जग हे बंदी शाळा (विडंबन)...

Submitted by atuldpatil on 19 November, 2016 - 05:05

जग हे बंदी शाळा, जग हे बंदी शाळा
बंदी घाली कोणी डान्स बारला
कोणी बंदी नोटेला
जग हे बंदी शाळा

कुणा न माहित बंदी किती ते
कुणी घातली सर्वांना स्मरते
सुटकेसला हि मन घाबरते
जो तो घाबरलेला
जग हे बंदी शाळा

ज्याची त्याला प्यार नोट ती
नोटेवरचे थोर गांधीजी
हात घालीता नोटा निघती
काळ न तो राहिला

जो तो आपल्या बँकेत जखडे
नजर न धावे एटीएम पलीकडे
काळ्या पैशातले किडे मकौडे
त्यातूनही करिती लीला

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जो तो आपल्या बँकेत जखडे
नजर न धावे एटीएम पलीकडे
काळ्या पैशातले किडे मकौडे
त्यातूनही करिती लीला

>>
पर्फेक्ट!