Submitted by सत्यजित... on 20 October, 2016 - 19:13
गुदमरावे प्राण अवघे,श्वास इतका कोंडण्याची...
होय!मी केली तयारी,वादळांना फुंकण्याची!
काय मी केला गुन्हा की सोडले मी मौन माझे...
पेटल्या वणव्यास मागा कारणे मी चेतण्याची!
आर्त किंकाळीस जेंव्हा वेदनांची साद येते...
शर्थ होते थबकलेल्या जाणिवांना रेटण्याची!
बोट का छाटू नये ते,या गुलाबाच्या कळ्यांनी...
ज्या नखावर खूण नाही,एक काटा टोचण्याची!
लाख सजवा वेस तुमची,लक्तरे टांगून माझी...
हीच तर सुरुवात आहे,मी दिशांना लांघण्याची!
—सत्यजित
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान !!
छान !!
धन्यवाद कावेरीजी!
धन्यवाद कावेरीजी!
वाह, फार भारी लिहिता बुवा
वाह, फार भारी लिहिता बुवा तुम्ही !
धन्यवाद महेशजी!
धन्यवाद महेशजी!