एक कळी उमलताना...

Submitted by अ'निरु'द्ध on 2 November, 2016 - 09:10

एक कळी उमलतानां..... :
घराच्या बाल्कनीत झाडं लावताना ती देशी असावीत किंवा निदान इथे रूळलेली असावीत अशी इच्छा होती.
कारण ही घरची बाग पक्षी, फुलपाखरं, विविध प्रकारच्या माश्या, किटक यांना आकर्षित करणारी, त्यांना काहीतरी देणारी असावी अशी संकल्पना होती.
फुलपाखरं, छोटे पक्षी आणि मुंग्यांना आकर्षित करणारं झाड म्हणून पावडर पफ लावलं.
3 फुटाची फांदी होती. एकही कळी नव्हती.
पहिल्या 15, 20 दिवसात तर त्याला कुठेही पालवी पण नाही फुटली. रुजल्याचं एकही लक्षण दिसत नव्हत.
हळुहळु मुख्य खोड सोडून बाकीच्या फांद्याना पालवी फुटु लागली. आणि त्यानंतर महिन्याभरानी चक्क एक इवलुशी कळी नवीन फुटलेल्या फांदीवर दिसली. दिसामाजी तिचा आकार वाढु लागला. तिच्या मागेमागे आणि आजूबाजूला छोट्या छोट्या जोडीदारीणीही दिसु लागल्या.

01 पहिली कळी....

मग तिची रोज खबरबात ठेवणं हा अॅडिशनल कामधंदा होउन बसला...

02... कळी उमलायची सुरूवात...

03... अजुन थोडी उमलतानां...

04... थोडी आणखी उमललेली...

05... ही दुसरी कळी.. काही दिवसांनंतर... पण हिच्या उमलण्याची तर्‍हा निराळी...

06... पहिली कळी अजून उमललेली.. गुलाब कळ्यांच्या गुच्छाची आठवण करून देणारी... सोबत छोट्या मैत्रीणी..

07.... गुलाब पुष्पांचा गुच्छ...

08... गुच्छाची घडी हळूहळू विस्कटायला लागलेली...
द्वाड मुलाच्या विस्कटलेल्या केसांसारखी..
आता पावडर पफ होण्याकडे वाटचाल...

प्रचि ०८.५ हा रात्री काढ्लेला.... (मधली अवस्था)
(हा फोटो पुर्वी टाकला नव्हता. नंतर प्रतिसादामधे दिला होता. आता वाचकांच्या सूचनेनुसार वरती डकवतोय...)

2015112 Crop.jpg>

09.... पूर्ण विकसित पावडर पफ..

आता झाड कळ्या फुलांनी बहरून गेलंय. कळ्या असल्यापासून मुंग्यांची लगबग आहे..
आणि गेल्या तीन चार दिवसापासून सनबर्डही फेर्‍या मारतायत.... Happy Happy

मायबोली :निसर्गाच्या गप्पा यावर पुर्वप्रकाशित...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह ! उमलणं खुप सुंदर कॅच केलयं.
पहिले २ फोटो आणि वर्णन रिपिट झालयं तेवढं दुरुस्त करणार का ?

क्या बात है!!

08... गुच्छाची घडी हळूहळू विस्कटायला लागलेली...
द्वाड मुलाच्या विस्कटलेल्या केसांसारखी..>>>>सुपर्ब! Happy

07.... गुलाब पुष्पांचा गुच्छ >>> फारच सुंदर दिसताहेत.

09.... पूर्ण विकसित पावडर पफ..>>> पण त्यांची अवस्था शेवटी अशी होते का?

@ सचिन काळे
<<<09.... पूर्ण विकसित पावडर पफ..>>> पण त्यांची अवस्था शेवटी अशी होते का?>>>

हो. कारण शेवटी सरळ होणारा केसांसारखा भाग सुरवातीला संपूर्ण पणे गुंडाळलेल्या स्थितीत असतो आणि तो टप्प्याटप्प्याने उलगडत जातो..
प्रचि 09 ही फुलाची पूर्णावस्था आहे...
त्यानंतर फुल कोमेजायला लागते...

@ अदिति...

<<<८ , ९ मधे अजुन १/२ फोटो हवे होते>>>

बरोबर आहे. पण स्थिती 08 संध्याकाळी होती आणि 09 दुसर्‍या दिवशी सकाळी....
मधली एक स्थिती Flash मारुन टिपलीय पण तो प्रचि नीट नाही आलाय...

भारी आहे. पावडर पफ झाडाकडे बरेचसे सनबर्ड व कोकण साईडला व्हर्नल हॅंगींग पॅरट आकर्षीत होतात. Happy

Loten's Sunbird Female लोटेनचा शिंजीर

Vernal Hanging Parrot पिचु पोपट.

शेवटी सरळ होणारा केसांसारखा भाग सुरवातीला संपूर्ण पणे गुंडाळलेल्या स्थितीत असतो आणि तो टप्प्याटप्प्याने उलगडत जातो..>>> Wow !!! लई भारी!!!

घराच्या बाल्कनीत झाडं लावताना ती देशी असावीत किंवा निदान इथे रूळलेली असावीत अशी इच्छा होती.>>> या झाडाचे देशी नांव कळू शकेल का?

पावडर पफ किंवा Red Powder Puff हे Common Name आहे.
Calliandra emarginata हे बाॅटॅनिकल नेम..
प्रचि मधले झुडूप Dwarf व्हरायटी आहे.. भारत, मादागास्कर, मेक्सिको आणि दक्षिण अमेरिकेतील Sub Tropical भागातील स्थानिक (Native) व्हरायटी आहे..

खूपच सुंदर!
१ ते ७ मध्ये त्या अनेक कळ्या वाटत आहेत. मग सगळ्यांच एकच फूल. मज्जाच आहे. निसर्गाची किमया अगाध आहे.

गुच्छाची घडी हळूहळू विस्कटायला लागलेली...
द्वाड मुलाच्या विस्कटलेल्या केसांसारखी..>>>>>>...मस्त वर्णन.

कां.पो.>>>>.सुंदर फोटो.

मस्त !

निरू, खुप सुरेख लिहिलंत आणि फोटोही खुप सुरेख आहेत. गुलाबाच्या गुच्छा च्या अवतारातले फोटो तर खुप भारी दिसताहेत. आवडले.

Pages