खरच सांगतोय

Submitted by निखिल झिंगाडे on 26 October, 2016 - 03:10

जगता येईल अस द्या शिक्षण खरच सांगतोय
बदला अभ्यास फुटकळ क्लास खरच सांगतोय

ना साधू झालात नाही संत चालेल खरच सांगतोय
माणूस व्हा घ्या माणूसकीचा ध्यास खरच सांगतोय

कसे जगलात का जगलात महत्वाची ही बात
काही शिकवतो प्रत्येक श्वास खरच सांगतोय

काच दिव्याची स्वच्छ, पण असावी ज्योतही त्यात
स्वप्न पाहिले, होईल खरे एकच आस खरच सांगतोय

जलबिंदूला अधःपात हा नभातून मोती होण्यास
धरू कष्टाची कास होउ या पास खरच सांगतोय

जिंकणे कळणे नाही हरल्यापरी खरच सांगतोय
निसर्ग नियम हा 'अनामिक' खास खरच सांगतोय

अनामिक

Group content visibility: 
Public - accessible to all site users