Submitted by बाळ पाटील on 22 October, 2016 - 05:13
बांधू पुन्हा नव्याने घरटे खुशाल आता
स्वप्नात काय येती मोठे महाल आता
पणती विझून गेली भेदीत यातनांना
दारात काळजाची ठेवू मशाल आता
हासून घे जरासे दडवून रोष सारा
या मृगजळी सूखाचा लावू निकाल आता
रीतीरिवाज पाळू ,आलो तसेच जावू
आयुष्य वेदनेला करुनीे बहाल आता
ही सामसूम आहे नांदी इथे कशाची
निमिषात वादळेही करतील चाल आता
कळली तुला मलाही नाही अखेर क्रांती
सांडून रक्त थोडे उधळू गुलाल आता
_बाळ पाटील
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उत्कृष्ट गझल ! अतिशय छान
उत्कृष्ट गझल ! अतिशय छान आशय....
छान. सुंदर
छान. सुंदर
वाह् वाह् व्वा...एकेक शेर
वाह् वाह् व्वा...एकेक शेर लाजवाब!
अभिनंदन बाळ पाटिलजी!
शार्दुलजी,अनिलजी,सत्यजितजी
शार्दुलजी,अनिलजी,सत्यजितजी धन्यवाद !!