Submitted by जयदीप. on 12 October, 2016 - 21:51
एक गझल ✏
**************************
प्रवासी दूर आलेला तुझ्यामधला
कुठे असणार त्याचा चेहरा पडला?
दिवे गेल्यामुळे झाले दिसेनासे
सवय झाली तसा अंधार उलगडला
अचानक फाटले पडदे विचारांचे
किती कर्कश्श तो एकांत पुटपुटला
अपेक्षाभंग केला चेहर्याने मग
मला नव्हता तसा आवाज आवडला
नको, नुकसान आहे त्यात; दोघांचे
तुझ्या-माझ्यातला व्यवहार परवडला
जयदीप
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा