या छोट्या छोट्या अपमानांचे काय करावे? http://www.maayboli.com/node/60577 .. या धाग्यावरून माझ्या आयुष्यात घडलेला हा किस्सा आठवला. पोस्ट मोठी झाली म्हणून नाही, तर छोटे अपमान आणि मोठा अपमान यांची सरमिसळ होऊ नये म्हणून वेगळा धागा काढला आहे 
गोष्ट तशी जुनी आहे बरीच. पण स्मरणातून काही केल्या जात नाही.
तेव्हाही माझी एक गर्लफ्रेंड होती. आताची वेगळी. तेव्हाची वेगळी. गफलत नको! मुद्दाम हे सांगितले कारण ते एक गंडलेले रिलेशन होते.
म्हणजे ती मला ईतकी आवडायची की तिला जे आवडेल तसा मी वागायला बघायचो. पोशाख, पेहराव, अगदी लूकही तिला जसा हवा तसा ठेवायला बघायचो. भले मी त्यात माझ्या कम्फर्ट झोनमध्ये नसलो तरीही.
उदाहरणार्थ, शर्टाचे सर्वात वरचे, म्हणजे कॉलरच्या जवळचे बटण लावणे. एकतर रोज आंघोळ करणे आणि आंघोळ झाल्यावर केसांना तेल चापडत चोपडत धारदार कंगव्याने ते विंचरणे. शून्य पॉईंट शून्य एक मिलीमीटरच्या वर दाढी वाढताच तिला पुन्हा गालाच्या आत ढकलणे. असे कैक हास्यास्पद प्रकार मी सो कॉलड प्रेमाच्या नावावर ‘त्याग हेच खरे प्रेम‘ आणि “तिची मर्जी तीच आपली खुशी’ अस्से यमक वगैरे न जुळणारे डायलॉग मारत करायचो.
तर एकदा असेच तिच्या एका मैत्रीणीच्या बहिणीचे, कि बहिणीच्या मैत्रीणीचे लग्न होते. माझ्या गर्लफ्रेंडला आग्रहाचे आमंत्रण होते. पण तिच्या फारसे कोणी ओळखीचे नसल्याने तिने आग्रहाने मला सोबत यायला सांगितले होते. लग्नाचा हॉल तिच्या आणि माझ्या घराच्या बरोबर मध्ये असल्याने, आणि आम्ही दोघे दोन विरुद्ध दिशेने येणार असल्याने थेट हॉलवरच भेटायचे असे ठरवले होते. मी नेहमीसारखा वेळेच्या अर्धा तास आधी तिला आवडणारा चंपक बनून आलो होतो. पण तिचा तासभर कुठेच पत्ता नव्हता. फोन केल्यावर समजले की तिचा साडी घालायचा बेत होता आणि ते तिच्या सवयीचे नसल्याने तिला उशीर होणार होता. मी एवढा वेळ बाहेरच काय थांबायचे म्हणून हॉलच्या आत जाऊन बसूया म्हटले. आत जाऊन पाहिले तर समजले की मुंबईतल्या सगळ्याच मुलींना साडी घालणे सवयीचे नसावे. कारण काही उडाणटप्पू टाळक्यांशिवाय हॉलमध्ये महिलावर्गाच्या नावावर एकही चिटपाखरू दिसत नव्हते.
मग मी एक फॅन (शाहरूखचा नाही हं, तर हवा देणारा फॅन) आणि एक खुर्ची पकडून स्थानापन्न झालो. नव्यानेच घेतलेला मोबाईल काढला. वॉलपेपरवर लावलेला गर्लफ्रेंडचा फोटो एकवार न्याहाळून नेहमीच्या मनोरंजनाला लागलो. म्हणजे आपले मोबाईल गेम्स वगैरे. काही क्षणातच तल्लीन झालो. पण मग थोड्यावेळाने पाठीमागे काहीतरी हालचाल जाणवली. थोडेसे वळून अंदाज घेतला तर एक टवाळखोर पोरांचा ग्रूप मागे येऊन बसला होता. त्यांच्यामुळे मला लागणारा फॅनचा वाराही अडला होता. म्हणून जरा त्रासिक नजर करत पुर्ण मागे वळलो तर त्यातील एका मुलाचे बूट अगदी माझ्या तोंडासमोर आले. मी जरा ऑं वासला असता तर त्याच्या चरणोंकी धूल थेट माझ्या तोंडातच पडली असती ईतके जवळ. म्हणजे एवढावेळ तो मुलगा माझ्या मागच्या खुर्चीवर पाय टांगून बूट माझ्या डोक्याजवळ येतील अश्या पोजिशनमध्ये बसला होता.
क्षणभर वाटले तेच बूट काढून त्याच्या थोबाडात मारावेत. पण सवयीने कंट्रोल केले. फक्त त्याच्या नजरेला नजर दिली. तसे त्याने फारच उद्धटपणे, दटावल्यासारखे, बघतो काय रे अश्या आविर्भावात आपल्या भुवया उंचावल्या. शेजारच्यानेही दात काढले. साल्ला टग्या होता. सोबत टग्यांचाच ग्रूप होता. आरे का कारे करायचा प्रश्नच नव्हता. त्यांनी मनात आणले असते तर मला मंडपाच्या मागे नेऊन धोपटला असता. आणि एकतर हा एरीयाही आपला नव्हता.
नुकतेच लगे रहो मुन्नाभाई पाहून झाला होता. त्यात दाखवलेल्या गांधीगिरीचा आधार घेत, किमान त्यांना खजील करणारे एक हास्य तरी त्यांच्या तोंडावर फेकावे असे वाटून गेले. पण ते ही जर त्यांना रुचले नसते आणि उगाच पंगा घेतल्यासारखे झाले असते, तर कदाचित मागाहून येणार्या माझ्या गर्लफ्रेंडलाही याचा त्रास भोगावा लागला असता. म्हणून मग तो विचारही मनातल्या मनातच झटकून टाकला आणि मुकाट्याने जागा बदलायचे ठरवले. मन आणि कान घट्ट करूनच उठलो तरीही पाठीमागून खिदळण्याचा आवाज ऐकू आलाच.
आता मला तिथे दुसरीकडे कुठेही बसायला लाज वाटू लागल्याने मी सरळ वॉशरूमचा रस्ता धरला. तिथे आरसा पाहिला आणि मला जाणवले. त्यांना मला दमदाटी करणे सहज जमावे असा लल्लू चेहरा मी स्वत:च माझा करून ठेवला होता. मनात एक विचार चमकला. केस वगैरे सप्पकन मागे घ्यावे. त्याला एक रबरबॅंड लावावा. शर्टाच्या बाह्या फोल्ड वगैरे करून दंडापर्यंत घ्याव्यात. मनगटात एक चकाकणारे वजनी कडे घालावे. आणि गळ्यातले लॉकेट मागे सरकवत पुन्हा त्यांच्या समोर जाऊन खुर्ची ओढत विजय दिनानाथ चौहानसारखे बसावे.. असे आणि बरेच काही! खूप खूप वाटून गेले. पण तसे काही केलेही असते तरी त्याने गेलेली लाज परत आली नसती. व्हायचा तो अपमान झालाच होता.
त्यानंतर मला तिथे एक क्षणही राहणे अवघड वाटू लागले. गर्लफ्रेंडला फोन केला आणि तब्येत बरी नसल्याचे कारण देत तिथून निसटलो. कारण जो अपमान आपल्याला स्वत:च्या नजरेतून उतरवतो त्यापेक्षा मोठा अपमान नसतो.
त्यादिवशी मी आरश्यात स्वत:चे जे रूप पाहिले ते शेवटचे होते.
त्यानंतर माझी माझ्या गर्लफ्रेंडबरोबर जी भेट झाली ती शेवटची होती.
काही क्षणातच आम्ही आनंदाने एकमेकांपासून वेगळे झालो.
आणि दुसर्या दिवसापासूनच मी आमूलाग्र बदललो.
पण तरीही त्या दिवशी झालेल्या अपमानाची सल अजूनही मनात आहे. पुन्हा अशी वेळ आली तर काय करावे हे आजवर मला समजले नाही. त्यानंतर पुन्हा तशी वेळ आली नाहीये हे ही खरेय. कदाचित हल्ली माझा स्वत:चाच लूक टग्यासारखा झाला असल्याने असावे. पण आजही हा किस्सा ईथे शेअर करताना तितकेच अपमानास्पद आणि गलितगात्र वाटत आहे!
देव न करो ईथे कोणावर अशी वेळ आली असेल. तरीही अनुभव असल्यास काय केले अश्या परिस्थितीत हे नक्की शेअर करा ..
शेवटी अपमान म्हणजे अपमान असतो, छोटा काय आणि मोठा काय, तुमचा नि आमचा सेम असतो!
फुल्ल टाईमपास लिहितोस तू,
फुल्ल टाईमपास लिहितोस तू, मनोरंजन होतं, वाचायला मजा येते, लिहीत रहा
ते लग्नात फक्त. बाहेर मित्र
ते लग्नात फक्त. बाहेर मित्र मित्र भेटले तर घेतात का?
बाहेर मित्र मित्र भेटले तर
बाहेर मित्र मित्र भेटले तर घेतात का?
या वाक्यात उखाणे लिहा
बाहेर मित्र मित्र भेटले तर
बाहेर मित्र मित्र भेटले तर घेतात का?
या वाक्यात उखाणे लिहा >>>
नको रे...तुझं वय काय...तु
नको रे...तुझं वय काय...तु करतो काय लेका....
>>> चँप, अरे त्याला नेसवण्यात येईल असं म्हणायचंय रे, समजून घे.
Pages