तुला माफ का करावे

Submitted by निखिल झिंगाडे on 23 October, 2016 - 15:35

एकटा जगण्यात वेगळीच मस्त मजा आहे
सुख नसले आयुष्यात तरी दुखः वजा करावे

खोटे खोटे हसावे खुश तूला करावे
मनात रडत कसे माफ मी तूला करावे

हसवुन तुला कसे दुःख सर्व मी विसरावे
हरवुुन मलाच कसे माफ मी तूला करावे

आपले नाते फक्त नावापुरतेच रहावे
तूच सांगना आज कसे माफ मी तूला करावे

माझही एक मन आहे 'अनामिका' तूला कळावे
अशक्य असूनी वाटते आता माफ मी करावे

Group content visibility: 
Public - accessible to all site users