व्हॉनेज च्या नावाखाली अफरातफर

Submitted by परदेसाई on 13 October, 2016 - 22:10

ठाण्यातले कॉल सेंटर पकडल्यानंतरही माझ्या बायकोच्या फोनवर दोनदा फोन आला. आणि दोन्ही वेळा IRS ची धमकी ठेऊन गेले. तेव्हा हा 'धंदा' बर्‍याच Call Center वाल्यानी उघडला असावा...
..
हल्ली Vonage चेही असले फोन येऊ लागलेत. १००$ भरा, म्हणजे यापुढे महिन्याला फक्त ८$ बिल येईल असे सांगणारे भारतीय असतात (मुकेश, सुनिल... ) अशी नावे असतात.
मी हजार प्रश्न विचारायला सुरूवात केली, मग त्याने वैतागून त्याच्या मॅनेजरला फोन दिला.
मी त्याला हजार प्रश्न विचारले.. मग म्हटलं ठिक, मी भरतो $१००, फक्त सगळी माहीती तुम्ही सांगायची आणि मी 'हो किंवा नाही' तेव्हढेच सांगेन.
मॅ - तुमचं आडनाव 'देसाई' आहे.
मी- हो..
मॅ - तुमचा ईमेल पत्ता सांगा..
मी - तुमच्या कॉम्प्यूटर वर आहे.
मॅ - तुम्ही सांगा , मी बरोबर आहे की नाही ते बघतोय...
मी - तुम्ही सांगा, मग मी बरोबर की नाही ते सांगेन.
मॅ - असं केलंत तर आम्ही तुम्हाला ही सवलत देऊ शकत नाही.
मी - धन्यवाद. (फोन कट)..

मी Vonage ला फोन केला, तर त्यांचे म्हणणे हा Fraud होता, तुम्ही लक्ष देऊ नका.
मी - अरे तुमच्या नावावर Fraud करताहेत, आणि अर्धी अधिक माहिती त्यांच्याकडे आहे , तरी तुम्ही म्हणताय लक्ष देऊ नका... या पुढे Vonage ला पण बाय.. बाय...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉनेजचे प्रिपेड कार्ड एका ग्लोबल हॅलो नामक कुठल्यातरी कंपनीकडे ट्रान्स्फर झाले. आता त्या वेबसाइटवर ते रिचार्जच करता येत नाही. त्यात एक दोनदा मी क्रेडिट कार्डने रिचार्ज करण्याचा प्रयत्न केला होता. माहिती नाही की त्या माहितीचा काही दुरुपयोग केला जाइल का

शिर्षक बघितल्यावर पहिल्यांदा 'नॉनव्हेज च्या नावाखाली अफरातफर' असे वाचले.

गोष्टीगावचे, चांगला अ‍ॅप्रोच, एकतर त्यांनी आपल्याला कॉल केलाय तर आपण आपले व्हेरिफिकेशन देऊच नये.
जरी कॉल खरा वाटत असेल तरी व्हेरिफिकेशनची नक्की आवश्यकता आहे की नाही हे बघुन, मी स्वतः कंपनीच्या जाहीर नंबरवर फोन करुन व्हेरिफिकेशन देईन असे सांगावे, वर गरज असल्यास तसेच करावे. खरा कॉल असेल तर याला कोणी नको आताच सांगा, तेवढा वेळ नाही, किंवा अमुकच नंबरला फोन करा असे म्हणत नाही.

इथे आणि इतर कॅाल सेंटरला नोकरी केलेले लोक डेटा साठवून ठेवतात आणि त्याचा दुरुपयोग करतात. मला टाटास्काइचा एक खोटा एजंट मी न वापरत असलेला सेटटॅाप देण्यासाठी वारंवार फोन करायचा. मी सांगायचो हजार रु द्या आणि न्या अथवा इमेल पाठवा. इमेल पाठवणे त्याना करता येत नाही नोकरी सोडल्यावर.