भारतीय पुरुष पाश्चात्य पुरुषांची बरोबरी का करतात ?????

Submitted by अतरंगी on 20 November, 2016 - 12:29

आमचे प्रेरणा स्थान:- तुम्हाला माहित नाही? माबोचा अभ्यास वाढावा!!!!!

भारतीय पुरुष पाश्चात्य पुरुषांची बरोबरी का करतात हा मला पडलेला एक प्रश्न आहे.जेव्हापासून मला समजायला लागले आहे तेव्हापासून मी आजुबाजुला बघतो की पाश्चात्य पुरुष (पापु) ज्या गोष्टी करतात त्या केल्या की भारतीय पुरुषांना (भापु) आपले मेटल सिद्ध् केल्याचा फील येतो.
१. पापु सिगरेट पितात ,करा त्यांचे अनुकरण. मग बेफिकीरीत आपल्या भारतीयांची थोर परंपरा असलेल्या गायछाप मळायच्या सोडून सिगरेट फुकणारे भापू स्वतःला पापुंच्या बरोबरीत आणून ठेवल्याचा ' लूक ' देत असतात
२. पापु जिन्स ,टी शर्ट वापरतात .मग भापु त्यांचे अनुकरण करतात.शोभत नसेल तरीही जिन्स टीशर्ट घालून फिरणारे भापु सर्रास दिसतात. पापुला ऑल डेनिम माचो लुक देते,तसा क्वचीत भापुना असा लुक कॅरी करता येतो.पण नाही, पापु करतात ,तर आम्हीही करणार,हा अट्टाहास कशासाठी?
३. पापुरुष मोटारसायकल चालवतात ,ती त्यांना जमतेहि .पण बाजारत बैलगाड्यांची, हातगाड्यांची फौज उभी असताना या भापुनाही मोटार सायकल चालवायची असते.भले ही चालवताना फेफे उडाली तरी हरकत नाही. या पुढे जाऊन काही पाप्याचे पितर बुलेटही चालवतात ,आमच्यासारखे पामर त्यांच्यापासून जीव वाचवायला अंतर ठेऊनच गाडी चालवतात

४.स्कॉच ही खास पापुसाठी बनवलेली गोष्ट आहे,पण आजकाल भापुनी त्यात प्राविण्य मिळवले आहे ,इतके की सिंगल माल्ट मागवली की त्यात सोडा टाका ही त्यांची फर्माईश असते.

तर भापुनो जरुर पापुना कॉपी करा ,त्यात गैर काही नाही. पण ज्या गोष्टी मुदलातच आपल्यासाठी नाहीत त्याचा अट्टाहास धरु नका.कॉपी अशी करा की बघणारा बघत राहीला पाहीजे.भापुंचे एकच उदाहरण देतो, बेताल आणि मूर्ख वक्तव्ये हा पापुचा प्रांत ,पण भापुनी तिथे असे प्राविण्य मिळवले आहे की बहुतांश भापु हे मूर्ख आहेत.
उदा.:- ( किती नावे लिहू आणि किती नको असे झालंय.... असो समजून घ्याल ही अपेक्षा)

तर भापुनो , पापुना कॉपी करणे म्हणजे आपण मॉड् झालो हा कन्सेप्ट मनातून काढून टाका.तुमची स्वतःची अशी exclusive क्षेत्रे तयार करा. पापुना बेंचमार्क ठरवून भलतेच काहीतरी करण्याचा प्रकार सोडून द्या......

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता पाश्चात्य पुरुष हे भारतीय महिलांची कॉपी करतात हे कोणी सिद्ध केले तर एक वर्तुळ पुर्ण होईल.

मग मी पोल काढतो Happy

मस्त! Lol

कुठलीही गोष्ट भापुंची किंवा पापुंची मक्तेदारी असू नये . एखादा पुरुष हा भापु म्हणून जन्माला आला म्हणजे त्याने अमुक एक गोष्ट करूच नये किंवा हेच करावे असे काही नसते . हेच पापुंच्या बाबतीतही .... लेख समाजातील संकुचित विचारांचे प्रतिनिधित्व करणारा वाटला.

-- समा!

बाकी, मस्तं विडंबन अतरंगी!

महिला पुरुषांची बरोबरी करतात.
पुरुष पाश्चात्त्य पुरुषांची बरोबरी करतात.

आता

पाश्चात्त्य पुरुष महिलांची बरोबरी करतात (कुठेसे ते स्कर्ट घालून पिपाण्या वाजवितात ना?)

असा एक धागा येऊद्या म्हणजे वर्तूळ पूर्ण होईल.

निषेध या धाग्याचा!:फिदी::दिवा: कोण म्हणतं भापुना जीन्स शोभत नाही. जरा रघुराम राजनना जीन्स घालुन फिरु द्या, सगळी खानावळ, कुमार्स, हॉलीवुडचे काही हिरो जाम पुचके ठरतील. आय हाय, काय दिसतो हा माजी गव्हर्नर!

अमिताभ नंतर मला हाच आवडला ग बया!:इश्श:Raghuram-Rajan-.jpg

अय्यो,

मला तर रघुराम राजनजी साऊथच्या फिल्ममधे एण्ट्री घेताना शंभर दीडशे जणांना हवेत उडवत आणि महागड्या गाड्यांचा स्फोट करत जाळातून चलत येताहेत असं चित्र डोळ्यांसमोर आलं. लगेचच हिरविनीबरोबर डान्स आणि मग कडकडकड डायलॉग्ज !!
थ्रश्मीजी , क्या सोच है आपकी !

अंतरंगी, तुम्ही धागा काढण्यात ऋन्मेष व भास्कराचार्य यांची बरोबरी करता आहात का?
नाही ना? तुम्हाला वाटले म्हणून धागा काढलात ना? मग भापु. ना जे करावेसे वाटते तसे ते करतात, कुणाचीहि बरोबरी करण्यासाठी नाही.
भविष्यात चिनी लोकांनी भारतावर बरीच वर्षे राज्य केले तर भापु नि भास्त्रि आपोआप चिनी लोकांप्रमाणे रहातील, बरोबरी करण्यासाठी नाही, आवडते म्हणून.

आमचा सिद्धहस्त अणुभव( अणुभव चिंतणाची वेळ दुपारी १ ते ४ ) :
पा. पु. हे पु. पु. शी. कधीच बरोबरी करू शकत णाहीत.
पा. पु. हे पु. पु. शी. च काय पु. बा. शी पण बरोबरी करू शकत णाहीत.
पा. पु. च काय भा. पु हे सुद्धा पु. पु. शी. बरोबरी करू शकत णाहीत.
पा. पु. व भा. पु. चे वाहण कौशल्य जिथे संपते तिथे पु. पु. व पु. बा. चे प्रार्थमीक कौशल्य सुरु होते.
खिंड लढवूण बर्रोब्बर वेळेत १ तास उशिराणे हापिसात पोहोचणे हे येरा गबाळ्याचे काम नोहे.
वाहण चालण कौशल्य हा प्रांत फक्त पु. पु. व पु. बा. यांचाच आहे त्यांची बरोबरी करू णका.