रात्र ही वेडावली जेव्हा आठवण तूझी आली

Submitted by निखिल झिंगाडे on 31 October, 2016 - 07:22

भुललेल्या मनाला एक मृगजळी स्वप्न पडले
रात्र ही वेडावली जेव्हा आठवण तूझी आली

विरहाच्या इंगळ्यानी डसले मनही माझे
स्पर्शानेही आठवणींच्या पेटल्या मशाली

रडलो मी जेव्हा अश्रूसुध्दा परके झालेले
मनही मग मागतय फक्त तुझीच खुशाली

रात्र रात्र जागतो मी वेड्यासारखा वागतो
विरघळतो आठवणीत मग सरते रात्र काली

ठरवलय मी आता कायम एकटाच रहाणार
विसर शक्य नाही जरी तू आता परकी झाली

Group content visibility: 
Public - accessible to all site users