या छोट्या छोट्या अपमानांचे काय करावे?

Submitted by एक मित्र on 20 October, 2016 - 09:42

प्रसंग १:
एका कार्यक्रमाला गेलो होतो. खुर्च्या मांडल्या होत्या. कार्यक्रम सुरु व्हायचा होता. काही लोक आले होते ते बसून होते. मी स्टेज जवळील एका खुर्चीवर बसलो. नेहमीप्रमाणे मोबाईल मध्ये डोके खुपसले. आजूबाजूला फार लक्ष नव्हते. थोड्या वेळात एक स्त्री आली. माझ्या शेजारच्या डाव्या बाजूच्या खुर्चीवर बसली. तिच्या पाठोपाठ एक पुरुष आला. तो माझ्या उजव्या बाजूच्या खुर्चीवर बसला. त्यानंतर दोन तीन मिनिटे अशीच गेली. मी माझ्या मोबाईल मध्ये मग्न. मग अजून एक पुरुष आला. त्याने अचानक मला पाठीला हात लावून उठून दुसरीकडे बसायची खून केली. माझ्या नादात मी मग्न असल्याने अचानक मला काही लक्षात आले नाही. काहीतरी असेल समस्या असा विचार करून मी पट्टकन उठलो. एव्हाना जवळच्या सर्वच खुर्च्यांवर लोक बसले होते. मला दुसरीकडे लांबवर जाऊन बसावे लागले. आणि इथेच माझी चूक झाली होती. कारण दुसरीकडे बसल्यानंतर काही काळाने मला खरा प्रकार लक्षात आला. तो नंतर आलेला मनुष्य म्हणजे माझ्या डाव्या बाजूला बसलेल्या स्त्री बरोबर आला होता. त्याचा असा समज झाला असावा कि आधी ती स्त्री तिथे येऊन बसली होती व नंतर येऊन मी शेजारी बसलो. म्हणून त्याने मला उठवले व आपण तिथे बसला. मला मनातून खूप चरफड झाली. वास्तविक त्याने त्या स्त्रीला उठवायला हवे होते. किंवा मी तरी त्याला "मी आधी बसलो आहे मी का उठू?" असे विचारायला हवे होते. पण मोबाईलच्या नादात मी तिकडे दुर्लक्ष करून मुकाट्याने दुसरीकडे जाऊन बसलो. एव्हाना कार्यक्रम पण सुरु झाला होता. आता परत तिथे जाऊन त्याला याबाबत विचारणे मला प्रशस्त वाटले नाही. शोभा झाली असती. पण मला आतून खूप अपमान झाल्याची भावना मन कुरतडू लागली. पुढे अखंड तास दोन तास कार्यक्रमाकडे माझे लक्ष नव्हते. चागल्या कार्यक्रमाची वाट लागली. मनाची चरफड झालेल्या अवस्थेत कसाबसा कार्यक्रम संपायची वाट पाहून तिथून निघून आलो. नंतरही बराच काळ हि गोष्ट माझ्या मनात राहून गेली होती.

प्रसंग २:
कंपनीत नवीनच ओळख झालेल्या एका मित्राने त्याच्या मुलीच्या वाढदिवसाला बोलवले होते. काही दिवसापूर्वीचीच ओळख असल्याने त्याच्या घरच्यांना मी अजून ओळखत नव्हतो. त्यामुळे मी त्याच्या बरोबरच त्याच्या कार मधून कार्यालयात गेलो. त्याच्या बरोबर अजून दोघेजण होते. आम्हा चौघांशिवाय अजून फार कोणी आले नव्हते. थोड्या वेळात एका छोट्या टेम्पोमधून कार्यक्रमाचे साहित्य आले. मित्र मला म्हणाला "अरे चल ना आपण जरा ते साहित्य उतरून घेऊ". मला थोडे आश्चर्य वाटले. वास्तविक त्याच्या घरच्या कार्यक्रमाला मी पाहुणा म्हणून आलो होतो. पाहूण्यांनाच कसे काय कामे सांगता? पण त्याच्या बरोबर आलेले इतर दोघे पण साहित्य न्यायला मदत करू लागले. आणि हे दोघे म्हणजे पण त्याचे मित्रच असावेत असा माझा समज झाल्याने मी काही बोलू शकलो नाही. थोड्या नाराजीनेच का असेना पण मी सुद्धा त्याला साहित्य कार्यालयात न्यायला मदत करू लागलो. पण नंतर जेंव्हा कार्यक्रम सुरु झाला तेंव्हा माझ्या लक्षात आले कि ते बरोबर आलेले ते दोघे म्हणजे त्याच्या घरचेच होते. एक तर त्याचा सख्खा भाऊच होता. म्हणजे मघाशी यांच्या घरच्या कार्यक्रमात माझा उपयोग त्याने नोकरासारखा करून घेतला होता. मला फार अपमानित झाल्याची भावना मनात घर करून राहिली व मी त्याविषयी काहीच करू शकत नव्हतो.

प्रसंग ३:
अजून दुसऱ्या एका मित्राच्या बाबतीतला हा प्रसंग. त्याची बायको डिलिव्हरीसाठी माहेरी गेली होती. तो एकटाच राहत होता व ते भाड्याचे घर होते आणि छोटे होते. पण बायको आल्यानंतर बाळ पण असणार व ते घर नंतर अपुरे पडेल म्हणून त्याने दुसरे मोठे घर बघितले होते. तिकडे साहित्य शिफ्ट करायचे होते. त्याने मला मदतीला बोलावले. अर्थात मदत अशी फार लागणार नव्हतीच. कारण साहित्य न्यायला मजूर बोलवले होते त्यांच्यावर लक्ष ठेवणे, काही राहिले आहे का पाहणे इत्यादी हीच काय ती मदत. मी त्याला सगळे करू लागलो. तास दोन तासात मजुरांनी सगळे साहित्य शिफ्ट केले व ते निघून गेले. पण जाताना ते एक दोन छोट्या पिशव्या आणि काही ब्यागा नवीन घराबाहेरच ठेऊन गेले. त्या फक्त उचलून घरात न्यायचे काम होते. मित्राने ब्यागा घेतल्या. आणि हलक्या पिशव्या मला उचलायला सांगितल्या. अर्थात किरकोळ गोष्ट असल्याने मीही फारसे मनावर न घेता त्या पिशव्या घेऊन घरात आणून ठेवल्या. पण नंतर जेंव्हा तो नवीन घरात आणलेले एकेक साहित्य लावू लागला तेंव्हा मला धक्काच बसला. कारण ज्या पिशव्या मला त्याने उचलायला सांगितल्या होत्या त्यात चक्क त्याने आपली चपले व बूट इत्यादी ठेवले होते. आणि ते सगळे सामान त्याने स्वत:च पॅक केले असल्याने (मजूर फक्त शिफ्ट करायला बोलावले होते) त्या पिशवीत चपला आहेत हे त्याला पक्के माहित होते. मला हि गोष्ट मनाला फार लागून राहिली. पण त्याने असे का करावे हे लक्षात येत नव्हते व त्याला मी हे विचारू पण शकत नव्हतो.

आयुष्यात अनेक वेळा आपल्याला अशा छोट्या अपमानास्पद प्रसंगांना न कळत किंवा कधीकधी ध्यानीमनी नसताना अचानक तोंड द्यावे लागते. हे प्रसंग म्हणजे काही खूप मोठा अपमान नव्हे. कधी कधी तर ते आसपास कुणाच्या लक्षात सुद्धा येत नसतात इतके छोटे असतात. पण तरीही बराच काळ मनात टोचत राहतात. त्यामुळे कधीकधी नात्यांवर पण परिणाम होतो. कुठेतरी वाचले होते कि Life is not about what happens to us, but its is about how do we react to it. हे मला खूप पटते. पण अशा प्रसंगी काय करावे? त्या त्या वेळी React झाले नाही तर ते मनात राहते व त्याचा आपल्यालाच त्रास होतो. पण वरील प्रत्येक प्रसंगात जर मी त्या त्या वेळी React झालो असतो तर कल्पना करा अजून किती विपरीत घडले असते.

यावर कोणी मायबोलीकर योग्य सल्ला देऊ शकतील का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या वयाचा कोठेही उल्लेख आढळत नाही. मी हे यासाठी म्हणतोय कि वयाच्या विशी पंचवीशी पर्यंत छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घ्यायची सवय अनेकांना जडते. त्याला परिस्थितीजन्य कारणे असतात. हि सवय वयानुसार कमी होणे आवश्यक असते अन्यथा याचा पुढे अत्यंत त्रास होऊ शकतो. आपण सगळेच कधी न कधी अशी माणसे पाहतो जी साठी वगैरे ओलांडलेली असतात पण अत्यंत छोट्या छोट्या गोष्टींवरून त्रागा करून घेत असतात. माझ्या निरीक्षणानुसार मागच्या पिढीत हे प्रमाण अधिक होते. या लोकांनी वेळीच हि सवय सोडून दिलेली नसते व त्याचा त्यांना पुढे त्रास होतो. तेंव्हा जर तुम्ही पंचविशीच्या आत बाहेर असाल तर किरकोळ गोष्टींवर विचार करण्याची सवय आत्तापासूनच प्रयत्नपूर्वक सोडून द्यायला सुरवात करा.

तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक प्रसंगावर फीडबॅक देण्यापेक्षा (कारण तो तर तुम्हाला खूप जणांनी दिलाच आहे) मी तुम्हाला अशा प्रसंगांचा पुढे कधी त्रास होऊ नये म्हणून एक उपाय सुचवत आहे. प्रयत्न करून पहा व मला सांगा.

१. कोणतेतरी एखादे रचनात्मक व मोठे कार्य (प्रोजेक्ट) हाती घ्या आणि नेहमी त्यावरच विचार करत राहा. त्या प्रोजेक्टचा तुम्हाला इतका ध्यास लागायला हवा कि इतर कोणत्याही विचारासाठी डोक्यात स्कोपच राहायला नको.
२. एक शब्द लक्षात ठेवा "ANYWAYS"

या दोन गोष्टी अमलात आणल्यास तुम्हाला असल्या किंवा यापेक्षा अपमानास्पद कोणत्याही प्रसंगांचा त्रास होणार नाही. जेंव्हा केंव्हा असा अपमान वगैरे होईल तेंव्हा तुमच्या विचारांची गाडी मुख्य प्रोजेक्टच्या विचारांच्या रुळावरून अपमान झाल्याच्या विचारांच्या रुळावर येईल. पण ती तात्पुरती. तिला ANYWAYS चा सिग्नल दाखवा कि ती लगेच मुख्य रुळावर येईल.

उदाहरणार्थ, तुम्हाला कुणीतरी अचानक शिवी दिली आणि अपमान केला असे समजू. तर तुमचे विचारचक्र खालीलप्रमाणे राहील...

(प्रोजेक्टचा विचार) -> कुणीतरी शिवी दिली -> (प्रोजेक्टचा विचार थांबला) -> "अरे याने मला शिवी दिली? का दिली?" वगैरे वगैरे अपमानास्पद प्रसंगांवर तात्पुरता विचार -> "ANYWAYS" -> (पुन्हा प्रोजेक्ट चा विचार सुरु)

करून पहा. सुरवातीला श्रम पडतील पण नंतर नक्की याचे फायदे दिसू लागतील. ऑल दि बेस्ट.

@ atuldpatil, प्रोजेक्टचा विचार) -> कुणीतरी शिवी दिली -> (प्रोजेक्टचा विचार थांबला) -> "अरे याने मला शिवी दिली? का दिली?" वगैरे वगैरे अपमानास्पद प्रसंगांवर तात्पुरता विचार -> "ANYWAYS" -> (पुन्हा प्रोजेक्ट चा विचार सुरु)>>> अगदी योग्य उपाय सांगितलात. आपल्या मनातील नकोसे विचार थांबविण्याचा हा एकच उपाय आहे. थांब म्हटले तरी नकोसे असणारे आपल्या मनातील विचार आपण थांबवू शकत नाही. तर मग काय करायचे? त्या विचारांना वेगळे वळण द्यायचे. आपल्या मनाला, आपल्याला आवडणाऱ्या इतर दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतवायचे.

१मित्र...सगळ्यांचे सल्ले छान आहेत.
यातीलच काही कॉम्बीनेशन्स करुन तुम्ही अपमान (जो आपल्याला वाटतो तो) सहन करण्याची मनावर न घेण्याची शक्ती वाढवु शकता.
यातील नेमका कोणता सल्ला आवडला, कोणता फ़ॉलो करवासा वाटतोय या बद्दल ही काही लिहा. तुमचे 'आत्ता' पुरते मन मोकळे झाले असेल पण असे होवु नये म्हणुन नेमके काय करवेसे वाटतेय ते पण लिहा.

तुम्हाला खरे तर त्रास तुम्ही स्वतःला इतके कसे काय मूर्ख बनवु दिले आहे ह्या भावनेपोटी होतो आहे.
तिनही प्रसंगात दुसर्या पार्टीचा तुमचा अपमान करावा असा बिलकुल हेतु नसावा.
पहील्या प्रसंगातल्या व्यक्तीने तुम्ही उठल्यानंतर तुमचे आभार मानले असण्याचीही शक्यता असावा पण तुम्ही मोबाईल मध्ये गुंतले असल्याने ही गोष्ट तुम्हाला जाणवली नसावी.

अशी मूर्ख बनवुन फसवले गेल्याची जाणीव भीक वगैरे देताना नंतर बर्याच वेळेला होते.
मुंबईत असताना एक गावंढळ वाटावी अशी ३-४ जण अस्लेली लेडिज ओन्ली फॅमिली आम्ही चुकलो आहोत पुरुष मंडळी आणि आमचे चुकामुक झाली आहे काही पैशांची मदत करा असा चेहर्यावर अगदी अजीजीचा भाव आणुन विनंती करत होती... त्यावेळेला शाबुत असलेल्या चांगुलपणामुळे खिशातुन १०० ची नोट काढुन दिली. सोबतचा मित्र ही चाट झाला. पुढे होस्टेलवर गेल्यावर चर्चेत असे समजले कि असा अनुभव अजुन काही जणांना आलेला होता पैसे काढायची ही नवीन पध्दत होती. सोबत असलेला मित्रही त्या स्त्रिया नंतर दात विचक्त गेल्या असे म्हणाला तेव्हा खरे सांगतो स्वतःच्या भोसळटपणामुळे स्वतःवरच फार चिडचिड झाली.

हो. रेल्वे पुलांवर किंवा थोडी विरळ रहदारी असलेल्या रस्त्यावर एखादे जोडपे अथवा एखाद्या आजी अथवा लहान मुलाला घेतलेली एखादी महिला दीनवाण्या चेहर्‍याने 'गावाकडून आलोय, दोन दिवसापासून काम नाही. खायला काही नाही', 'चुकामूक झाली परत जायला पैसे नाहीत, लेकरू उपाशी आहे' वगैरे कारणे देऊन पैसे मागताना अनेकदा आढळतात.

केसी बिसी म्हणजे काय?
मला खरच माहीत नाहीये. शांतपणे सांगा, माझा छोटा वा मोठा अपमान करू नका.

आगाऊ +१ Proud

बाकी लेखाबद्दल नविन लिहिण्यासारखे काही नाही

रोजच्या बातम्या - जगात होणारी, युद्ध, देशोधडीस लागणारी कुटुंबे - सर्व वाचत जा...हे असले अपमान होणं बंद होईल. जमलं तर अनाथाश्रम, वृद्धाश्रम येथे थोडे volunteering करत जा जमेल तस-तसे! Life is much more than such petty issues! Look at the bigger picture.

केसी बिसी म्हणजे काय?

कसं चाललंय, बरं चाललय? याचा शॉर्ट फॉर्म आहे तो रिया,
व्हात्सप्पी भाषा

मला हे तिन्ही प्रसन्ग अपमानास्पद वाटले नाहीत. पहिला प्रसन्ग त्रासदायक वाटला अपमानास्पद नाही. कारण पहिल्यान्दा तेथे बसून सुद्धा तुम्हाला जागेवरून ऊठून जावे लागले. ती स्त्री नन्तर आली होती. त्यामुळे तिच्या बरोबर आलेल्याने तुम्हाला दुसरीकडे बसायची विनन्ति करयला हवी होती. विमानात अनेकदा तुम्ही जरा तिकडे बसाल का असे अनेकदा मला विचारले गेले आहे व मी दुसरीकडे बसलो आहे. मी कामानिमित्ताने अनेकदा एकटाच प्रवास करतो त्यामुळे असा प्रसन्ग येतो जर बायको बरोबर गेलो तर कोणीही उठवत नाही. अर्थात तुम्ही नकार दिला असता तर त्याने काय केले असते हे सान्गता येत नाही. आजकाल भारतात सौजन्य हा प्रकार अभावाने आढळतो. मी परदेशी गेली पन्नास वर्षे राहत आहे व प्रत्येक वेळी भारतात आल्यावर सर्वत्र उद्धट लोकच दिसतात.

मी कामानिमित्ताने अनेकदा एकटाच प्रवास करतो त्यामुळे असा प्रसन्ग येतो जर बायको बरोबर गेलो तर कोणीही उठवत नाही.<< स्वतःचा अपमान कोण करुन घेईल Light 1

मला तरी हे प्रसंग अपमानास्पद वाटले.माझा एक किस्सा.
माझा एक पौरोहीत्य करणारा मित्र आहे ,बर्याच वर्षापुर्वी एकदा तो माझ्याकडे आला व म्हनाला जवळच्या गावाला पूजा सांगायची आहे,आपण माझ्या गाडीवर जाऊ ,मला सोबत चल ,मी तयार झालो .पठ्ठ्याने पेट्रोल पंपावर माझ्याकडून पन्नास रुपये मागितले ,वर म्हणाला तुझी ट्रीप होतेय म्हणून मागतोय ,पैसे देण्यावाचून व अपमान सहन करण्यावाचून पर्याय न्हवता.पुन्हा त्याच्याबरोबर कुठे गेलो नाही ,आजही मैत्री आहे ,पण सांभाळुण.

टग्या आणि बिपीन चन्द्र हर... यांचे इथले काही प्रतिसाद काढून टाकले आहेत. मुद्दाम कुरापत काढणारे प्रतिसाद पुन्हा दिसले तर सदस्यत्व स्थगीत करण्यात येईल.

(writing marathi is getting garbled in chrome.. anyone having same issue?)

1. You got frustrated by all these events and wasted so much time sulking. writing here,, discussing it with us.. does this make any difference to people who (allegedly) wronged you? Nope
They could care less.(and so do all of us who are advising you). I do not know if this made you feel better (or worse).

2. I see there are 2 options for you..
a) Pay the people who wronged you in the same coin. (except for the experience 1 guy, he is long gone) . talk to them, remind them of the insult and insult them back. It will reduce some of the frustration.(may be/may be not) but you will be seen a whining petty person.

b)As Michelle Obama has said when others go low, you go high..be a bigger man here and forgive them and forget it Life is too short to waste on such things. Spend time with your family/loved ones Treasure the time you enjoy with them.

It is all in your hands. Good luck!

मनस्मी खुप छान प्रतिसाद... मनापासून आवडला खरं तर एक असंच काहीतरि सलणारं लिहायला आले होते पण तुमचा प्रतिसाद वाचून वाटतेय जाऊदे ना त्या व्यक्तीला काय फरक पडणार आहे?

mansmi18 यांनी मांडलेल्या विचारांशी सहमत. तरीही मनातली सल इतरांशी शेअर केल्याने पण बरीच हलकी होते. इतरांना फरक नसेल पडत पण आपल्याला नक्की पडतो. निदान मला तरी खूप बरे वाटले केवळ शेअर केल्यानंतर.

म्हणून अंजली_१२ यांनी पण त्यांना जे सलते आहे ते लिहून शेअर करायला काहीच हरकत नाही असे वाटते.

A young lady sat in a public transport. An old grumpy lady came and sat by her side as she bumped into her with her numerous bags. The person sitting on the other side of her got upset, asking the young lady why she did not speak up and say something.
The young lady responded with a smile: "It is not necessary to be rude or argue over something so insignificant, the journey together is so short. I get off at the next stop."

The response deserves to be written in golden letters in our daily behavior and everywhere:
*It is not necessary to argue over something so insignificant, our journey together is so short*

If each one of us could realize that our passage down here has such a short duration; to darken it with quarrels, futile arguments, not forgiving others, ingratitude and bad attitudes would be a waste of time and energy.

BTW : 2 & 3 looked very normal and natural. You really have a strong ego. If you start responding to such insignificant triggers, going along with anyone will be very difficult for you.

म्हणून अंजली_१२ यांनी पण त्यांना जे सलते आहे ते लिहून शेअर करायला काहीच हरकत नाही असे वाटते.>>>>>> खूप धन्यवाद... मन मोकळं करायची संधी दिल्याबद्दल! काही गोष्टी म्हटलं तर क्षुल्लक असतात पण कोणाशी तरी बोलावेसे वाटते. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे शेअर् करते मग बरं वाटेल असं वाटते त्या व्यक्तीला काही फरक पडो न पडो...

तर माझ्या नवर्‍याचा घनिष्ट मित्र आणि त्याची -आमची मुलं यांच खूप छान जमतं अपवाद त्या मित्राची बायको आणि मी! माझं गुणगान म्हणून नाही पण सहसा माझं कोणाशी जमत नाही असं होत नाही. पण या मित्राच्या बायकोला खूप इगो अ‍ॅटिट्यूड आहे. त्यामुळे जुजबी बोलणे आणी मुलांच्या प्लेडेट ठरवण्यापलिकडे आमच्या मैत्रीची मजल गेली नाही. तिच्या ओळखीने मी एक सोशल ग्रुप ची मेंबरशिप घेतली. पण तिथे तिच्या सतत पुढे पुढे करण्याच्या आणि मी म्हणेन तसंच अशा स्वभावामुळे ती बाजूला पडली आणि मला तो ग्रुप आवड्ल्यामुळे मी खूप अ‍ॅक्टिव राहिले पण याचं खापर माझ्यावर फुटलं मी ग्रुपिझम करून तिला बाजूला पाडलं असं काहिसं! सत्य काय आहे हे ग्रुपमधल्या बर्ञाच जणींना माहित आहे कारण त्याही तिच्या अशा वागण्याने त्रस्त होत्या.

तर मागच्या वेळी त्या मित्राकडे गेलो काही गेट टुगेदरच्या निमित्ताने जिथे ३-४ फॅमिलीज होत्या तेव्हा तीने एकदमच माझ्याकडे दुर्लक्ष केले. मी असून नसल्यासारखेच.
असे बरेच प्रसंग घडतात. स्वतःहून काही संवाद न करणे, मी विचारलेल्याला अगदी जेवढ्यास तेवढि उत्तरे .... तर
वरचा प्रसंग फक्त निमित्त झाला असं मला तरी वाटते. अर्थात मी माझ्यापरीने आमच्यातले अंतर कमी करण्याचे प्रयत्न केले पण तिच्याकडून काही खास रिस्पॉन्स येत नाही. आता मी सोडुन देते या गोष्टी पण नवर्याचे खूप जाणे येणे असल्याने अगदीच टाळताही येत नाही त्यांना असं विचित्र तिढा आहे. नवर्‍याला कल्पना आहे या सगळ्याची पण शेवटी कर अ‍ॅडजस्ट कारण आपण फॅमिली फ्रेंड आहोत असंच उत्तर येतं आणि नेहेमी मीच का? असं मला वाटत राहतं Sad

त्या पिशवीत चपला आहेत हे त्याला पक्के माहित होते. मला हि गोष्ट मनाला फार लागून राहिली. पण त्याने असे का करावे हे लक्षात येत नव्हते व त्याला मी हे विचारू पण शकत नव्हतो. >>>>

विचारू शकत नव्हतो म्हणजे काय ? मनाला लागली तर विचारले का नाही ?
कि आपल्या मनाला जी गोष्ट लागलीये ती तशी नसावी म्हणून खात्री नव्हती ? मित्राचा उद्देश हलकी पिशवी उचलायला लावण्याचा असेल याबद्दल मनात जागा होती ? जर शंभर टक्के खात्री होती तर विचारायचं ना मित्राला ?

बळंच धागा काढायचा म्हणून जबरदस्तीचा जुलमाचा रामराम !!
स्वतःला विचारता येत नसे ल तर ज्यांना सिच्युएशन माहीत नाही ते काय सल्ले देणार ? कि आपल्याला हवे ते वाचून बरे वाटण्याचा मनोरोग जडलाय ?

Pages