"भाऊबीज"

Submitted by कविता९८ on 31 October, 2016 - 10:24

"भाऊबीज"

"अक्षु हे बघ सुमीतने घेतले मला हे कानातले , मस्त आहेत ना?"
कावेरी अक्षताला ते कानातले झुमके दाखवत विचारत होती.
कावेरीने विचारलेल्या त्या प्रश्नाचे उत्तर अक्षताने "हमम" या एकाच शब्दात दिले.
अख्या ऑफिसला अक्षुचा हा शांत पणा माहीत होता.
अक्षता जॉइन झाल्यावर आधी सतत बडबड करायची पण गेल्या एक वर्षात ती खूप चेंज झाली होती.
आणि सर्वांना ते माहीत झालेल.
आज ऑफिसमधुन घरी यायला अक्षताला उशीर झाला.
दिवाळीच्या पहिल्या पहाटे कार्यक्रम आयोजित केल्यामुळे सर्व ऑफिसला आलेले.

"झालं आजपासून दिवाळी..
कॉलनी मध्ये प्रत्येकाच्या घरातून फराळाचा खमंग वास येतो..
आकाशकंदिल , पणत्या , फटाके , नवीन कपडे...
सर्व मजा करतात..
आज जर "तो" माझ्यासोबत असता तर मी पण दिवाळी साजरी केली असती..
पण "तो" तर गेला..
मला एकटीला सोडून..
जवळपास 3 महिने होत आले.. एक कॉल सुध्दा केला नाही त्याने..
एक वर्ष होऊन गेलं.
तो गेल्यापासुन कोणताच सण साजरा करायची इच्छा राहिली नाही..
त्याला येत असेल का माझी आठवण.."
हे सर्व विचार करता करता अक्षता घरी पोहचली..

दिवाळीच्या दिवसांत प्रत्येक घरापुढे रांगोळी सजत होती..
पणत्या तेवत होत्या..
आकाशकंदिल दिमाखात उभे होते..
घराघरात फराळाचा फडशा पाडला जात होता...
पण अक्षताने ना रांगोळी काढली..
ना आकाशकंदील लावला..
बाकी सर्व घरात एक चैतन्य सळसळत असताना तिचं घर मात्र उदास होतं..
घर खायला उठत होत.
शेवटी ती उठून किचनमध्ये गेली.
स्वतः साठी चहा बनवला आणि चहाचा कप हातात घेऊन बाहेर उभी राहिली.
खाली सोसायटी मधील चिल्लर पार्टी फटाके फोडत होती.

"दादू ,तू ये ना सोबत..
मला भीती वाटते रे लवंगी माळ लावायची!"
एक आवाज तिने ऐकला आणि तिची तंद्री भंगली..
खाली फटाके फोड़णारी बरीच मुलं होती त्यामुळे नेमकं कोण बोललं असावं तिला अंदाज येत नव्हता.. तेवढ्यात तिला ते दोघं बहिण भाऊ दिसले!

"अगं अक्षु,
तू एकटीने ती माळ लावालीस तर मी तुला एक गम्मत देइन..
आणि मी आहे ना सोबत.
तुला काही होऊ देणार नाही मी." दादा समजावत होता.
थोड्या वेळाने तिने धीर एकवटून माळ लावली आणि दादाकडे धाव घेतली.
जेमतेम ७ वर्षांची ती आणि ९ वर्षांचा तिचा दादा.
आता त्या दादाच्या चेहऱ्यावर केवढं मोठं काम केलं,असे भाव पसरले होते!
तिने गम्मत दे म्हटल्यावर त्याने एक इकलेयर चॉकलेट तिला दिले.
" माझ्या मित्राने दिले होते..
पण तू खा."
तो कौतुकाने म्हणाला.

"पण दादा,हे आपल्या दोघांना आवडतं..
आणि आपण नेहमीच अर्ध अर्धवाटुन घेतो ना.. तसच हे खायच!"

एवढस ते चॉकलेट त्यांनी अर्ध अर्ध खाल्ल.
तेवढ्यात एक फटाका तिच्या अगदी पायाजवळ फुटला..

"दादुss"अशी किंचाळून ती दादाला बिलगली..
बाल्कनीत उभी असलेल्या अक्षुच्या तोंडूनही एक अस्फुट किंकाळी आली..
डोळे पाणावले..
तिने पुन्हा बाहेर पाहिले.. कुठे गेली ती दोघं??खाली आता कोणीच फटाके फोड़त नव्हते..
मग आत्ता तिने पाहिली होती ती भावा बहिणीची जोड़ी गेली कुठे??
भास..
भास??की आठवण??
ती स्वतःच डोक गच्च पकडून खाली बसली.. बराच वेळ प्रयत्नपूर्वक थांबवलेले विचार आता अचानकच असे विचित्रपद्धतीने आता स्वतःची वाट मोकळी करत होते..!!

कुठे आहे तिचा दादा??
तो का आला नाही??त्याला दिवाळीमध्ये तरी बहिणीला भेटावंस वाटलं असेल!
मग का आला नाही तो??
इथे भारतातच तर राहतो तो!
गेल्या वर्षी भाऊबीजला येऊन गेला..

तिचा भाऊ फटाके फोड़त असतो अधूनमधून..
इथे नाही..
आपल्याच देशात.. पण दूर.. आपल्या देशाच्या सीमेवर!आपला दादा देशाचे रक्षण करतो आहे याचा तिला कोण अभिमान!!
पण,जेव्हा त्यांच्या घरी त्याची गरज असते तेव्हा??
वडिलांनंतर तोच तर आहे आता घराचे रक्षण करणारा!
ती शिकून आपल्या पायावर उभी आहे. घर सांभाळते. पैशांची कमतरता नाही घरी..
दादाच्या कामाचे स्वरुपही तिला माहित आहे.. पण कधीकधी आठवणी आणि भावना यांच्यावर तिचे नियंत्रण ढासळतं आणि कोंडून ठेवलेल्या त्या आठवणींनी ती घुसमटते..
तिने डोळे पुसले आणि आतल्या खोलीमध्ये आली. आज घरभर निराशेचा अंधार होता.
दादाच्या आठवणींने तिच्या डोळ्यात पाणी आलं.
पण यावेळी मात्र तिने मनातच काहीतरी ठरवलं.
ती रुम मधल्या कपाटाजवळ गेली .
गेल्या वर्षी दादासोबत खरेदी करताना घेतलेल्या पणत्या तिने बाहेर काढल्या.
घर जरा स्वच्छ करून तिने लाईट लावली .
तिने त्या पणत्या बाहेर लावल्या.
तिच्या चेहर्यावर आता नैराश्य नव्हतं.
पुढच्याच दिवशी तिने मिठाई विकत आणल्या आणि कॉलनीच्या बच्चे कंपनीला वाटल्या.
तिच्या चेहऱ्यावर आता एक वेगळचं समाधान होत.
भाऊ लांब असूनपण त्याच्यावर असलेल्या प्रेम, अभिमान अशा संमिश्र भावनांनी तिने दिवाळी साजरी केली.
भाऊबीजच्या दिवशी तिच्या भावाने तिला कॉल केला त्याच्या सोबत बोलून तिला जो आनंद मिळाला ते तिच्या साठी भाऊबीजचं सर्वात चांगल गिफ्ट होतं.

- कविता नाईक(कऊ)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mast

छान

mast.