एक व्हावा मुक्ततेचा सोहळाा ...

Submitted by बाळ पाटील on 25 October, 2016 - 03:36

एक व्हावा मुक्ततेचा सोहळा
मीच माझा आवळावा हा गळा

ही मधाची चव तुरट का लागते
की तिने नुकताच खाल्ला आवळा

नेमक्या वर्मावरी बघ बोट ते
वाटला नाही तसा तो आंधळा

सोबती आयुष्यभर बगळेच की
शेवटी नाराज झाला कावळा

एक क्षण यावा असाही वाटतो
श्वास एखादा असावा मोकळा
_ बाळ पाटील

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाटिलजी,शेवटचे तीनही शेर छान झाले आहेत!

मतला त्याहिशोबी फारच तीव्रतेने निगेटिव्ह वाटतो आहे.(वै.म.)

आवळ्याचा शेर मिश्किल धाटणीचा असला तरीही,'त्या' मधाची चव तुरट लागण्याचे 'समर्पक' कारण आपल्यासारख्या गझलकाराकडून अपेक्षित आहे! शुभेच्छा!

अवांतर—प्रतिसाद कुठेही मोकाट स्वरुपाचे वाटले तर कळवत चला कृपया!मी मोह आवरता घेण्याचा यत्न करेल नक्की!

धन्यवाद सत्यजितजी!मतलाnegative असला तरी त्याचा थेट अनुबंध मक्त्याशी आहे जेथे optimism आहे.

छान