सुकवलेल्या माशांची पाककृती हव्या आहेत..

Submitted by कैवल्यसिंह on 3 November, 2016 - 05:57

मला सुकवलेल्या माशांची रेसिपी हवी आहे जसे की सुकवलेले बांगडे, सुकवलेले बोंबील, सुकवलेले सुरमई, सुकललेले सोडे, सुकवलेले जवळा (सुकट) व ईतर आनेक सुकवलेले मासे...
ह्यांची पाककृती हव्या आहेत.

सुकवलेले मासे कसे साफ करावेत.. व त्याचा खारटपणा कमी करण्यासाठी काय काय करावे व मऊ शिजण्यासाठी काय काय करावे ते सुध्दा सांगा...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://www.maayboli.com/node/52789

एनसायक्लोपेडिया जागूताईया!

सुक्या माशांविषयी मनोरंजक माहिती आणि रेसिप्या पण मिळतील.
एंजॉय!

सुकवलेले सगळेच मासे खारट नसतात. जवला, करंदी, बोंबिल वैगेरे.
जवळा - निवडुन घ्यायचा. (कधी इतर समुद्रातले छोटुसे प्राणी पण असतात. आणि सुकवताना आलेली माती दगड) करंदी - डोकी आणि शेपटी काढुन घ्यायचे
बोंबिल - डोकी आणि शेपटी काढुन बोटभर लांबीचे तुकडे

कृती: वरीलपैकी जे करायच आहे ते निवडुन तव्यावर जरा भाजुन घ्यायचे आणि पाण्यात टाकायचे. भरपुर कांदा बारीक कापुन (दोन मुठी जवळा असेल तर ४ -५ मिडीयम कांदे) तेलावर परतायचा त्यात २ मिडीयम टमाटर बारीक कापुन, कडीपत्ता, दोन तीन हिरव्या मिरच्या मधे चिर देउन घालयच्या. तेलात प्रॉपर शिजेपर्यांत परतायचं. मधे पाण्यातला जवळा (किंवा जे काही असेल ते) धुवुन पिळुन बाजुला ठेवायचं. मग कां ट मधे हळद+लाल तिखट्+मीठ घालुन हलवायच. जवळा अ‍ॅड करायचा मिक्क्ष करुन हव असल्यास थोड्ड्स पाणी सोडायच. झाकण थेउन कमी गॅसवर एकजीव होउ द्यायचं. मधे हलवायच. गॅस बंद करताना थोडी कोथिंबीर घालावी.

१.सोडे, करंदी थोड्या गरम पाण्यात भिजत घावे.त्यानंतर एका भांड्यात कांद्याची फोडणी देऊन तसेच अजून थोडा कांदा तेलावर टाकून शिजवावा.त्यात हळद घालून मग सोडे,करंदी घालावी.ते सर्व शिजेपर्यंत्,ओले खोबरे, कांदा, धणे, लाल मिरची(तिखट),चिंच घालून गुळ्गुळीत वाटण करून घ्यावे,सोडे, करंदी शिजल्यानंतर त्यात मीठ घालावे,एक उकळी आल्यावर त्यात वाटण घालावे.

२.सुका बांगडा(विस्तवावर),करंदी,जवळा तव्यावर भाजुन घ्यायचे. नंतर नीट चुरडायचा.त्यात बारीक चिरलेला कांदा,मीठ, ओले खोबरे, तिखट घालायचे.शेवटी कच्च्या खोबरेल तेलाची धार सोडायची. ही कोशिंबीर होय.यात एक खळगा करून त्यात पेटता निखारा घालून त्यावर तेलाची धार सोडून्भांड्याने झाकून ठेवणे.

३.बोंबीलाचे २ इंचाचे तुकडे करुन तव्यावर भाजून पाण्यात घालावे.इथे भांड्यात तेलावर लसणाची फोडणी देऊन कांदा घालावा.कांदा मऊ झाला की बटाटे, बोंबील घालावे व शिजवून घ्यावे नंतर त्यात ओले खोबरे, कोथिंबीर्,कोकम घालून ढवळावे.साधारण दबदबीत असू द्यावे.

बाकी नीट कसे करायचे हे वर सांगितलेले आहेच.

सोडे, करंदी वापरुन खिचडी:

तांदुळ धुवुन निथळत ठेवा. तुपावर तमालपत्र, लवंग, मिरे, दालचिनी घालुन, तांदुळ परतुन घ्या.

मोठ्या पातेल्यात तेलावर भरपुर कांदा आणी सोडे किंवा करंदी जे काही वापरता आहात ते परतुन घ्या. त्यात हिंग, आले मिरची लसुण कोथिंबिरीचे वाटण घाला. हळद, लाल तिखट घालुन परता. पाच मिनिटांनी तांदुळ घाला. हलक्या हाताने मिक्स करा. नारळाचे दुध, चिंचेचा कोळ आणी तांदुळ शिजण्यापुरते पाणी व मीठ घाला. शिजत आहेसं वाट्ल्यावर गरम मसाला घाला. हलवुन परत झाकण ठेवा. शिजल्यावर कोथिंबीर भुरभुरा आणी नारळाच्या दुधाबरोबर स्वाद घ्या.