मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली

Submitted by पाषाणभेद on 17 November, 2016 - 00:21

मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली

सांगा तुम्ही मला कशी जावू मी आता बाजारी
सांगा तुम्ही मला कशी जावू मी आता बाजारी
या मोदी सरकारने, या तुमच्या मोदी सरकारने
या या मोदी सरकारने
पाचशे हजाराची नोट बंद केली ||धॄ||

मार्केटात आता आल्या नव्या नव्या साड्या
घेण्यासाठी आम्हा सार्‍यांच्या पडतात उड्या
लेटेस्ट फॅशन करायची आता पंचाईत झाली
मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली
या या मोदी सरकारने
पाचशे हजाराची नोट बंद केली ||१||

भाजीपाला घेण्यासाठी मी गेले मार्कॅटात
मोठ्या नोटा सोडून सार्‍या सुट्टे पैसे नव्हते हातात
दररोजच्या जेवणाचीही पहा कशी चव गेली
मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली ||२||

बँकेमध्ये नोटा बदलायला भली मोठी लाईन
लाखो रूपये भरले तर इन्कमटॅक्स फाईन
एटीएम झाले बंद पर्स माझी रिकामी केली
मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली ||३||

हे मात्र छान झाले काळा पैसा बाहेर आला
भ्रष्ट्राचार लाचखोरीचा एक मार्ग बंद झाला
ह्या उपायांनी धनदांडग्यांची दातखीळ बसली
मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली
या या मोदी सरकारने
पाचशे हजाराची नोट बंद केली ||४||

- पाषाणभेद

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<हे मात्र छान झाले काळा पैसा बाहेर आला
भ्रष्ट्राचार लाचखोरीचा एक मार्ग बंद झाला
ह्या उपायांनी धनदांडग्यांची दातखीळ बसली>

Lol स्वप्नातून जाग आली का?

हे गळू ना?
Of the Rs 15.41 lakh crore worth Rs 500 and Rs 1,000 notes in circulation on November 8, 2016, when the note ban was announced, notes worth Rs 15.31 lakh crore have been returned. This meant just Rs 10,720 crore of the junked currency did not return to the banking system

99.3% of Money Returned .

ज्यांना रिटर्न करावं लागलं आणि धन जाहीर करावं लागल्याने आयटीच्या रडारवर आले त्यांचं ठसठसलेलं गळू मायबोलीवरच्या असंख्य धाग्यांवर दिसतंय पुन्हा पुन्हा. माझं आणि माझ्यासारख्या अनेक प्रामाणिक मित्रांचं काहीच नुकसान झालं हे अगदी अभिमानाने सांगतोय. दोन नंबरच्या पैशाचं नुकसान झालेल्यांना रडायचं स्वातंत्र्य लखलाभ आहेच.

ज्यांचं नुकसान झालं तेच रडतात आणि जे रडतात त्यांचं नुकसान झाल़य हे त्या सुप्रसिद्ध स्कूलचं लॉजिक असणारच.
देशातल्या अर्थव्यवस्थेचा खेळखंडोबा झाला, असंघटित क्षेत्रातल्या बहुसंख्य उद्योजक, व्यावसायिकांच्या पोटावर पाय आला, कथित उद्दिष्टांपैकी एकही सावरत झाले नाही, याच्याशी यांना काही देणंघेणं नाही.
लोकांना काळा पैसा जाहीर करावा लागल्याने सरकारी तिजोरीत किती भर पडली ( पडली असेल तर) आणि त्याची किंमत कोणी मोजली?
कोणता निर्णय चांगला यांचा स्वत:वर काय परिणाम यावर जोडणारे self micro economist.

नोटा बदलुन घेण्यासाठी लावलेल्या रांगांमध्ये जे मेले ते प्रामाणिक करदाते होते की करबुडवे होते? काही आकडेवारी आहे का?

त्यांची आकडेवारी कशाला हवीय..? प्रामाणीक करदात्यांच्या थडग्यावर बसुन नीरव मोदी, अमित जै, अनिल अंबानी, मेहुल चोक्सी, बाबा रामदेव यांच्यासहीत कैक भाजपेयांच्या कंपन्यांची हजारो कोटींची कर्जे वेव ऑफ करुन दिलीत... आपण बसुया किती काळा पैसा आला अन किती पांढरा झाला याचा हिशोब लावीत Proud

सर्वसामान्य माणूसही करबुडवा असू शकतो. रस्त्यावरचे भिकारी, गायींना चारा देण्याचा व्यवसाय करणारे, दहा ठिकाणी धुणी भांडी चपात्या/ पोळ्या/स्वयंपाक करून देणाऱ्या बायका, रद्दीवाले, भंगार वाले, ओला उबर चालवणारे, रस्त्यावरचे भाजीविक्रेते, असे अनेक जण महिन्याला चाळीस पन्नास हजार + कमावतात. पण मुंबई सारख्या ठिकाणी त्यात एक चांगली खोली/ घर घेता येत नाही. झोपडीतल्या खोलीचे भाडेही पाच ते दहा हजार असते. कामवाल्या बायका आपले पैसे जास्त व्याजाने त्यांच्यातल्याच गरजूंना देतात. अनेकदा काही बहाणे करून स्वतः काम करीत असलेल्या घरी बिनव्याजी उचल घेऊन ते पैसे व्याजाने लावतात. गरीबच असतात. औषध पाणी व्यवस्थित करू शकत नाहीत. सुनालेकींची बाळंतपणे म्युनिसिपालिटीच्या दवाखान्यात करतात.
रात्रपाळी करणाऱ्या उबर वाल्यांकडून नेहमी ऐकायला मिळते की ये आय टी वालोंसे हमारा धंधा अच्छा. ( ते अर्थात weeD आणि दारूवर पैसा उधळणाऱ्या रात्र गिऱ्हाईकान्ना उद्देशून असते)