तु असलेल्या... नजरेत माझ्या....

Submitted by बग्स बनी on 22 October, 2016 - 15:41

पंख नाहीत पण उडल्याचा भास होतो, तुला मिठीत घेताना...
मंद-धुंद होतो वाऱ्याच्या सुवासात,  तुझा आणि फक्त तुझा होताना...

गोड-गुलाबी ओठांच्या मऊ-मखमली सांजेतुन, स्पर्श तुझा होताना...
बिजलीच्या रोमांचक तिखट चटक्याने मोहरतो, डोळ्यांत तुझ्या पाहतांना...

रेशमी काळ्या सागरात बुडून जातो, केसांत तुझ्या गुंतताना...
गर्द चांदण्यात शुभ्र होतो, खळीदार तुझ्या गालांवरून ओघळतांना...

नाजुक पारदर्शी काचेरी होऊन जातो, पापण्यांत तुझ्या खेळतांना...
इंद्रधनुच्या सप्तरंगात न्हाऊन निघतो, हात तुझा माझ्या हातात घेतांना...

सोनेरी चंदेरी मोती होऊन जातो, मानेवर तुझ्या बरसताना...
मोरपिसाचा शहारलेला काटा होतो, कमरेवरून तुझ्या घसरताना...

गर्ततेच्या आठवणींचा भास होऊन जातो, स्वप्नांत तुझ्या रमताना...
लपाछपीच्या डावांत हरतो, तुझ्या ओठांच्या गोड हास्यातुन चमकताना...

पहील्या पावसाचा तहानलेला थेंब होतो, चेहऱ्यावर तुझ्या झेलताना...
भर उन्हात भिजुन जातो, निरागसतेच्या तुझ्या कटाक्षात घायाळ होताना... 

कापरा थरथरलेला शिवार होतो, लाज तुझी पांघरताना...
आसुसलेल्या वाळवंटात तृप्त होतो, आवाज तुझा ऐकताना...

हिरमुसलेल्या गुलाबाचा रंग होतो, वाट तुझी बघताना...
अंथरलेल्या चांदण्यांची पहाट होतो, नजरेत तुझ्या भरताना...

खोल शितल स्तब्ध वाहतो, तुझ्या मध्ये झरझरताना...
उंच घनदाट बेभान होतो, तुझ्या मध्येच तुला शोधताना...

निशब्द कोरा अस्वस्थ होतो, तुझ्याबद्दल लिहीताना...
पंख नाहीत पण उडल्याचा भास होतो, मिठीत तुला घेताना... मिठीत तुला घेताना......

.
.
.
.
.
.

नमस्कार मित्र आणि मैत्रिणिंनो नुकताच मी आपल्या या परीवारात सहभागी झालो आहे, मला आपल्यांसोबत सामिल करून घेतल्याबद्दल खुप आभार, शिवाय नवीनच असल्यामुळे काही चुक झाल्यास संभाळुन घ्या ही विनंती. ही माझी पहीलीच पोस्ट असल्याने थोडासा न्हर्वव्स आहे.....कृपया असंच प्रेम राहु द्या !!! खरंतर या कवितेसाठी मला खास असं शिर्षक सुचलं नाही. तुम्हाला सुचत असल्यास प्लिज मदत करा.

तुमचा लाडका,
बग्स बनी (ASY)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान...

छान.

नजरेत माझ्या...हे आहे ना???......>>>मला स्वतःला सॅटीस्फॅक्शन नाही होत आहे. एक वेगळाच टच हवा आहे, मला त्या वेळी काहीच सुचलं नाही म्हणुन हे शिर्षक दिलं. सध्या ही सुचत नाहीये म्हणुन.....

कविता आणि शिर्षक दोन्ही छान ....**नजरेत तुझ्या भरताना** हे शिर्षक पण चालू शकेल....पण हे माझं मत झालं...कवीला स्वतःला काय वाटत तेच शिर्षक नेहमी योग्य असतं....Welcome to the maayboli grp n All the Best

कविता आणि शिर्षक दोन्ही छान ....**नजरेत तुझ्या भरताना** हे शिर्षक पण चालू शकेल....पण हे माझं मत झालं...कवीला स्वतःला काय वाटत तेच शिर्षक नेहमी योग्य असतं....Welcome to the maayboli grp n All the Best>>>>> धन्यवाद मीनलजी.... सुंदर शिर्षक.... सुचवलंत....मनापासुन धन्यवाद...!!!