वेगवेगळ्या प्रांतात आढळणारी मराठी आडनावे "

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 November, 2016 - 13:15

मायबोली उपभोक्ता क्रमांक 62302 यांच्या धागा क्रमांक 60873 येथील चर्चेवरून हा धागा. म्हटलं तर सहजच सुचला, म्हटलं तर चांगली माहीती गोळा होईल

त्या धाग्यात चर्चा चालू आहे त्यानुसार सरकार हे आडनाव महाराष्ट्रातही असते(?), तर सरकार हे आडनाव बंगाली लोकांमध्येही असते.

अशीच चटकन मला आठवणारी काही आडनावे,

राव हे आडनाव आपल्याकडेही असते तर सौथेंडियन लोकांमध्येही असते. तसेच आंध्रमध्येही असते.

नाईक हे नाव महाराष्ट्रात असते, तर बहुतेक कर्नाटकातही असते, आणि हिंदूंसारखेच मुसलमान धर्मातही असते. हे नक्की आडनाव आहे की एखादे पद, पदवी?

शिंदे हे आडनाव महाराष्ट्रातील मराठ्यांमध्ये येते, तसेच ग्वाल्हेरचे शिंदेही येतात. की हे दोन्ही एकच?

चौधरी हे आडनाव महाराष्ट्रात असतेच, पण यूपी बिहारचे चाचा चौधरी सुद्धा यात येतात.

वरच्या सरकार वरून आठवले कर, किंवा कार म्हटले की आपल्याला चटकन ते नाव महाराष्ट्रीयच वाटते. मध्यंतरी रिओ ऑलिंपिकमध्ये चमकलेली दिपा कर्मकार याच कारणाने बरेच लोकांना महाराष्ट्र कन्या वाटली होती. पण प्रत्यक्षात ती त्रिपुराची आहे.

असो, डोक्याला ताण दिला तर अजून अशी आडनावे आठवतील, आपल्याला आठवतील तशी भर टाका, वर मी काही चुकीचे लिहिले असेल तर कर्रेक्ट करा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देसाई येस्स, पण जोशी सुद्धा असतात का? जोशी म्हटले की पटकन जोशीकाकू असेच डोक्यात येते Happy

शेट्टी हे नाव सुद्धा मराठी-मद्रासी आहे.. की महाराष्ट्रात असते ते शेट्ये असते?

खेर हे महाराष्ट्र आणि कश्मीर.

जोशी कर्नाटक, राजस्थानमध्ये पण आहे.

देसाई कर्नाटकमध्येही आहे.

मस्त धागा आहे, ऋ. उदाहरणांसाठी फॉलो करत राहीन.

चौधरी राजस्थानातसुद्धा असतात.

उत्तर भारतात जोशी ही एक कम्युनिटी आहे. महाजन ही पण एक कम्युनिटी आहे. यातल्या ब-याच जणांचा तंबू भाड्याने देण्याचा किंवा लग्नासाठी लागणारी भांडी आणि इतर सामान देण्याचा व्यवसाय माझ्या पाहण्यात आला. जोशी ही कम्युनिटी महाराष्ट्रात पण आहे. एक संजय जोशी माझ्या परिचयाचे आहेत ( त्यांची कम्युनिटी अनु. जा. मधे येते अशी त्यांनी माहिती दिली).

कर्नाटकात नाईक आडनाव नाही. तिथे नायक हे आडनाव आहे. राव हे आडनाव मूळचं आंध्र,कर्नाटक भागातलं. महाराष्ट्रात जे राव आहेत त्यांचं मूळ तिथे आहे. माझ्या एका मामे बहीणीचे आडनाव राव आहे. उत्तम मराठी बोलतात. पण मूळचे आंध्र कर्नाटक बॉर्डरवरचे आहेत.

मध्य प्रदेशातले सिंदिया हे महादजी शिंदे ह्यांचे वंशज आहेत. सिंदिया हा शिंदे आडनावाचा हिंदी अपभ्रमश आहे. (माझी माहिती चूक असू शकते.)

जोशी सगळ्यात असतात.... राज्यांमध्ये... जातींमध्ये... पोटजातींमध्ये...
"रिकामी पिशवी झटकल्री तरी एक-दोन पडतील."

शेट्टी आणि शेट्ये ही दोन आडनावं वेगळी आहेत. शेट्ये हे आडनाव महाराष्ट्रीय वैश्य समाजात आढळतं. याच समाजात गांधी हे आडनावही आहे.

ऋन्मेष, तुम्ही मुंबईकर असल्याने शेट्टी लोकं कुठल्या प्रातांतले असतात हे ठाऊक असेल की तुम्हाला

कर्नाटकात नाईक आडनाव नाही. >>> आहे. माझ्या नणंदेच्या नणंदेचे मिस्टर नाईक आडनावाचे आहेत आणि ते कारवारच्या हळदीपुरचे आहेत. नायकपण आडनाव आहे कर्नाटकात हे बरोबर.

आमचे आडनाव बिर्जे

आता बिर्जे कोकणातही आहेत आणी कोल्हापुरात पण
फरक ईतकाच की कोल्हापुरातले बिर्जे ९६ कुळी तर माझ्या माहीतीतले कोकणातले भंडारी.

( प्लीज जातीवरुन गैरसमज नसावा फक्त फरक दाखविन्याचा ऊद्देश आहे)

हळदीपूर असे आडनाव पण आहे ना ? तसेच कल्याणपूर पण ही नावे कोणत्या भागातली आहेत, तसेच त्यांच्या पुढे कर का नाही जोडायचे ?

जोशी, मुजुमदार, चौधरी, देसाई ही पद/ व्यवसायावरून पडलेली आडनावं असल्यामुळे अनेक ठिकाणी असू शकतात. काही जोशींना मूळचं वेगळं आडनाव असतं, त्यांना माहिती असतं, पण ते जोशीच लावतात.

आता बिर्जे कोकणातही आहेत आणी कोल्हापुरात पण>> तसंच कोकणातले मांजरेकर हे भंडारी समाजाचे असतात सामान्यत: आणि गोव्यातले मांजरेकर सारस्वत.

माझा एक मित्र आहे त्याचे आडनाव कदम पण तो खरा पंजाबी.

त्याने सांगीतल्या प्रमाणॅ फाळणीच्या वेळेला बर्या जट आणी पंजाबी लोकांनी जिथे स्थलांतर केले तीथली नावे अन आडनावे पण घेतली.

हळदीपुर, कल्याणपुर ही नावे कर्नाटकातली (कारवार) असून चित्रापुर सारस्वतांतली आहेत. दक्षिणेकडे आडनावापुढे 'कर' लावायची पद्धत नाही. नुसते गावाचे नाव पुरेसे असते. किंवा गावाच्या नावाचे आद्याक्षर पुरेसे असते. उदा. पडुकोणे प्रकाश किंवा पी. प्रकाश. एस. राधाकृष्णन किंवा सर्वपळ्ळी राधाकृष्णन. राधाकृष्णन यांचा मुलगा एस गोपाल म्हणजे सर्वपळ्ळी गोपाल. पुलंचे हेच्च मंगेशराव म्हणजे हट्टंगडी मंगेशराव. यात पडुकोणे, सर्वपळ्ळी,हट्टंगडी ही सर्व त्या त्या व्यक्तीच्या मूळ गावाची नावे आहेत. पी. साईनाथ, पी.वी. नरसिंह राव, पी.टी.उषा, एस.जानकी, पी. सुशीला, एम. जी. रामचंद्रन ही सगळी याची उदाहरणे.
चौधरी हे मुख्यत: बंगाली आडनाव आहे. पूर्व बंगालातले मुस्लिमसुद्धा हे आडनाव लावतात. बाकी चौधरी हे नाव उत्तर भारतात सर्वत्रच पुष्कळ असते. आपल्याकडे जळगाव खान्देश वगैरे भागात जास्त करून दिसते.
राव हे मूळ मराठी आडनाव आहे. ते एक सन्मानदर्शक संबोधन आहे. ज्ञानश्वरीत राओ अथवा रावो असे संबोधन सापडते. शिवलीलामृतातसुद्धा राजाला रावो म्हटले आहे. पहिल्या बाजीराव पेशव्यांचे 'राउ' नाव प्रसिद्धच आहे.जे मूळ मराठी लोक दक्षिणेत स्थायिक झाले त्यांच्यामधल्या काहींचे (जास्त करून ब्राह्मणांचे) हे आडनाव असते. त्यांच्यापैकी अनेक घरांत अजूनही मराठीमिश्रित स्थानिक भाषा बोलली जाते.

{{{ चौधरी हे पाकी मुस्लिमांचे पण आडनाव आहे , चक्क! }}}

चौधरी, इनामदार, जमादार हे हुद्दावाचक शब्द आहेत त्यामुळे ते इतर जातीधर्मांमध्ये आढळतात.

Pages