू आहे की त्यांच्या डेबिट कार्डला यंदा सर्विस चार्ज पडला आहे. ०.७५ टक्के की काहीसा .. जो आधीपर्यंत नव्हता.
ईथे कोणाला काही खबर? हे नवे प्रकरण, नवा नियम आहे का काही?

रिझर्व बँक चालू आहे ना? की बंद झाली?

.

.

.

.

.

.

.

.

.

चार दिवस होऊन गेले... एकही नवा नियम आला नाही म्हणून विचारलं.

डिजिटल पेमेंट को लगा धक्का, कल से पेट्रोल पंपों पर नहीं चलेंगे क्रेडिट और डेबिट कार्ड
http://dhunt.in/1PHfw
via NewsHunt.com

जर तुम्ही काल ही बातमी वाचली असेल,

तर आज ही वाचा..

बैंकों ने फिर बदला फैसला, कार्ड पेमेंट पर नहीं देना होगा कोई चार्ज, पेट्रोल पंप पर कर सकेंगे भुगतान
http://dhunt.in/1PIo8
via NewsHunt.com

Pages