काढल्यावर वेळ मी माझा म्हणू का

Submitted by जयदीप. on 16 November, 2016 - 12:39

काढल्यावर वेळ मी माझा म्हणू का
जायचे होते मला लवकर, निघू का

गाडला आहेस का माझा विषय तू
माहिती आहे मला जागा, खणू का

एक खोली खूप वर्षे बंद अहे
आत तू आहेस की नाही... बघू का?

केवढी जादू उथळ पाण्यात आहे
बोंबलत आहेस तू आपण बुडू का?

या विचारातून ये बाहेर लवकर
गाठल्यानंतर शिखर उतरू शकू का

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users