आली माझ्या घरी ही दिवाळी

Submitted by विनार्च on 2 November, 2016 - 05:37

न्या 'कर्ती' झाल्या पासून मला दिवाळीत अत्यंत महत्वाच डिपार्टमेंट मिळालं आहे Wink
रांगोळी काढून झाली , कंदील करून झाला की पसारा आवरणे, मधेमधे लुडबूड करून फोटो काढणे ...रंगोळीवर सक्त पहारा ठेवणे, यात मुख्य काम रांगोळीला न्या कडून वाचवणे ...बाकी चिल्ली पिल्ली इतकी खतरनाक न्हायती Proud ...रांगोळी च्या रंगात रंगलेल्या न्या ला 'धुवून' ( i wish तुमच्या मनात जो अर्थ आलाय तो असता Happy )ओळखण्या लायक बनवणे Happy

माझ्या कामाचा पाढा वाचावा तेवढा कमीच .... सो आपण मुख्य विषयाकडे वळूया...
ह्या आम्ही रंगवलेल्या पणत्या

20161027_205132.jpg20161028_181346.jpg

हा न्या चा कंदील, हा आज्जीच्या घरी लागलाय... आमच्या घरचा वेगळा आहे पण त्याला बाबा चा हात लागल्याने तो इथे टाकणं, न्या तत्वात बसत न्हाय

2016-10-29 12.28.48.jpg

ही आमची पहिली रांगोळी , हात साफ केलाय ते दिसतंय म्हणा

20161028_160653.jpg

हा आमचा नवीन नाद मग त्याला रांगोळीत सुद्धा उतरवणारच

20161026_210907.jpg

हा मास्टरपीस ...असं लोक म्हणतात हो ..आम्ही तर ह्यावरून, दोनदा आजी सोबत कबडी,पकडापकडी खेळून झालोय lol आता माझ्या वरच्या ("न्या पासून वाचवणे" ) वाक्याचा अर्थ लागला असेलच

IMG_20161029_165118.jpg

ह्या रांगोळीने आम्हाला पेशन्सचे धडे गिरवायला लावले , आम्ही बी लई चेंगट ....सोडलं न्हाय त्या रांगोळीला

IMG_20161031_222813.jpgIMG_20161031_222859.jpg

हा आमचा बागडायचा हक्काचा प्रांत ...अर्ध्या पावून तासात काम तमाम

IMG_20161101_171623.jpgIMG_20161101_171544.jpg

(ह्या रांगोळ्या फोटो पेक्षा प्रत्यक्षात अजून सुंदर दिसत होत्या ..मी फक्त फ्रेम ऍड केल्या आहेत बाकी कोणते ही इफेक्ट दिले नाहीत )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद __/\__
न्या म्हणजे अनन्या का ?>>>>> हो , अनन्या चा शॉर्टफॉर्म, मैत्रिणीने केला नी अनन्या ला ही आवडला ☺

मस्तं हो न्या!

अगदी खरंच 'सप्तरंगात न्हाऊन आली, आली माझ्या घरी ही दिवाळी' हे सार्थ ठरवलंस!

कौतुक करायला शब्द अपुरे आहेत.

मस्तच ग. लेक भल्तीच हुशार आहे ! खुप कौतुक तिचं आणि तु़झ पण!
हिरवी फोल्डींग ची रांगोळी भारी एकदम.!
पण्त्या आणि कंदील ही छान..!